फातिमाबी शेख साहित्य संमेलनात प्रवीण बागडे यांचे काव्यवाचनाकरिता निवड़
शिक्षण, समता आणि स्त्रीस्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करणाऱ्या भारतातील पहिल्या मराठी मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चौथ्या राज्यस्तरीय “युगस्त्री फातिमाबी शेख” साहित्य संमेलनातील कवी संमेलन सत्रासाठी नागपूर येथील साहित्यिक-कवी प्रवीण बागडे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, श्रीरामपूर यांच्या वतीने हे साहित्य संमेलन ११ जानेवारी २०२६ रोजी ऑकजीवन बँक्वेट हॉल, बेलापूर रोड, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे आयोजित करण्यात आले आहे. कवी संमेलनात प्रवीण बागडे हे ‘फातिमा माई’ तसेच समकालीन सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयपूर्ण कवितांचे सादरीकरण करणार आहेत. सामाजिक संवेदनशीलता, प्रखर शब्दशैली आणि परिवर्तनवादी दृष्टिकोनामुळे प्रवीण बागडे यांची कविता वाचक-श्रोत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कवी संमेलनाची उंची अधिक वाढली असून साहित्यप्रेमींकडून त्यांच्या सहभागाचे स्वागत व कौतुक होत आहे.