भीमराव प्रधान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने व्याख्यान आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. रमेश गावित मुंबई विद्यापीठ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बी.बी. प्रधान सर हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा च्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमुख वक्ते डॉ.रमेश गावित यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी समुदायातील क्रांतीकारक बिरसा मुंडा ,तीलका मांजी, राघोजी भांगरे यांच्ये योगदान व कार्य विषयी सविस्तर विश्लेषण त्याचबरोबर आदिवासींच्या चालीरीती त्यांची प्रतिमा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले . अध्यक्षीय भाषणात डॉ. बी.बी. प्रधान सर यांनी आदिवासी समुदायातील वैभवशाली परंपरा त्यांचं समाजातील योगदान व आदिवासींचे निसर्गावर असलेले प्रेम हे सांगितले. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करून सांस्कृतिक कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित गवरे तर आभार प्रा. देविदास नवसे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली गायकवाड यांनी केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव स्वप्निल प्रधान व अध्यक्षा सुनंदा प्रधान आणि महाविद्यालयातील प्रा. ललिता खंबायत ,प्रा. मयुरी जाधव, प्रा. हर्षला माळुंगे, प्रा.स्नेहा रोकडे, प्रा वृषाली सोनारे , प्रा. अश्विनी ,प्रा. सीमा ,प्रा. राऊत प्रा .वारघडे तसेच इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.