• 125
  • 1 minute read

बहुजन चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळावर विषमतावादी ईश्वरी व्यवस्थेचा प्रभाव…!

बहुजन चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळावर विषमतावादी ईश्वरी व्यवस्थेचा प्रभाव…!

            मैं… …. ……….. .. … की शपथ लेता हू की, विधी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची आस्था /श्रध्दा और निष्ठा रखुंगा, की मैं भारत की संप्रभुता और अखंडता को बनाए रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री/मंत्री /राज्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक औंर शुद्ध अंतकरण से निर्वहन करुंगा. मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के प्रति संविधान और विधी के अनुसार कार्य करुंगा…. ही प्रधानमंत्री, मंत्री अथवा राज्यमंत्र्यांनी घ्यावयाची शपथ. आज तिसऱ्यांदा मोदीने प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. तर ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. एकूण ७२ जणांनी शपथ घेतली. पण या १४० कोटी जनतेचे दुर्दैव हे आहे की, यातील ६८ जणांनी या आधुनिक युगात ही काल्पनिक ईश्वराची शपथ घेतली. पाषाण युगाचा प्रभाव असणाऱ्या लोकांच्या हातात आज ही आपला देश अडकला असल्याचे चित्र काल आपण व जगभराने पाहिले. देशाची संप्रभुता व अखंडता कायम ठेवण्याच्या किती ही शपथा घेतल्या, तरी देशाच्या भवितव्याची चिंता करण्यासारखी आजची ही स्थिती आहे. त्याशिवाय काल झालेला सपथविधी सोहळा हा लोकशाही व्यवस्थेला शोभणारा नव्हता. तर तो राजेशाहीचे संकेत देणारा होता.” महाराजाधिराज पधार रहे हैं, ” असेच वातावरण तयार करून मोदींचे आगमन झाले. हे मोदीची जितकी समज आहे, त्यावरून त्यांना योग्य वाटले असेल पण ज्या देशातील ८० कोटी जनता ५ किलो राशनसाठी लाईनीत उभी राहते, त्या देशाला हा बडेजाव शोभत नाही. हे विदेशी पाहुण्यांच्या ही लक्षात आले असेलच.
       मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये १० दलित, ५ आदिवासी, ५ अल्पसंख्यांक व २७ ओबीसी समाजातून आलेल्या मंत्र्यांनी शपथ घेतली. पण यामधील तिघांचा अपवाद सोडला तर एका ही महाभागाने सत्यनिष्ठेची शपथ घेतली नाही. दलित , आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्यांक समुदयाचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच ज्या ईश्वरी व्यवस्थेने हिरावून घेतला होता. त्याच व्यवस्थेवर निष्ठा ठेवणे म्हणजे ईश्वरी व्यवस्थेच्या विरोधात मानवतेसाठी लढणाऱ्या सर्व महापुरुषांचा अपमान आहे. धर्मांध व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या संघ व भाजपच्या ज्या खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांनी ईश्वरसाक्ष अशी शपथ घेतली, हे आपण समजू शकतो. पण या दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक व नितीशकुमार सोबत असलेले कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांचे काय ? ज्यांनी ईश्वरसाक्ष ठेवून शपथ घेतली. कर्पुरी ठाकूर हे समाजवादी विचारांचे वरिष्ठ नेते राहिलेले असून त्यांनी बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी ओबीसींना आरक्षण दिल्यामुळे तत्कालीन जनसंघाने त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून त्यांचे सरकार पाडले व त्यांना त्यांची जात अन् आईवरून अश्लील शिव्या घातल्या. त्याची जरा ही लाज त्यांच्या पुत्राला वाटू नये, याला काय म्हणावे. समाजवादी विचारांच्या या खासदारांचे काय ? हा यक्ष प्रश्न असून तो चिंताजनक आहे.
कर कर्पूरी कर पुरा,
छोड गद्दी धर उस्तरा !

ये आरक्षण कहा से आई
कर्पूरिया की माई बिहाई… !
        कर्पूरी ठाकूर यांनी ओबीसींना आरक्षण दिल्यानंतर संघ व जनसंघाने अगदी खुलेआमपणे कर्पूरी ठाकूर यांना जात व आईवरुन शिव्या घातल्या होत्या, त्याच कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी भाजप सरकारला पाठींबा दिला व ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतली. तर….
मैं उस घर में दीया जलाने चला,
जहा सदियों से अंधेरा हैं…..!
       हे साऱ्या देशात बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगणाऱ्या रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवानने ही ईश्वर साक्ष ठेवूनच मंत्रीपदाची शपथ घेतली. दुसरों के घरों मे दीया जलानेवाले पासवान अपने घर में दीया नहीं जला पाये. त्याशिवाय जनता दल (यु) खासदार ललनसिंग हे मोदींचे कट्टर विरोधक म्हणून गेली १० वर्ष लोकसभेत गर्जत होते. आता ते मोदींच्या मंत्रीमंडळात सामिल झाले असून शपथविधी सोहळ्यातच त्यांची लाचारी स्पष्ट दिसून आली. खरे तर लाचार मोदी अन् पुरा संघ व भाजप असायला हवा होता. कारण दारूण पराभव त्यांचा झाला असताना ही त्यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करायची होती.
         भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ही गोष्ट खरी आहे. पण कधीकाळी राम मनोहर लोहियाचे अनुयायी असलेले नितीशकुमार एनडीएत सामिल झाल्याने भाजपने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. हे आकड्यावरुन तरी स्पष्ट दिसत आहे. नितीशकुमारचे एनडीएत सामिल होणे. हे एकदम नीच कृत्य असून नितीशकुमारने ते अनेक वेळा केलेले आहे.
       धर्म निरपेक्ष देशात घटनात्मक पद स्वीकारताना ईश्वराच्या नावाने शपथ घेण्यावरून घटना समितीत अनेक वेळा खडाजंगी झाली. त्यात एका बाजुला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दुसऱ्या बाजुला बाकी सर्वजण असे चित्र त्यावेळी असायचे. ईश्र्वर साक्ष… अशी शपथ घेण्यास डॉ. आंबेडकरानी सतत विरोध केला. पण घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे ईश्वर साक्ष शपथेसाठी आग्रही होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांना माघार घ्यावी लागली. पण ही घेत असताना ही त्यांनी घटनेच्या ४९ कलमानुसार मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की अन् मग ईश्वर साक्ष असा शपथेचा मजकूर ठरला गेला. पण त्यावर ही घटना समितीत डॉ. आंबेडकरांना विरोध सुरूच होता. त्यावेळी मात्र ४९ कलमाचा हवाला देत त्यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, त्यांनतर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, हा मजकूर फायलनल केला आहे तोच तार्किकदृष्ट्या योग्य असल्याचे ठणकावून सांगितले.
        भारतरत्न डॉ. आंबेडकरानी जे जे इथल्या दलित, आदिवासी ,ओबीसी अन् अल्पसंख्यांक समाजाला संविधानाच्या माध्यमातून दिले आहे, ते सहजा सहजी मिळालेले नाही. त्यासाठी डॉ. आंबेडकरांना आपले रक्त आठवावे लागले आहे. रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करून मेहनत करावी लागली आहे.तेव्हा कुठे या शूद्र व अतिशूद्र गणल्या गेलेल्यांना किमान माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळाले आहेत. पण या समाज घटकांना याची जाणीव नाही. सत्ता मिळाली की त्यांना डॉ.आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना विसरतात. अन् सत्ता मिळवायची असली की, स्वतःला दलित, महादलित, आंबेडकरवादी म्हणवून घेत सत्तेची भिक मागत फिरतात. आज असे अनेक भिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *