• 34
  • 2 minutes read

प्रधानमंत्री, २ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री प्रचार करुन पणं अतीशय नवीन असलेला मतदारसंघ जिंकणारी एक आमदार वर्षाताई गायकवाड

प्रधानमंत्री, २ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री प्रचार करुन पणं अतीशय नवीन असलेला मतदारसंघ जिंकणारी एक आमदार वर्षाताई गायकवाड

प्रागतिकरिपब्लिकनआघाडी च्या वतीने आम्ही ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मा. श्यामदादागायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई लोकसभा मदारसंघांपैकी सर्वच्या सर्व सहा मतदार संघात आंबेडकरी वस्त्यांमध्ये काम करायचं ठरवलं आणि त्यानुसार मी उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात काम केलं, आणि डॉ. संपत सपकाळ आणि टीमने उरलेल्या ५ मतदारसंघात आपल्या सगळ्या वस्त्या फिरून आंबेडकरी समाजातील मतांचं विभाजन होऊ नये म्हणून वस्त्या पिंजून काढल्या पत्रके वाटली आणि छोट्या छोट्या कॉर्नर बैठका घेतल्या.

       मी माञ वर्षाताईंच्या लोकसभा क्षेत्रातच शेवटपर्यंत प्रचार केला. आम्ही १ मे २०२४ पासुन ते १७ मे २०२४ पर्यन्त रात्रंदिवस प्रचार केला. पहिल्या दोन दिवस मी, स्वप्नील कदम, अश्र्वाजित आणि अनिल मोरे, सुहास कारंडे, सुहास बनसोडे होतो. त्यानंतर ही टीम संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रात दिवसभर आणि सायंकाळी उत्तर मध्य मुंबई येथे आमच्या सोबत काम करायची.

        हे सगळ सविस्तर यासाठी लिहितोय की, वर्षाताई गायकवाड तश्या धारावी विधानसभेच्या आमदार आहेत, २ वेळा कॅबिनेट मंत्री राहिल्यात आणि त्याचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड हे धारावी आणि दक्षिण मध्य मुंबई चे खासदार राहिलेले आहेत. हा सगळा इतिहास भूगोल पाहता महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड ह्यांना दक्षिण मध्य मुंबई मधून उमेदवारी देणे गरजेचे होते. परंतू दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई ह्यांना उमेदवारी देवून, वर्षा गायकवाड ह्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देवून खुप मोठी चूक झाली आणि यामुळे या दोन्हीं जागा महाविकास आघाडी हरणार असच आम्हाला वाटल होत.

        वर्षाताई यांच्यासाठी हा मतदारसंघ खूपच नवीन आणि अतीशय अवघड होता हे वर्षाताई आणि त्याचे भाऊ तुषार दादा ह्यांना भेटून कळले.
याआधी हा मतदारसंघ सुनील दत्त यांचा म्हणजेच काँग्रेसचा होता, सुनील दत्त यांच्या निधनानंतर तो प्रिया दत्त यांच्याकडे आला आणि मागच्या 2 टर्म तो पूनम महाजन यांच्या कडे होता आणि प्रिया दत्त या सगळ्यांत कुठेच नव्हत्या आणि ज्यांच्यावर या मतदासंघातील थोडीफार भिस्त होती असे बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या गटात गेल्याने हा मतदारसंघ काँग्रेस जिंकेल अशी कोणतीच आशा स्थिती आणि परिस्थीती नव्हती अश्या काळात केवळ एक महिना आधीं हा मतदारसंघ वर्षाताई यांच्याकडे आला.

         मला व्यक्तिशः पाहिले ३ दिवस रस्ते कळतच नव्हते. मुंबई विद्यापीठाजवळ भीमछाया आहे तिथून पुढचं थोड कळायचं परत चांदिवली कडे आलो की काहीं कळतच नसायचं पुनः बांद्रा पूर्व, शासकीय वसाहत आणि टीचर कॉलनी आली की थोड लक्षात यायचं, बाकी कुर्ला विधानसभा आणि त्यातले रस्ते ते कुर्ला सीएसटी रोड ते नेहरू नगर ते चुनाभट्टी ही बॉर्डर कळायला ४ दिवस पूर्ण गेले.

आजची परिस्थिती अशी आहे की,
उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा आहेत, ज्यात
विलेपार्ले विधानसभा ज्याचे आमदार भाजपचे पराग अळवणी आहेत.
बांद्रा पूर्व विधानसभा ज्याचे आमदार झिशान सिद्दीकी जे आता अजित पवार गटात आहेत.
बांद्रा पश्चीम विधानसभा ज्याचे आमदार भाजपचे आशिष शेलार आहेत.
चांदिवली विधानसभा ज्याचे आमदार शिंदे गटाचे दिलीप मामा लांडे आहेत.
कुर्ला विधानसभा ज्याचे आमदार सध्याचे शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर आहेत.
आणि केवल एकच विधानसभा आहे ती म्हणजे,
कालिना विधानसभा ज्याचे आमदार उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस आहेत.
म्हणजे केवळ एकच standing आमदार, तसेच नाराज असलेलें एक माजी आमदार नसीम खान आणि उद्धव ठाकरे राहत असलेला मतदारसंघ इतक्याच भांडवलावर जेमतेम एक महिना बाकि असताना उमेदवारी मिळालेली कदाचीत ही एकमेव महिला उमेदवार असेल…

अश्यातच,
#नरेंद्रमोदी #योगीआदित्यनाथ #एकनाथशिंदे #देवेंद्रफडणविस #अजितपवार ह्यांनी केलेला रोड शो सुध्दा याच लोकसभा क्षेत्रात, नितीन गडकरी यांनी शेवटच्या दोन दिवसात घेतलेली गुप्त बैठक सुध्दा याच मतदारसंघात.
तसेच,
ज्या अडाणी च्या विरोधात माविआ आहे अश्या अडानीचे कार्यालय सुध्दा याच बांद्रा पुर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथे असलेल्या घनदाट मुस्लिम वस्तीच्या जवळ, जेथे अडानीला ही वस्ती तोडून पाय पसरायचे आहेत.
हे सगळ एका बाजूला
आणि त्या बदल्यात केवळ १७ तारखेची BKC ची शेवटची जाहिर सभा सोडली तर कोणत्याही मोठया नेत्याची सभा नाहीं की रोड शो नाही. अश्या प्रतिकूल परिस्थितीतही ही जागा जिंकणे अशक्य गोष्ट होती.

परंतू भिस्त मात्र बौध्द, मुस्लिम आणि शिवसेनेला मानणाऱ्या हिंदू समाजावर आणि काहीं छोट्या अल्पसंख्यांक समाजावर होती.
परंतू एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली पाहिजे की आमची टीम जवळपास सगळ्याचं सहा च्या सहा मतदारसंघात गेलीं आपल्या सगळ्या वस्त्या, बौध्द विहारे, कार्यालये आणि जमा होण्याच्या छोट्या छोट्या जागा ईथे सगळीकडे बैठका, छोटे छोटे गट घेवून त्यांना मतांचे विभाजन होऊ देवु नका म्हनून सगळ्यांनी मिळून काम केलें ज्यात प्रामुख्याने मा. मिलिंद भवार दादा ह्यांच अमूल्य योगदान आहे.

याच सोबत आम्ही अनेक मुस्लिम वस्त्या ज्या बांद्रा पुर्व पश्चिम, चांदिवली, कुर्ला आणि गोळीबार येथे आहेतः त्या पिंजून काढल्या ज्यात Ashwin Kamble आणि सुलतान भाई ह्यांची खुप मदत झाली. सोबत प्रविण जावळे आणि घटकोपरची टीम होतीच.

Ashwin Kamble सुलतान भाई आणि प्रवीण शेवटच्या दिवसापर्यंत सोबतच राहीले.
आम्ही दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथून सुरवात करुन पहाटे तीन किँवा चार वाजता बदलापूर या परत यायचो, परत सकाळीं उठून पुन्हा उत्तर मध्य मुंबई परत बदलापूर…

या सगळ्या प्रवासात रामदास आठवले गटाचे, जोगेंद्र कवाडे गटाचे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आम्ही ताईंच्या सोबत आहोत ही ठाम भुमिका घेतली. हीच भुमिका मुस्लिम समाजाच्या लोकांची होती.

मुस्लिम आणि बौध्द बहुल या मतदारसंघात उज्वल निकम यांच्या सारखा उमेदवार दिल्याने बौध्द समाजाला माता रमाबाई नगर हत्याकांड आणि खैरलांजी पुन्हा एकदा आठवलं आणि आम्ही सर्वांनी ते प्रकर्षाने आठवन करुन दिली.
उज्वल निकम यांची आतापर्यंतची मुस्लिम समाजाबद्दल असलेली भुमिका सुध्दा तितक्याच ताकदीने पटवून देण्यात आम्हाला यश आलं असे आम्ही समजतो. त्याचाच परिणाम की ईथे वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या उमेदवाराला विधानसभेपेक्षाही कमी मतदान झालं आणि आंबेडकरी समाजाची मते एकत्रित राहिली.

हीच बाब मुस्लिम समाजाबद्दल झाली या मतदार संघात तब्बल १५ उमेदवार मुस्लिम समाजाचे होतें त्या सगळ्यांचे deposit जप्त झाले.

आज दुपारी निकाल बघत असताना वर्षाताई ४० हजार मतांनी मागे आहे असं कळल्यावर आपण खरच काम केलं की नाही जे जे आपल्याला हो म्हणाले त्यानी खरच ताईंना मत दिलेत की नाही आणि ज्या पध्दतीने आम्ही प्रचार केला त्यामुळे माझ्यावर एक केस सुध्दा झाली आणि पोलीस ३ दिवसांपासून मला बोलवत आहेत हे डोक्यात होतच… त्यातच वर्षाताई हरली तर सगळी मेहनत पाण्यात जाईल आणि केस पणं चांगलीच रंगेल अश्या अवस्थेत दुपारी होतो परंतू बौध्द मुस्लिम आणि इतर सर्वांनी मिळून हा ४० हजारांचा लीड तोडला आणि कांटे की टक्कर सूरू झाली कधी ४०० ने पुढे तर ७०० ने मागें असं सूरू झालं. एकदा विजयी झाल्या पणं उज्वल निकम यांनी objection घेवून परत काहीं राऊंड फेर मतमोजणी केली जी ताईंच्या पथ्यावर पडली आणि ह्यांची चोरी लक्षात आली ७१८ चा असलेला लीड आणखी वाढला आणि ताई जवळपास 16,514 इतक्या छोट्याश्या लिडने निसटत्या कां होईना पणं निवडून आल्या.

आंबेडकरी पक्ष आणि विचारधारा मानणाऱ्या काहींचं म्हणणं आहे की,
आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत, किती दिवस काँग्रेस आणि इतरांच्या दावणीला बांधून घ्यायचे आणि अश्या अनेक गोष्टी निवडणुक जवळ आली की जोर जोरात सूरू असतात…
मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या म्हनून हे नक्की मान्य करतों की वर म्हटल्या प्रमाणे आपण हेचं केलं पाहिजे पणं भुमिका मांडणे आणि निवडणूक लढवणे या दोन गोष्टी वेगळया आहेत….
लोकसभेची निवडणूक म्हणजे ६ विधानसभा मिळुन एक निवडणुक आणि त्यात किमान २००० बूथ असतात आता ज्या पक्षाचे ५०० बुथवर काम नाहीं की साधा ५०० बुथवर एक बूथ प्रमूख म्हनून कार्यकर्ता नाहीं….
आपल्या समाजाच जिथे २ लाखांच्या वर प्रतिनिधीत्व नाहीं ज्यातल ५०% मतदान सुध्दा मतदान केंद्रांवर होत नाहीं तिथं आपण कसे निवडून येणार आणि मुख्य म्हणजे पाच वर्षे काहीही कामं करायच नाही जनतेच्या प्रश्नांवर मोर्चा आंदोलन धरणे निवेदन असं काहीं काहीच करायच नाही आणि विशेष म्हणजे एक लोकसभा जिथे सीआ किमान १०० ते २०० नगरसेवक आणि आपल्या पक्षाचे साधे दोन नगरसेवक नाहित तिथे लोकसभा कशी जिंकणार हरिभाऊ ????

असो या सगळ्या प्रवासात खुप नवनवीन व्यक्ती भेटल्या, अनेक सामाजिक राजकीय आणि संगठना यांचे लोक जुडले, अनेक जुने जाणते कार्यकर्ते नेते भेटले खुप ओळखी झाल्या. आणि हे सगळ जवळून पाहताना लक्षात आलं की एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हजारो लोक लागतात आणि हे हजारो लोक एका ध्येयाने प्रेरित झालेले हवेत मान पान अपमान या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुध्दा आपल्याला जे काम दिलं आहे ते प्राणपणाने करणारे लोकच इतकी मोठी निवडणुक जिंकू शकतात.
बाकि बौध्द अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाच्या सोबत आजपासुन जरी पुनः नव्याने काम सूरू केल तरी नाही खासदार नाही आमदार पणं नगरसेवक म्हनून किमान होता येईल आणि या राजकिय प्रक्रीयेत मान सन्मानाने जाता येईल आणि हे होवु शकत….

बौध्द समाजाच्या वर्षाताईंनी या निमीत्ताने नवख्या मतदार संघात अल्पावधीत आपला विजयाचा ठसा उमटविला याबद्द्ल त्यांचें मनःपुर्वक अभिनंदन आणि ज्यांनी मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री सगळ्यांना ईथे आणुन पण विजय मिळवू शकले नाहित अश्यांना पुनः पुनः हरण्याच्या शुभेछा..

मला या मतदारसंघात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मा. श्यामदादा गायकवाड आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे मनःपुर्वक आभार.

आपलाच
– महेन्द्र अशोक पंडागळे
समन्वयक
(प्रागतिक रिपब्लिकन आघाडी
महाराष्ट्र राज्य)

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *