/ प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या राज्य स्तरीय संस्थेच्या “पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी कमिटी” या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या राज्य स्तरीय संस्थेच्या “पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी कमिटी” या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या राज्य स्तरीय संस्थेच्या “पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी कमिटी” या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
इचलकरंजी दि. ०८ – “महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व समाजवादी पार्टी महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या नामवंत राज्यस्तरीय संस्थेच्या ‘पॉवर टॅरिफ इलेक्ट्रिसिटी कमिटी’ म्हणजे ‘वीजदर उर्जा समिती’ या समितीच्या चेअरमन पदी नियुक्ती व चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिल मध्ये पदसिध्द सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीच्या को चेअरमन पदी डॉ. श्रीधर व्यवहारे नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरच्या व्यवस्थापन समितीमधील उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्यावर या समितीचे मार्गदर्शक पदाधिकारी ही जबाबदारी देण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नुकतीच वरीलप्रमाणे नियुक्ती व निवड जाहीर केली आहे.” अशी माहिती देणारे प्रसिद्धी पत्रक वीज ग्राहक संघटनेच्या वतीने संघटना उपाध्यक्ष विजय जगताप, सचिव जाविद मोमीन व कार्यकारीणी सदस्य मुकुंद माळी, राजन मुठाणे व विनय महाजन यांनी प्रसिद्धीसाठी दिलेले आहे.
या नियुक्ती संदर्भात प्रताप होगाडे यांनी या नियुक्तीचे सर्व श्रेय चेंबरचे अध्यक्ष, पदाधिकारी, वीज ग्राहक संघटनेचे सर्व सहकारी व राजकीय क्षेत्रातील सर्व सहकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे. या सर्वांचे सहकार्य व सदीच्छा यामुळेच ही नियुक्ती झाली आहे. “राज्यातील देशात सर्वाधिक असलेले वीजदर ही या क्षेत्रातील आजची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे या पदाचा व या राज्यस्तरीय संघटनेच्या व्यासपीठाचा वापर ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने राज्यातील वीजदरावर नियंत्रण आणणे व ग्राहकांच्या महत्त्वाच्या व मूलभूत समस्या सोडविणे यासाठीच सातत्याने केला जाईल” अशी हमी त्यांनी स्वतः, श्रीधर व्यवहारे व श्रीकृष्ण परब या तिघांच्या वतीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दिली आहे. तसेच समितीमध्ये राज्यातील सर्व विभागातील जागरूक व कृतिशील सदस्य व कार्यकर्ते यांना सहभागी करून लवकरच समिती अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात येईल अशीही माहिती प्रताप होगाडे यांनी शेवटी दिली आहे. _________________________ इचलकरंजी कार्यालयीन सचिव, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना