• 144
  • 1 minute read

बाबासाहेब – माता रमाई आंबेडकर: विवाह स्थळाचे स्मारक…

बाबासाहेब – माता रमाई आंबेडकर: विवाह स्थळाचे स्मारक…

बाबासाहेब – माता रमाई आंबेडकर: विवाह स्थळाचे स्मारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा ज्या ज्या मातीवर उमटल्या त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे- येत आहे, परंतु त्यांच्या आयुष्यातल्या विवाह या अत्यंत महत्वाच्या क्षणाचे स्मारक उभारण्यात आले नाही. भीमराव आंबेडकर यांचा विवाह दिनांक०४ एप्रिल १९०६ रोजी मुंबईच्या हबीब मासळी मार्केट, सुंदर गल्ली, भायखळा (पश्चिम) येथे रात्री आठ नंतर पार पडला. या ठिकाणी बाबासाहेब व आईसाहेब यांच्या विवाहाची स्मृती जागवावी म्हणून तेथे स्मारक उभारले जावे यासाठी दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार शिवसैनिक मा. अरविंद सावंत यांची ज. वि. पवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २९ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता एका शिष्टमंडळाने भेट घेतली व निवेदन सादर केले. मा. सावंत साहेबांनी याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतली व महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात ज. वि. पवार, सचिन आवारे, शिवसैनिक हेमंत कदम, विश्वनाथ जाधव, शुभम खळदे, जिया शेख व गंगाराम जाधव यांचा समावेश होता.

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *