• 27
  • 1 minute read

बापू हम शर्मिंदा है क्योंकी, तेरे कातील अभी तक जिंदा है। – जगदीश काबरे

बापू हम शर्मिंदा है क्योंकी, तेरे कातील अभी तक जिंदा है। – जगदीश काबरे

‘चित्रपटामुळे महात्मा गांधी जगाला माहित झाले’ हे पंतप्रधानांचे विचार सांगणारी बातमी वाचली आणि लक्षात आले की, पंतप्रधान ज्या पॉलिटिकल सायन्स विषयात पदवी मिळवणारे आहेत त्या विषयामध्ये राजकीय इतिहासाचा अंतर्भाव नसावा. त्यामुळेच ते असे बोलू शकले. कारण गांधी चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो आणि निर्माता बेन किंग्जले यांच्या जन्मापूर्वीपासूनच गांधीजींना जग ओळखत होते. त्याचे काही पुरावे सापडतात ते असे…
✅१९०९ सालापासून प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलेस्टॉय गांधीजींना ओळखत होते. कारण त्यांचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता.
✅१९२० सालापासून हो चि मिन्ह यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे.” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत,” असेही ते म्हणाले होते.
✅१९३१ सालीच जगप्रख्यात टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर गांधी झळकले होते.
✅१९३१ सालीच अल्बर्ट आईन्स्टाईन गांधींना पत्र लिहिले. त्यात आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता.”
✅१९३१ साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी गांधींची भेट घेतली होती.
✅१९४० साली नेल्सन मंडेला यांना गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढता येतो हे समजलं. त्याने प्रभावित होऊन त्यांनी गांधींचा सत्याग्रही मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चोखाळला म्हणून नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हटले जाते.
✅१९४० सालीचा मानव अधिकार कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग यांना गांधीपासून प्रेरणा मिळते आणि ते वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारतात. (तरीही मोदी कसे काय म्हणू शकतात की, जगाला मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला बद्दल माहिती असेल तर गांधीजींची अशी ओळख का असू नये?)
✅१९४२ साली लुई फिश्चरने गांधींची भेट घेतली होती आणि प्रभावित होऊन १९६२ साली त्यांनी गांधी चरित्र लिहिले.
✅१९४८ साली एका माथेफिरू हिंदू दहशतवाद्याने गांधीहत्या केली. त्याची दखल जगभरातील सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर घेणारी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ३४ वर्षांनी म्हणजे १९८२ साली बेन किंग्जले निर्मित आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला.

जगात गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढेच काय पण जगातील बहुसंख्य देशात गांधीजींचे पुतळे उभारले गेलेले आहेत.

थोडक्यात गांधीजींच्या हयातीत आणि नंतरही रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट येईपर्यंत गांधीजींना जग ओळखत होते याचे हे पुरावे असूनसुद्धा इतकं सगळं स्पष्ट असताना मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी, उर्फ राष्ट्रपिता, उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार, उर्फ अहिंसेचे पुजारी, उर्फ सत्याग्रहाचे जनक ‘गांधी चित्रपट येईतो गांधीजी किती मोठे होते हे जगाला माहिती नव्हते’, असे विधान करणाऱ्या मोदींना हे कळायला हवे होते की, गांधीजींना जगभर ओळखणारे लोक नसते तर रिचर्ड अटेंबरोंना त्यांच्यावर चित्रपट काढण्याची प्रेरणा कशी मिळाली असती?

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ असे त्यांना संबोधले तेव्हा या इलाॕजिकलचा बायलाॕजिकल जन्मही झाला नव्हता.

दंगलग्रस्त नौखालीमध्ये बापूजी एकटे निधड्या छातीने गेले; मात्र अनापशनाप बरळणारे आणि 56 इंच छातीचा गर्व करणारे मोदी महाशय मणिपूरमध्ये जायची हिंमत अद्याप का दाखवू शकत नाहीत ?

0Shares

Related post

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”…
आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

विधानसभा निवडणुकीतील 4,140 उमेदवारांमध्ये रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी विचारांच्या 19 पक्षांचे अन अपक्ष बौद्ध उमेदवारांची संख्या 2040…
अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

नशेच्या प्रकरणावरून मानखुर्द – शिवाजीनगरमधील जनतेची बदनामी सहन केली जाणार नाही…. अबु आजमी यांचा अजित पवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *