आपणा सर्वास कळविण्यास आनंद होत आहे की “सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा” ने त्यांच्या “भारतीय इतिहासातील आदिवासी समुदायाचे योगदान” या विषयावरील घेतलेल्या सोळाव्या वार्षिक अधिवेशनात “राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर” येथे मला “राजश्री छत्रपती शाहू: इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार 2025” डॉ राजेंद्र मोरे (मंडळाचे अध्यक्ष) यांच्या हस्ते माझ्या एकूण इतिहास विषयक संशोधन आणि लेखन कार्यास दिला, त्याबद्दल सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि त्यांचे पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो.
यावेळी डॉ लहू गायकवाड यांचे बीज भाषण झाले. तर समारोपाचे भाषण डॉ जगदीश सोनवणे यांनी केले. यावेळी इतिहास संशोधन मंडळाचे आधर्यु डॉ नलावडे सर, प्राचार्य राजेंद्र मोरे, गणेश विधाटे, डॉ जयपाल सावंत, डॉ गीतांजली बोऱ्हाडे, डॉ सचिन मोरे, डॉ सुरज चव्हाण, डॉ संजू बोडखे, डॉ उर्मिला क्षीरसागर आदी अभ्यासक उपस्थित होते.
शाल, स्मृती चिन्ह, मानपत्र आणि सहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.