• 5
  • 1 minute read

फातिमाबी साहित्य संमेलनात प्रवीण बागडे यांचा काव्यवाचनासाठी सन्मान

फातिमाबी साहित्य संमेलनात प्रवीण बागडे यांचा काव्यवाचनासाठी सन्मान

फातिमाबी साहित्य संमेलनात प्रवीण बागडे यांचा काव्यवाचनासाठी सन्मान

 भारताच्या पहिल्या मराठी मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, श्रीरामपूर यांच्या वतीने ११ जानेवारी २०२६ रोजी ऑकेशन्स बँक्वेट हॉल, बेलापूर रोड येथे आयोजित चौथे राज्यस्तरीय “युगस्त्री फातिमाबी शेख” साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनातील कवी संमेलन सत्रात सामाजिक आशय असलेल्या प्रभावी काव्यवाचनासाठी नागपूर येथील साहित्यिक प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा गौरव करण्यात आला. ‘युगस्त्री फातिमा माई’ या विषयावर तसेच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणासाठी दोन्ही कवींना मराठी भाषांतरित पवित्र कुरआन, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल साहित्यिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
         फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव करताना फातिमाबी शेख प्रतिनिधिक काव्यसंग्रहाच्या संपादिका अनिसा सिकंदर यांनी, फातिमाबींची जयंती शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये व्यापक पातळीवर साजरी व्हावी, तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ठोस प्रयत्न होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कविसंमेलन नूरजहां शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवींनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खाजाभाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन शफी सैय्यद यांनी केले. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या फातिमाबी शेख यांच्या स्मृतीला उजाळा देणारे हे संमेलन साहित्यप्रेमींमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरले.
 
प्रवीण बागडे
0Shares

Related post

‘ग्राहक राजा’ च्या घोषणेतून हक्कजागृती पर्यंतचा प्रवास  राष्ट्रीय ग्राहक दिन

‘ग्राहक राजा’ च्या घोषणेतून हक्कजागृती पर्यंतचा प्रवास राष्ट्रीय ग्राहक दिन

‘ग्राहक राजा’ च्या घोषणेतून हक्कजागृती पर्यंतचा प्रवास राष्ट्रीय ग्राहक दिन भारतीय लोकशाहीची रचना तीन खांबांवर उभी…
स्मृतींचे राजकारण : शासन निर्णयातून वगळले गेलेले राष्ट्रपुरुष आणि अस्वस्थ करणारे वास्तव

स्मृतींचे राजकारण : शासन निर्णयातून वगळले गेलेले राष्ट्रपुरुष आणि अस्वस्थ करणारे वास्तव

स्मृतींचे राजकारण : शासन निर्णयातून वगळले गेलेले राष्ट्रपुरुष आणि अस्वस्थ करणारे वास्तव लोकशाही ही केवळ निवडणुकांची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *