• 4
  • 1 minute read

पाली संवर्धन समन्वय समिती

पाली संवर्धन समन्वय समिती

पाली संवर्धन समन्वय समिती

मुंबई महाराष्ट्रातील पहिलीच आंदोलन परिषद ही यशस्वी रित्या पार पडली… आपणां सर्वांना ज्ञात आहे. मुंबई विद्यापीठांमध्ये भंते विमांसा यांचं पालि भवन तसेच पालि विभागाला शासकीय अनुदान प्राप्त व्हावं यासाठी गेल्या 180 दिवसाहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.. त्या आंदोलना संदर्भात बौध्द समाजामध्ये पारदर्शकता जावी या शुध्द हेतूने ही आंदोलन परिषद घेण्यात आली…
या आंदोलन परिषदेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंन्ते विमांसा, भंन्ते विमलबोधी, भंन्ते पुर्ण,  आयु.संतोष गांगुर्डे, आयु. इंद्रजीत मोहिते उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. वैभव सोनवणे तसेच प्रास्ताविक आयु. दीपक चौगुले  यांनी केले.
आंबेडकरी चळवळीतील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या आंदोलन परिषदेला उपस्थित होते…
या आंदोलना संदर्भात काही महत्त्वपूर्ण ठराव या परिषदेमध्ये करण्यात आले. ते पुढील प्रमाणे. 
 
• मुंबई विद्यापीठामध्ये प्रशस्त पालि भवन व्हावं
• पालि विभागाला शासकीय अनुदान प्राप्त व्हावं
• भंन्ते विमांसा यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि ज्यांनी हल्ला केला तो सुरक्षा रक्षक खरात याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी
•  भंन्ते यांच्यावर झालेला FRI रद्द करण्यात यावा व त्यांची रद्द करण्यात आलेली PHD पूर्ववत करण्यात यावी
•  मुंबई विद्यापीठाच्या गेटवर भंन्ते विमांसा यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून एक जन आंदोलन लवकरच घेण्यात येईल
 
असे महत्त्वपूर्ण ठराव कालच्या आंदोलन परिषदेमध्ये करण्यात आले ही आंदोलन परिषद यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले त्या सर्वांचे समितीच्या वतीने हार्दिक आभार.
इथून पुढे मुंबई नवी मुंबई ठाणे या ठिकाणच्या बौध्द विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ही आंदोलन परिषद घेण्यात येणार आहे.
नमो बुध्दाय जय भीम 
 
वैभव सोनवणे
0Shares

Related post

काहीजण विचारतात की ट्रम्प यांच्या दादागिरीला कोण राष्ट्र प्रतिक्रिया कसे देत नाही. ?

काहीजण विचारतात की ट्रम्प यांच्या दादागिरीला कोण राष्ट्र प्रतिक्रिया कसे देत नाही. ?

काहीजण विचारतात की ट्रम्प यांच्या दादागिरीला कोण राष्ट्र प्रतिक्रिया कसे देत नाही. ? एखादा वेडा नुसती…
डेटा सेंटर…. डेटा सेंटर…ज्या राज्यात जावे तिकडे डेटा सेंटर! महाराष्ट्र तर आघाडीवर.

डेटा सेंटर…. डेटा सेंटर…ज्या राज्यात जावे तिकडे डेटा सेंटर! महाराष्ट्र तर आघाडीवर.

डेटा सेंटर.. डेटा सेंटर…ज्या राज्यात जावे तिकडे डेटा सेंटर! महाराष्ट्र तर आघाडीवर दावोस मध्ये जे “एम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *