प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी म्हणजे काय?

प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी म्हणजे काय?

प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी म्हणजे काय?

२६ जानेवारी १९५० मध्ये कोणीही शहिद झाले नाही उगाच त्यादिवशी शहिदांचे गाणे लावू नये, संविधानाचे महत्व सांगावे.
“भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला,तालुका, जिल्हा,शहर,राज्य,आणि राष्ट्रात सर्वत्र  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
 
भारतीय ध्वजाला वंदन ही केली जाते, आणि राष्ट्रगीत ही आणि म्हटले जाते. मात्र हे कशासाठी होते हे कोणीही समजून घेत नाही. प्रजासत्ताक दिना मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे किती मोठे योगदान आहे ते खरंच समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी हा प्रजासत्ताक दिवस पाहण्यासाठी जीवाचीही पर्वा केली नाही. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची साधी आठवणही काढली जात नाही,ही खूप मोठी शोकांतिका आहे. 
 
प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी म्हणजे काय? समजून घ्या. या दिवशी कोणतीही लढाई झाली नाही, आपले सैनिक शहीद झाले नाही. अशी इतिहासात कोणतीही नोंद नाही.  २६ जानेवारी, १९४९ रोजी भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून पूर्ण केलं. यालाच २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस इतका कालावधी लागला. २६ जानेवारी, १९५० ला संविधान आमलात आलं.                             
इथल्या व्यवस्थेने आम्हाला २६ जानेवारी आहे तेवढंच सांगितल पण,२६ जानेवारी का साजरी केली जाते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच आम्हाला आणि आजच्या पिढीला कळू दिले नाहीत. ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे,त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे,परंतु तसे होतांना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला,जन्मदात्याला,घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा कॉलेजांनी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे-जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल. आता पासून आपण करूया..! 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांस वंदन करूनच जे लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत असणाऱ्यांना संविधान  देऊन साजरी केली पाहिजे. 
 
 
 
0Shares

Related post

“कोणत्याही स्वतंत्र देशाच्या बाबतीत, एकतर संवैधानिक सरकार असते किंवा बंड असते”

“कोणत्याही स्वतंत्र देशाच्या बाबतीत, एकतर संवैधानिक सरकार असते किंवा बंड असते”

“कोणत्याही स्वतंत्र देशाच्या बाबतीत, एकतर संवैधानिक सरकार असते किंवा बंड असते” आपण ७७ वा भारतीय प्रजासत्ताक…

भूली-बिसरी यादें

भूली-बिसरी यादें  1982 दिसंबर महीने में, मैं सरकारी काम से ITI नैनी इलाहाबाद गया हुआ था।…
स्वतंत्र मतदारसंघ : बाबासाहेबांची मागणी नव्हे, राजकीय मुक्तीची रणनीती.

स्वतंत्र मतदारसंघ : बाबासाहेबांची मागणी नव्हे, राजकीय मुक्तीची रणनीती.

स्वतंत्र मतदारसंघांची मागणी ही बाबासाहेब आंबेडकरांची एखादी भावनिक किंवा तात्कालिक भूमिका नव्हती. ती दलित समाजाच्या दीर्घकालीन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *