• 39
  • 1 minute read

पुष्यमित्र शृंग हाच राम आहे हा गैरसमज समाजात कोणी प्रस्थापित केला?

पुष्यमित्र शृंग हाच राम आहे हा गैरसमज समाजात कोणी प्रस्थापित केला?
                    पुष्यमित्र शृंग हा ब्राह्मण नव्हता आणि तो मौर्यवंशाचा विध्वंसकही नव्हता कारण तो एक स्वतः बुद्धिस्ट होता. मग सर्वात प्रथम पुष्यमित्र शृंग हा ब्राह्मण होता त्यानेच मौर्य वंशाचा विध्वंस केला हा इतिहास किंवा ही गोष्ट सर्वात प्रथम कोणी समाजासमोर मांडली असेल तर ती व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीला बुद्धिस्ट समाजाने आपल्या डोक्यावर घेऊन त्याच्यावर प्रचंड प्रेम केले ती व्यक्ती म्हणजे पंडित राहुल सांस्कृत्यायन उर्फ केदारनाथ पांडेजी हे होय.
 
राहुल सांस्कृत्यायन आपल्या ‘ होल्गा से गंगा ‘ या ग्रंथामध्ये म्हणतात – 
 
” साकेत (अयोध्या) कधी काळी कोण्या तरी राज्याची प्रमुख राजधानी बनली. बुद्धाचे समकालीन कोशल राजा प्रसेनजित यांचा येथे एक राजमहाल जरूर होता ; परंतु राजधानी होती श्रावस्ती (सहेटमहेट), येथून सहाय्यजन दूर प्रसेनजीत चा जावई अजातशत्रू याने कोशलचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, त्याच वेळेस श्रावस्तीचे सुद्धा वैभव लुटल्या गेले.
 
शरयू नदीच्या काठावर काठावर वसलेले साकेत हे अगोदर पासूनच व्यापाराचे फार मोठे केंद्र होते. पुढे अनेक कालखंडापर्यंत ते व्यापाराचे केंद्र म्हणून कायम होते. विष्णूगुप्त चाणक्य याचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य याने मग त्याच्या राज्याला तक्षशिलापर्यंत, त्यानंतर यवनराजा शैलाक्ष (शेलुकस) याला पराभूत करून हिंदूकुश पर्वतमाळा पासून पश्चिमी हीरात आणि समुद्रापर्यंत विस्तार केला.
 
(आता येथे पंडित राहुल सांस्कृत्यायन यांची करामत पहा, चाणक्य हा काल्पनिक आहे हे आज सिद्ध झाले आहे. मी पण त्यांनी चंद्रगुप्त मौर्य हा चाणक्याचा शिष्य होता असे आपल्याला सांगितले आहे. म्हणजे चाणक्य याला सुद्धा याच आपल्या लोकप्रिय पंडित राहुल सांस्कृत्यायन यांनीच प्रस्थापित केले.)
 
चंद्रगुप्त आणि त्याचा मौर्य वंश याच्या शासन काळात सुद्धा साकेत एक व्यापाराचे केंद्र या पलीकडे त्याचा विकास झाला नव्हता. 
 
मौर्य- वंश विध्वंसक सेनापती पुष्यमित्र शृंग याने प्रथम साकेतला राजधानीचा दर्जा दिला; परंतु कदाचित पाटलीपुत्रचे महत्व नष्ट करून नाही. वाल्मिकी याने अयोध्या नावाचा प्रचार केला; (येथे सुद्धा पंडित राहुल सांस्कृतयान यांनी काल्पनिक वाल्मिकीला प्रस्थापित केले आहे) जेव्हा त्याने आपल्या रामायणाला पुष्यमित्र किंवा त्याचा शृंगवंशाच्या शासन काळामध्ये लिहिले.
 
यामध्ये तर काही शंकाच नाही आहे की अश्वघोष याने वाल्मिकी च्या मधुर काव्याचा आस्वाद घेतला होता. (येथे पहा अश्वघोष हा बुद्धिस्ट विद्वान पंडित याच्या समकालीन वाल्मिकीला पंडित राहुल संकत्यायन यांनी प्रस्थापित केले आहे) यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही, जर वाल्मिकी शृंगवंशाच्या दरबारी आश्रित कवी राहिला असेल. (म्हणजे येथेही पंडित राहुल संकृतयान यांनी वाल्मिकी, अश्वघोष आणि पुष्यमित्र शुंग हे समकालीन असल्याचे दाखवलेले आहे. हे तिघेही समकालीन असू शकत नाही)
 
