पर्यावरणाच्या नुकसानीची किंमत आर्थिक दंडातून-धक्कादायक निर्णय

पर्यावरणाच्या नुकसानीची किंमत आर्थिक दंडातून-धक्कादायक निर्णय

पर्यावरणाच्या नुकसानीची किंमत आर्थिक दंडातून-धक्कादायक निर्णय

पूर्वलक्षी प्रभावाने, आवश्यक तो दंड भरून, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेता येऊ शकतो असा निवाडा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आता सादर करत आहे…

आधी ठरलेली वन टाइम सेटलमेंट ची रक्कम भरल्यानंतर जिच्या वर, जिच्या प्रकार्तकावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस कोर्टाच्या विचाराधीन आहेत…अशा कंपनीला/ प्रवर्तकाला क्लीन चीट देण्यात येऊ शकते असा निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

स्टर्लिंग बायोटेक आठवते ? नितीन आणि चेतन संदेसरा…. आठवतात? बँकांना फसवून २०१७ सालात देश सोडून पळालेले ?

ज्यांच्यावर CBI, ED, Income Tax, SFIO अशा केंद्र सरकारचा गुन्हे अन्वेषण एजनसीजनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत..

“If public money comes back to lenders banks, continuation of criminal proceedings would not serve any useful purpose” Supreme Court in its judgement

(संदर्भ आणि कोट: इकॉनॉमिक टाइम्स, २५ नोव्हेंबर २०२५, पान क्रमांक एक)

गुन्हा करा, पैसे भरा आणि क्लीन चीट, क्लिअरन्स, शिक्षेतून सुटका, मनःशांती मिळवा

कनेक्ट द डॉट्स!

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी…यांच्या घरात पार्टीची तयारी सुरू देखील झाली असेल.

या व अशा निवाड्यांमुळे गैरमार्गाने आर्थिक गुन्हे करणाऱ्यांची भीड चेपली जाणार नाही असे कोणी म्हणेल तर त्यांना साष्टांग नमस्कार घालण्यास मी तयार आहे. किंवा माझ्यातर्फे तुम्ही घातलात तरी चालेल

संजीव चांदोरकर (२५ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *