समता सैनिक दलाच्या ९७ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वरुन भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सदरची मोटरसायकल रॅली समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगांव जिल्हा अध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील काढण्यात आली.
सदरची मोटरसायकल रॅली जारगाव चौफुली, शिवाजी नगर, मानसिंगका काॅर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, देशमुखवाडी, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे काढण्यात आली.
या मोटरसायकल रॅलीत समता सैनिक दलाचे जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर सावळे,संघटक अरुण खरे,जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन जावरे, जिल्हा संघटक विश्वनाथ आहिरे पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम सपकाळे,भडगाव तालुका अध्यक्ष विजय मोरे सोयगाव तालुका अध्यक्ष शिवराम जाधव यांचेसह चारशे पाचशे पदाधिकारी व सदस्य मोटार सायकली घेवून सामील झाले होते. ही पाचोरा शहरातील पहिली ऐतिहासिक रॅली होती. रॅली प्रसंगी महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणला होता.
रॅलीचा समारोप विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला. या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांनी उपस्थितांना समता सैनिक दलाचे सुरु असलेले कार्य व भविष्यात करावयाच्या कामगिरी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
रॅलीचे आयोजन वाल्मीक मोरे, रामजी जावरे, राहुल साठे, राहुल गायकवाड, अरुण गायकवाडभागवत मोरे, आनंद सुरवाडे अजय सोनवणे, कैलास सोनवणे,दशरथ तांबे देवानंद साबळे,अनिल तांबे,सागर निकम,किरण शिरसाठ विशाल साळवे,सुमित ब्राह्मणे, विक्की ब्राह्मण,निलेश सपकाळे यांनी केले होते.
या प्रसंगी खालील उपस्थितांनी समता सैनिक दलात प्रेवश करुन दलाचे सभासदत्व स्वीकारले.
दिलीप पवार,शांताराम गायकवाड(वडार) आदेश जाधव,दीपक मोरे,संदीप कदम,दगडू गायकवाड(मोची) फिरोज पठाण, संदीप शिरसाठ, दिलीप सोनवणे,राकेश साळुंखे, अलीम शेख,शकील सय्यद,अरब सैय्यद, आसिफ सैय्यद,अरिफ शेख,फिरोज सय्यद, शकील काझी, मुस्ताक सैय्यद,अरिफ शेख, अनिस शेख,मोहम्मद सैय्यद, शिवराम जाधव,
त्यांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थिताचे आभार पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम सपकाळे व भडगाव तालुका अध्यक्ष विजय मोरे यांनी मानले.
देवानंद साबळे
तालुका प्रसिद्ध प्रमुख
समता सैनिक दल