जसे कालिदास चंद्रगुप्त विक्रमादित्याचे आणि शृंगवंशाची राजधानी याचे महत्त्व वाढविण्यासाठी त्याने (पुष्यमित्र शृंगाने) जातकांचे दशरथ याची राजधानी वाराणसी ही बदलून साकेत किंवा अयोध्या केली आणि रामाच्या रूपामध्ये शुंगसम्राट पुष्यमित्र किंवा अग्नी मित्र याची प्रशंशा केली- जसे कालिदासाने ‘ रघुवंशा ‘चे रघु आणि ‘ कुमारसंभव ‘ याला कुमार नावाने पिता-पुत्र चंद्रगुप्त विक्रमादित्य आणि कुमार गुप्त याचा सेनापती पुष्यमित्र आपल्या स्वामी चा वध करून सारे मौर्य साम्राज्यावर आपले अधिपत्य स्थापन करू शकला नाही.”(पृष्ठ क्रमांक 153, 154)
 
म्हणजे येथे पहा राहुल सांस्कृत्यून स्वतः म्हणत आहे की पुष्य मित्र शृंगाने मौर्यवंशाचे संपूर्ण राज्य आपल्या अधिपत्याखाली घेतले नव्हते. म्हणजे यावरून एक गोष्ट ही सुद्धा सिद्ध होते की पुष्यमित्र शृंगयाने मौर्यवंशाचा संपूर्ण नायनाट केला नव्हता. 
 
पंडित राहुल सांस्कृत्यायन यांच्याही अगोदर एक विद्वान बुद्धिस्ट पंडित लक्ष्मी नरसू होऊन गेलेले आहे. लक्ष्मी नरसू यांचा आदर बाबासाहेब आंबेडकर खूप करायचे. बाबासाहेबांना जर कोणी प्रश्न केला की बुद्ध धम्माला समजून घेण्यासाठी कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, तेव्हा बाबासाहेब लक्ष्मी नरसू यांनी लिहिलेले ‘ Essence of Buddhism ‘या पुस्तकाचे नाव सांगत होते. कारण तेव्हा ‘बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ हा ग्रंथ जन्मासच यायचा होता.
 
पी लक्ष्मी नरसू (1861 ते 14 जुलाई 1934) ‘जातीय एक अध्ययन’ या ग्रंथामध्ये म्हणतात-
 
“पुष्यमित्र याच्या वंशाचा अंत त्याचा अंतिम राजाच्या मृत्यू सोबतच झाला, जो आपल्या ब्राह्मण मंत्री वासुदेव यांच्या षडयंत्राचा शिकार झाला.(पृष्ठ क्रमांक 132) खरे पाहता वासुदेव हा सुद्धा ब्राह्मण नव्हता कारण त्यावेळी आजचा वर्णव्यवस्थेमधील ब्राह्मण अस्तित्वातच नव्हता.
 
 म्हणजे इथे पुश्यमित्राच्या ब्राह्मण मंत्र्यानेच पुष्यमित्राची हत्या केली असे दिसून येते. तुम्ही जर अशोकावदान हा ग्रंथ वाचला तर तुम्हाला पुष्यमित्र हा बुद्धिस्ट राजा होता असे दिसून येते. त्यानेच साचीच्या स्तूपाच्या तोरण द्वाराचा जीर्णोद्धार केला होत आहे सर्वांना माहिती आहे. 
 
इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की पुष्यमित्र हा ब्राह्मण नसून त्याला ब्राह्मण दाखविण्यात आले आणि त्याच्याकडूनच मौर्यवंशाचा नायनाट करण्यात आला असा खोटा इतिहास आजपर्यंत आपल्याला सांगण्यात आलेला आहे. 
 
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पुष्यमित्र शृंग आणि पतंजली याचा कवडीचाही संबंध नाही,कारण हे दोघेही समकालीन नाही. पतंजली हा सातव्या शतकात होऊन गेला आणि पुष्यमित्र हा ईसा पूर्व 185 मध्ये होऊन गेला. दोघांचाही एकमेकांसोबत काडीचाही संबंध नसताना भ्रमवाद्यांनी पुष्यमित्र हा मौर्यवंशीय राजाचा सेनापती होता आणि त्यानेच मौर्य वंशाच्या शेवटच्या राजाची हत्या केली. पतंजली हा त्याचा योग गुरु होता हा खोटा इतिहास आजपर्यंत आपण शिकत आलो आहे.
 
पतंजली हा विद्वान बौद्ध भिक्खु होता आणि त्याने बुद्धिस्टांसाठी व्याकरण लिहिण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले होते.
 
 सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले 
21/06/2025,7972722081
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *