मौजे जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गा या मुस्लिम धार्मिक स्थळाचे अस्तित्व बाबत बेकायदेशीर बदल करून धार्मिक दंगल घडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे बाबत…
अहिल्यानगर तालुका पाथर्डी येथील मौजे जवखेडे खालसा या गावी पीर बाबा रहमान दर्गा उर्फ कान्होबा हे मुस्लिम धर्मियांचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मुस्लिम धर्म रितीरिवाजाप्रमाणे सर्व विधी शेकडो वर्षापासून सुरू आहेत, याबाबतचे सर्व महसुली पुरावे उपलब्ध आहेत. या दर्ग्याची देखभाल करण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इनाम जमीन मुस्लिम कुटूंबीयांना मिळालेली आहे.
मा. महोदय , वरील प्रमाणे ची सर्व वस्तुस्थिती असताना देखील देशात व राज्यात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या व धार्मिक ध्रुवीकरणातून हिंदू मुस्लिम दंगल घडवणाऱ्या विचारधारेचे समाजकंटक वृत्तीचे लोक हे नमूद मुस्लिम धर्मस्थळावर येऊन त्या ठिकाणी त्या दर्ग्याचे अस्तित्व नाकारून हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे आरती व इतर बाबी करण्याचा प्रयत्न करून धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकारच्या घटना यापूर्वी दिनांक 19 /06/ 2025 रोजी घडलेली आहे. तसेच यासंदर्भामध्ये 21 /06/ 2025 रोजी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही संपूर्ण बाब प्रशासनाला ज्ञात आहे हे स्पष्ट होत आहे.
तसेच माननीय महोदय, काही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींनी सदर दर्ग्यावर दिनांक 25 व 26 जून 2025 रोजी सर्व हिंदू बांधवांनी जमून सदर दर्गा धार्मिक अस्तित्व नष्ट करून या ठिकाणी हिंदू धर्मीय परंपरांचा कब्जा करण्याचे आवाहन समाज माध्यमांद्वारे केलेले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची व धार्मिक दंगल घडवण्यास खतपाणी घालणारी आहे, त्यामुळे अशा वृत्ती व व्यक्तींवर तातडीने कठोर कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.
मा. महोदय , वर नमूद बाबी ह्या भारताच्या सार्वभौमत्व एकता व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या असून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी भारत सरकारने यापूर्वीच उपासना स्थान ( विशेष उपनिबंध ) अधिनियमन 1991 अर्थात द प्लेस ऑफ वर्षी स्पेशल प्रोविजन ऍक्ट 1991 अंतर्गत फौजदारी गुन्ह्याचे स्वरूप ठरवणारे कायदा केलेला आहे.
तरी सदर कायद्याचे अवलोकन केले 15 ऑगस्ट 1947 रोजी जे धार्मिक स्थळ ज्या जाती धर्म परंपरेचे पालन करत आहे त्यांचे अस्तित्व तसेच ठेवून त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या बदल करता येणार नाही किंबहुना अशा प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्या व्यक्ती व व्यक्तीं विरोधात नमुद कायद्यान्वये तसेच सध्याच्या इतर प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तजवीज केलेली आहे.
तरी मा. महोदय सदर अनुषंगाने आम्ही आपणास खालील मागण्या मंजूर करण्याची विनंती करत आहोत.
१) मौजे जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गा या मुस्लिम धार्मिक स्थळास कायम पोलिस संरक्षण देण्यात यावे.
२) मौजे जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गा या मुस्लिम धार्मिक स्थळावर दिनांक १९ जून २०२५ रोजी धार्मिक वाद करुन दंगल घडविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई व प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
३) मौजे जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गा या मुस्लिम धार्मिक स्थळाचे स्वरुप बदत दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत दिनांक २५ व २६ जून रोजी याठिकाणी इतर लोकांना जमण्याचे आवाहन करणार्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
४) मौजे जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गा या मुस्लिम धार्मिक स्थळाचे मुळ स्वरूप कायम ठेवत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीत याबाबत आपले स्तरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.