• 90
  • 1 minute read

बाबासाहेबांना भारतरत्न मिळवून देण्यात आमचा मोठा वाटा – प्रकाश आंबेडकर

बाबासाहेबांना भारतरत्न मिळवून देण्यात आमचा मोठा वाटा – प्रकाश आंबेडकर

काँग्रेस, भाजप - आरएसएस कडून बाबासाहेबांची नेहमी उपेक्षाच झाली

मुंबई :  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचा दावा करत काँग्रेस आणि भाजप-आरएसएसवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्याकडे विशेष आग्रह केला होता.
      प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर काही समर्पित आंबेडकरवादी आणि समाजवादी नसते, तर काँग्रेस आणि भाजप-आरएसएसने बाबासाहेबांना इतिहासातूनच नाही तर वर्तमान आणि भविष्यतूनही पूर्णपणे पुसून टाकले असते.
       डिसेंबर १९८९ मध्ये व्ही.पी. सिंह यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या हस्तेच ३१ मार्च १९९० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. या सन्मानासाठी त्यांनी स्वतः व्ही.पी. सिंह यांच्याकडे आग्रह धरला होता, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.
     या विधानाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप-आरएसएसवर आंबेडकरांविषयी  असलेल्या ऐतिहासिक द्वेषाचा आणि उपेक्षेचा आरोप केला आहे.
 
 
0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *