महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या दिनांक १३/१२/२०२४ व १५/१२/२०२४, नागपूर व पूणे या पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश स्तरीय प्रदेश व जिल्हा कमेट्या बरखास्त करून पक्ष-सदस्यता व संगठनबांधनीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी काही विशेष पदाधिकारी यांची हंगामी पदाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. यापुढे पक्षाची पक्षवांधनी, सदस्यता मोहिम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व जन आंदोलन या चार कलमी कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना पक्षबांधनीचे आदेश दिले आहेत.
राज्यातील सामाजिक असंतोष परभणी, बीड सारख्या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असून राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारसमोर सुध्दा नवीन आव्हाणे उभे केली आहेत त्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी असेही ठराव या बैठकीत पास करण्यात आले. त्याशिवाय निवडणूकीत ईवीएम चा गैरवापर, काळया पैशाचा गैरवापर, शासन-प्रशासनाचा गैरवापर, आर्थिक घोटाळे व आश्वासने आणि वन नेशन वन इलेक्शन यामुद्दधावर भविष्यातही बीआरएसपी सातत्याने सुधारणासाठी व बदलासाठी प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.