- 23
- 1 minute read
पराभूत मानसिकतेतून आलेली भ्रमिष्ट अवस्था…!
मोदी…. नरेंद्र दामोदरदास मोदी: सेवक ते चौकीदार अन् डायरेक्ट ईश्वरी अवतार…!
मोदी ….. नरेंद्र दामोदरदास मोदी, दहा वर्षांपूर्वी सेवक म्हणून आला. ५ वर्षांपूर्वी चौकीदार बनला अन् आता अवतार घेऊन डायरेक्ट भगवान झाला. याचा अर्थ असा आहे की विष्णूचा अवतार धारण करायला दहा वर्षांचा कालावधी लागतो. रामाचा वनवास ही केवळ १४ वर्षांचा आहे. याच कालावधीत राम भेटतो. पुढे मागे काहीच नाही. याच काळात रामाची सर्व कांड. पण आज आधुनिक व विज्ञानाचे युग असल्याने त्याचा चलाखीने योग्य तसा वापर करून मोदीने ४ वर्ष वाचवली व दहाच वर्षांत देवत्व प्राप्त करून घेतले. मोदी रामापेक्षा ही चलाख निघाला.
आपल्या १४ वर्षांच्या काळात रामाने रावणाचा वध करून आपण भगवान असल्याचे सिध्द केले. तर इकडे मोदीने ” अच्छे दिन”च्या नावाखाली पूर्ण देश बरबाद करुन अंबानी व अदानीला आबाद करून आपण भगवान असल्याचे सिद्ध केले. तसेच विष्णूचे अवतार व त्यातील गूढ आपल्या मानगुटीवर नेहमीच बसलेले असायचे. मोदीच्या या अवतार कार्यामुळे ते गूढ ही उखलले गेले.देवत्व प्राप्त करण्यासाठी बायकोचा वापर करून तिला सोडवी लागते, ही अवतारी पुरूष होण्याची मुख्य अट असावी. रामाने बायको सोडली व मोदीने ही सोडली. त्यावरून हे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मोदीने लग्न करून जशोदाबेनला सोडले, हे आता कुठे देशातील जनतेला कळले आहे ?
जगात इस्लाम, इसाई, जैन, बौद्ध, यहुदी आदी धर्म आहेत, तसा हिन्दु हा धर्म आहे. पण इथे सर्व गोंधळ आहे. या धर्माचे खरे नाव काय ? हे कुणाच्या बापाला ही आजपर्यंत कळलेले नाही. या धर्माला सनातन म्हणायचे की वैदिक, ब्राह्मणी म्हणायचे की हिंदू ? हे कुठल्याही हिंदूंच्या १७ पिढ्यांना समजलेले नाही. या धर्माचा संस्थापक कोण ? या बाबतीत ही बोंबाबोंब आहे. बाकी धर्म म्हणून पूर्ण अनागोंदी कारभार आहे. हा धर्म कधीच वाढत नाही. कारण वाढण्यासारखे त्यात काहीच नाही. त्याशिवाय हा धर्म सतत खतऱ्यात असतो. अन् मग तो वाचविण्यासाठी विष्णू अवतार घेत राहतो. अन् तो किती भंगार अवतार घेतो हे मोदींकडे पाहून आपल्या सहज लक्षात येते. तसेच मोदी हा ११ वा अवतार असून विष्णूने अद्याप ही जाहीर केलेले नाही की, माझा हा शेवटचाच अवतार असेल. त्यामुळे या पुढे ही अवताराची परंपरा सूरूच राहणार असल्याने ज्यांना अवतार घ्यायचा आहे. देवत्व प्राप्त करायचे आहे,त्यांना बायको करून सोडून द्यावे लागणार आहे. खास करून योगीने हे लक्षात घेतले पाहिजे. नुसती भगवी वस्त्रे धारण करून काहीच फायदा होणार नाही. देवत्व प्राप्त करण्यासाठी आपले नॉमिनेशन दाखल करण्या अगोदर लग्न करावे लागणार आहे.
या अवतार कार्याच्या अनुषंगाने विचार करताना सहज लक्षात येते ते म्हणजे, सनातनी धर्म व्यवस्थेत स्त्रियांना काहीच किंमत नसल्याने त्या अवतार घेत नाहीत. तो अधिकार त्यांना नाही.विष्णू अवतार घेऊन धरतीवर येतो व तिकडे स्वर्गात पार्वती जशोदाबेन बनून आपले आयुष्य जगते. मोदीच्या या अवतार कार्यामुळे हे ही एकदम स्पष्ट झाले आहे. देव, देवळं अन् त्यांचा धर्म या गोष्टी लोकांना च्युतिया बनविण्याचे काम करतात. हे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला माहित असल्याने त्याच मार्गाचा ते वेळोवेळी वापर करतात. सत्ता जातेय. हे लक्षात आल्यावर मोदीने हा नवा खेळ सूरू केला आहे.
घराघरात आधुनिक उपकरणे आहेत. लोकांच्या हातात मोबाईल फोन आहे. याच आधुनिक उपकरणाचा अन् साधनांचा वापर करून जग आपल्या मुठीत आले आहे. ही सर्व विज्ञानाची किमया आहे. अशा स्थितीत आपण विज्ञान नाकारणाऱ्या दैववादाच्या मागे लागत असू तर आपण नक्कीच मूर्ख आहोत. अशीच मुर्खांची एक फौज मोदीच्या सत्ताकाळात, सत्तेचा वापर करून संघाने उभी केली असून याच मुर्खांनी मोदी अवतारी पुरूष आहेत, असा प्रचार गेल्या दहा वर्षांत सुरु केला. अन् या मुर्खांचा सरदार असलेल्या मोदीने स्वतःला अवतारी पुरूष म्हणून जाहीर केले. आजच्या आधुनिक जगात ही असल्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक भारतात आहेत, ही खरे तर लाजिरवाणी बाब आहे.
भारत भूमी ही तथागत बुद्धाची जन्मभूमी असल्याचे अख्ये जग मान्य करते. तर अर्धे अधिक जग बुध्दाला शरण आले आहे. बुद्ध दैववाद नाकारतो व वैज्ञानिक दृष्टिकोन मांडतो. हे ही अख्या जगाला मान्य आहे. याच भारत भूमीत, माझा जन्मच मुळी बॉयलोजिकली झाला आहे, असे धाडसी विधान मोदी करीत असेल तर जग नक्कीच मोदीची मूर्ख म्हणून दखल घेतल्या शिवाय राहणार नाही. मोदीची दखल तर जगाने अनेक वेळा घेतली आहे. आदमखोर म्हणून मोदीची ओळख जगभरात आहेच. आता या आदमखोराने स्वतःला ईश्वर म्हणून स्वतःच जाहीर केले आहे.
मोदीच नाही तर मोदीसारखे अनेक महामूर्ख या देशात आहेत, ज्यांनी स्वतःला दैवत्व प्राप्त झाल्याचा दावा केलेला आहे. मोदी काही एकटा नग नाही. पण बाकी नगांकडे दुर्लक्ष करता येऊ शकते मोदीकडे नाही. मोदी देशाचा संवैधानिकपदावर बसलेला व्यक्ती आहे. तो देशाचा पंतप्रधान आहे. त्या पदाची एक शान आहे. अशा वेळी त्याकडे गंभीरपणेच पाहिले पाहिजे. अन् अशा कुप्रवृत्तीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. भ्रमिष्ट झालेले लोकच अशी मुर्खांसारखी विधाने करतात, हे जगाला दाखवून ही दिले पाहिजे.
पायाखालची जमीन सरकल्यावर काय काय होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोदीने स्वतःला जाहीर केलेला ईश्वरी अवतार. 5 वा टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दारुण पराभव दिसू लागल्यावर मोदीकडून येडेचाळे अपेक्षित होतेच. पण त्याची लेव्हल इतकी खालच्या पातळीवरची असेल हे मात्र अपेक्षित नव्हते. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने इथल्या बहुजनांच्या मेंदूची नसबंदी केलेली आहे. या नसबंदीमुळे विचार करण्याची सारासार बुध्दीच भारतीय समाजातील एका वर्गाकडे राहिलेली नाही. त्यामुळे स्वतःला ईश्वर म्हणून घ्यायची हिंमत मोदीसारखे चोर, चिटर करीत आहेत. पण हा मूर्खपणाचा कळस असल्याचे ही बहुसंख्य लोकांचे मत आहे. अन् ते अतिशय महत्त्वाचे आहे.
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)