• 48
  • 1 minute read

पब्लिक इश्यूंचा पूर आला आहे. अजून येणार आहे..

पब्लिक इश्यूंचा पूर आला आहे. अजून येणार आहे..

आजकाल कोणतेही इकॉनॉमिक डेली उघडून बघा. इकॉनोमिक टाइम्स, बिझनेस स्टॅंडर्ड, बिझनेस लाईन. बातम्यांचे पहिले पान येण्याच्या आधी दोन, तीन, कधीतरी चार पब्लिक इशूच्या प्रत्येकी दोन पानपान भर जाहिराती असतात.

          २०२२ मध्ये ४० पब्लिक इश्यू मधून ४०,००० कोटी रुपये भांडवलाची उभारणी झाली.
२०२३ मध्ये ७८ इश्यू मधून ६८,००० कोटी रुपये
२०२४ मध्ये ८२ इश्युमधून १,८२,००० कोटी रुपये
२०२५ मध्ये आतापर्यंत ४८ इश्युमधून ६५,००० कोटी रुपये

पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे बरेच आहेत.

शेअर डिमॅट अकाऊंट मध्ये आल्यानंतर, शेअर लिस्टिंग झाल्या झाल्या विकून टाकणारे बरेच आहेत.

पब्लिक इश्यू ही खरेतर दीर्घकालीन गुंतवणूक असली पाहिजे. पण नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांचा काहीही अभ्यास नसतो. लवकरात लवकर जास्तीत जास्त नफा मिळवणे हे एकमेव ध्येय झाले आहे.

त्यात काही गैर नाही. कधीपर्यंत जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष नफा मिळतो तोपर्यंत. आणि तोटा झाला तर ?

किती पब्लिक इश्यू त्यांच्या इश्यू प्राईस पेक्षा जास्त किंवा कमी किमतीत आहेत हा प्रश्न नवीन गुंतवणूकदारांनी विचारला पाहिजे.

२०२४ मध्ये जे पब्लिक इश्यू आले त्यापैकी ४० टक्के कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इशू प्राइस पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत.

काही वेळा तोटा आला, नुकसानं झाले तरी हरकत नाही. पण त्यातून शिका. आंधळेपणे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चूका करू नका.

शेवटचे. कर्जे काढून शेअर्स मध्ये कधीही गुंतवणूक करू नका. ब्रोकर लोक तर जाळे टाकून बसले आहेत.

संजीव चांदोरकर (२५ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *