- 561
- 1 minute read
बहुजन समाज शेअर मार्केट मध्ये का येत नाही ?
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली .लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान देशाच्या प्रधानमंत्री, ग्रहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी शेअर बाजार विषयी भाष्य केल्याची इतिहासात नोंद नाही.परंतु मोदी शहा आणि निर्मला सीतारामन यांनी .आचार संहिता आणि निवडणूक प्रचार सुरू असताना 4 जून रोजी शेअर बाजार तेजीत असेल आणि तुम्ही सर्वांनी गुंतवणूक करावी असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मे 2024
रोजी जाहीर सभेत म्हणाले की, 4 जूनला
शेअर बाजार सर्व विक्रम मोडेल. मोदी सरकार अधीन असलेला गोदी मीडियाने मोदी सरकार
350 जागा जिंकणार असा बनावट एक्झिट पोल प्रसिद केल्यामुळेच शेअर बाजार प्रचंड वेगाने वाढ झाली.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना मोदी शाहा यांनी गुंतवणुकीचा विशिष्ट सल्ला दिल्यामुळे 3 जून रोजी शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडले. परंतु मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत 400 सोडा 250 चा आकडा देखील पार करू शकत नाही .अश्या 4 जूनला बातम्या येऊ लागताच जो
गगनाला भिडलेला शेअर बाजार दुपार नंतर इतका जोरात आपटला की ज्यात किरकोळ गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.मोदी शहानी शेअर बाजार मध्ये केलेला हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदींनी बेकारी बेरोजगारी आणि महागाईने बेजार केले .हिंदू मुस्लिम तुष्टीकरण करून देशातील नागरिकांना आपल्याच देशात असुरक्षित वाटू लागले.जन की बात न सूननारे मोदी फक्त मन की बात करून गॅरंटी देत राहिल्यामुळे सरकारी गुप्तचर यंत्रणांला अगोदरच अंदाज आला होता की मोदी सरकार 200 ते 2020 च्या वरती लोकसभा सीट निवडून आणू शकत नाही.तरीही मोदी शहा यांनी शेअर. मार्केटच. निवडणुकीच्या तोंडावर मार्केटिंग कोणासाठी केले आहे.? असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी म्हणतात देशाच्या उच्च पदस्थ व्यक्तींनी व्यावसायिक समूहाच्या मालकीच्या मीडिया हाऊसला शेअर बाजार विषयी मुलाखती का दिल्या गेल्या?बनावट एक्झिट पोल कोणी बनविले आणि प्रकाशित केले.आणि शेअर बाजारामध्ये फेरफार कोणी केले ? याची सेबी मार्फत चौकशी झाली पाहिजे
शेअर बाजारवर गुजराती , जैन,मारवाडी, बनिया याचे वर्चस्व राहिले आहे.बहुसंख्य आंबेडकरवादी शेअर्स मार्केटला जुगार समजून शेअर्स मार्केट कडे पाठ फिरवीत आहेत. परंतु गुजराती , मारवाडी बनिया आणि व्यापारी उद्योगपती शेअर्स मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात असून त्याची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल ही शेअर्स मार्केट मध्ये आहे. आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेअर्स मार्केट सारखी मोठी संधी नाही शेअर्स मार्केट
मध्ये याच समाजाचे जास्त ब्रोकर आहेत. मुंबई सारख्या शहरात याच समाजाची बहुसंख्य शाळा कॉलेज हॉस्पिटल आहेत..यावरून त्या समाजाची प्रगती ओळखली जाते.
भारताच्या शेअर्स मार्केटवर गुजराती , मारवाडी बनिया आणि व्यापारी उद्योगपती याचे वर्चस्व असेल तरी
शेअर्स मार्केटची सुरुवात ही डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी
केल्याचे किती लोकांना माहीत आहे.जातीयतेचे स्तोम माजलेल्या काळात अस्पृश्य युवकाने स्टॉक मार्केट सारखा व्यवसाय सुरू करणे एक मोठी गोष्ट होती.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी शुक्लाजी इस्टेट येथे
1917 साली भारतात प्रथमच स्टॉक मार्केट अँड शेअर्स नावाची कंपनी सुरू केली.त्याची प्रेरणा त्यांनी लिहिलेला “दी प्रॉब्लेम ऑफ रूपि” या ग्रंथाचे कौतुक करणारे जागतिक महान अर्थतज्ञ प्रोपेसर एडविन कनन आहेत.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जगावर राज्य करीत असताना आर्थिक लूट करीत असल्याचे जगाला दाखवून देणारे डॉबाबासाहेब जगातील आर्थिक प्रबळ देशाचा शेअर्समार्केटचे तज्ञ होते.पण विदेशात दुसऱ्याच्या स्कॉलशिपवर शिक्षण घेणारे डॉ.बाबसाहेब याची आर्थिक बाजू कमजोर असल्याने शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवून पैसे कमविण्यासाठी त्याच्या कडे पैसे नव्हते.त्यांनी एकदा आपला पारशी मित्र नवल भातेकडून दोन हजार रुपये घेवून जर्मन शेअर बाजारमध्ये टाकले जर्मन चलनाचा भाव वाढल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा झाला होता
डॉ.बाबसाहेब याच्या स्टॉक मार्केट अँड शेअर्स
कंपनीला.1917 साली सुरुवातीला लोकांचा चांगला प्रतिसाथ मिळत असताना लोकांनी अचानक फायदा होत असताना देखील कंपनीकडे पाठ फिरवली. आपण अस्पृश्य समाजाचे असल्याने लोकांनी कंपनीकडे पाठ फिरवल्याची बाब त्याच्या लक्षात आली. रोजच्या पोटाची चिंता असलेला समाज शेअर्समार्केटमध्ये कुठला पैसा लावणारा ? याची कल्पना असलेले डॉ. बाबासाहेब याना पैसाच कमवायचा असता तर जगाच्या शेअर्स मार्केट. मधूनही पैसा कमावू शकले असते.पण त्यांना अस्पृश्य समाजाला सामाजिक धार्मिक आर्थिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे होते.सामाजिक परिवर्तन हा त्याचा ध्यास होता.
130 कोटी भारतातील फक्त 2% लोक शेअर मार्केटिंगमध्ये असून त्यात आंबेडकरवादी म्हणाल तर
नाच्या बराबर आहेत. शेअर मार्केटिंगला जुगार समजून त्या पासून अलिप्त राहणारा 98% हा बहुजन समाज आहे.शेअर बाजारमध्ये गुजराती जैन मारवाडी बनिया आणि व्यापारी उद्योगपती आहेत.जैन लोक महावीर
मंदिरात धार्मिक श्रध्दाने जात असेल तरी तेथे शेअर्स मार्केटच्या मिळालेल्या टिपवर लाखो करोडो रुपये कमावतात.त्यांना सामाजिक धार्मिक कार्यासाठी वर्गणी मागण्याची गरज भासत नाही.दानशूर व्यक्ती स्वयं पुढे येवून लाखो करोडो रुपये खर्च करीत असल्याने प्रत्येक शहरात गुजराती जैन मारवाडी बनिया याची शाळा कॉलेज हॉस्पिटल दिसतात.
डॉ.बाबसाहेब यांनी स्टॉक मार्केट अँड शेअर्स नावाची कंपनी निर्माण करून 107 वर्ष झाली.आम्ही त्याचा आदर्श घेवून शेअर्स मार्केट मध्ये उतरले पाहिजे.
त्याचा अभ्यास करून आपल्या समाजाला त्यात सहभागी करून घेण्यासाठी ब्रोकर बनले पाहिजे .तशी शेअर्स मार्केटच्या समाजात कार्यशाळा सुरू केल्या पाहिजेत.डॉ.बाबसाहेब याचा दर रविवारी चला बुद्ध विहारी या मागचा उद्देश होता की आमची बुद्ध विहार
ही धम्मज्ञानाची , संस्काराची , शिक्षणाची ,आरोग्याची आणि आर्थिक विकासाची केंद्र बनली पाहिजेत.
जगातील महान अर्थतज्ञ डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे आम्ही वारस त्याचा आदर्श घेवून बहुजन समाजाला आर्थिक साक्षर करण्याची गरज आहे.गरिबिवर मात करून आदर्श संसार कसा करावा यासाठी महिलांनी
रमाईचे अर्थशास्त्र शिकण्यासारखे आहे.मानवी जीवनाचे मंगल होण्यासाठी बुध्दाच्या अर्थशास्त्राची भारतालाच नव्हे तर जगाला गरज आहे.याचा गरीब नाही तर निदान आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या बहुजन समाजाने विचार करून व्यक्ती समाज याच्या उन्नतीसाठी शेअर्स मार्केट उतरून बहुजन समाजाने यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले पाहिजे.कारण बहुजन समाज जो पर्यंत यात सहभागी होतं नाही.तो पर्यंत जगाच्या शेअर्स मार्केटवर
वर्चस्व प्रस्थापित होणार नाही कारण जगाच्या शेअर्स मार्केट मध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे.
जगातील पहिल्या क्रमांकावर संयुक्त राज्य अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील लोअर मॅनटॅटनमध्ये असून 2400 कंपन्या लिस्ट एकूण मार्केट कॅप 25 लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा नॅसडेकवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 20 लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे.तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या संघाई स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून चायना मोबाईल सारख्या कंपन्या लिस्टेड आहेत. याचं मार्केट कॅप 6.6 कोटी डॉलर आहे.
चौथ्या क्रमांकावर यूरोपमधील स्टॉक एक्सचेंज असून 1500 कंपन्या लिस्टेड=असून त्याचा मार्केट कॅप 6.2 लाख कोटी रुपये डॉलर आहे.पाचव्या क्रमांकावर
जापान स्टॉक एक्सचेंज किंवा टोक्यो स्टॉक एक्सचेंज या यादीत पाचव्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवसाय करणाऱ्या लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट व्हॅल्यू 5.75 लाख कोटी डॉलर आहे.सहाव्या क्रमांकावरचीनचा शेनजेन स्टॉक एक्सचेंज ,चीनचे दुसरे मोटे स्टॉक एक्सचेंज असून यावर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप 4.38 लाख कोटी डॉलर आहे.तर
सातव्या क्रमांकावर भारतातील नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. एनएसई भारतातील 2 प्रमुख स्टॉक एक्सचेंजमधून एकआहे. याचं मार्केट कॅप 4 लाख कोटी डॉलरपेक्षा अधीक आहे. भारतातील दुसरे स्टॉक एक्सचेंज बीएसई देखील त्याच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपच्या बाबतीत 4 लाख कोटी डॉलरच्या आसपास आहे.
सत्ताधारी सर्वच पक्ष गरिबी हटाव म्हणतात पण गरिबी हटविण्यासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी त्याला
शेअर्स मार्केट मध्ये सामावून का घेत नाही ? यावर विचारांथन होणे काळाची गरज आहे.
– आनंद म्हस्के