प्रत्येक जात आपल्या मधील एक जरांगे शोधत आहे पण खरच हज योग्य आहे का हा ज्या त्या जातींच्या लोकांनी आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे .प्रत्येक जात आम्हाला एससी एसटी मध्ये घाला म्हणुन आग्रह करत असेल तर तसे होणे शक्य आहे का ? मग होत नसेल तर स्वतःच्या जातींचीच फसवणूक आपणच करत आहोत का ? बर जे एससी मध्ये बौद्धेतर तर एससी मधील मातंग ,ढोर ,व्होल्लार आज घटनेचे संरक्षण आरक्षण 76 वर्षे झाली तरी जैसे थे का आहेत ? खऱ्या आदिवासींच्या जवळपास सव्वा लाख नोकऱ्या चोरीला गेल्या ते त्यांना परत का मिळवता आल्या नाहीत ? मुळ विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणतात आम्हाला आरक्षण एससी एसटी प्रमाणे असते तर आमचे खासदार आमदार झाले असते .मग राखीव मतदार संघातील अनुसुचित जाती ,अनुसुचित जमातींच्या खासदार आमदारांनी किमान त्यांच्या प्रवर्गातील लोकांना तरी न्याय मिळवून दिला का ? बर मुळ विमुक्त भटक्या जाती जमातींच्या लोकांना राखीव मतदार संघ नसुन ही बंजारा समाज्यातील खासदार झाले ,आमदार झाले ,मंत्री ,मुख्यमंत्री झाले तरीही उर्वरित 41 जातींना काय मिळाले ? केळ घ्या केळ अशीच अवस्था मग खरा न्याय कसा मिळेल याचा विचार कोणी करतो का ? बर आपण जर न्याय मिळावा अशी अपेक्षा करत असु तर आपण तरी न्यायाने वागतो का ? आज ओबीसी मधील माळी ,धनगर ,वंजारी यांचे किती तरी आमदार आहेत काही खासदार पण होते आहेत मग बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी मधील जीवनात काय फरक पडला ? तर सारेच मराठ्यांचे खासदार ,आमदार ,झे.पी.तालुका पंचायत त्यांच्या ताब्यात अगदी सरपंच ही त्यांचाच बर इतकेच नव्हे तर साखर सम्राट तेच ,दुध सम्राट तेच अगदी वाळु सम्राट ही तेच इतकेच नव्हे तर वडार ,बेलदार अश्या छोट्या जातींचे ठेकेदार त्यांनी 30-35 वर्षापूर्वी हाकलून लावले तरीही मराठ्यांना न्याय नाही म्हणतात .त्यांची लेकर उपाशी आहे आहेत मग या देशात पोटभर खातय कोण ? बर आमचे खंड्डीभर प्रश्न आहेत .महागाईने जीव खाल्ला आहे ,बेरोजगारी ने सारेच हैराण आहेत असे असताना मग आम्ही गणपती उत्सव असो की नवरात्री उत्सव असो की होळी असो आम्ही का नाचतोय की कोण आम्हाला नाचवतय काहीच समजत नाही गड्या :-