• 99
  • 1 minute read

बाबुराव बागुल उर्फ आबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त…!

बाबुराव बागुल उर्फ आबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त…!

काल दिनांक २६/३/२०२४ रोजी आदरणीय बाबुराव बागुल उर्फ आबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त व बुद्धीप्रिय कबीर याच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त दलित चळवळीचा बालेकिल्ला राहिलेल्या वरळीच्या बीडीडी चाळीच्या आर.डी. भंडारे चौक, ‘इंजिनछेडा’ येथे माझ्या ‘काॅम्रेड, जयभीम’ या दीर्घकविता संग्रहाचे ( उद्देशिका) प्रकाशन ज्येष्ठ दलित कवी, विचारवंत आ. अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. औरंगाबाद येथील रस्त्यावर उतरून तहहयात सामाजिक काम केलेल्या संजय उबाळे उर्फ बुद्धप्रिय कबीर या कार्यकर्त्या मित्रावरील कवितेचे प्रकाशन मुद्दामहून बीडीडी चाळीत करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ आंबेडकरी लेखिका+ कार्यकर्ती प्रा. आशालताताई कांबळे, शोभा बाबुराव बागुल, काॅम्रेड सुबोध मोरे, काॅम्रेड श्रीधर पवार, विवेक मोरे यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला प्रा.अविनाश कोल्हे, अरुण वाघ, सतीश धीवर, बंधुराज लोणे,डॉ. रेवत कानिंदे Rewat Kaninde , अविनाश उषा वसंत Avinash Usha Vasant राज आसरोंडकर , कुणाल रामटेके, विनायक कोलवणकर, बंधू प्रसेनजीत, सुनील खांडेकर, नितीन बनसोड, काॅम्रेड पंकज आणि माझे असंख्य विद्यार्थी+कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली विनायक हिने केले, तर आभार प्रदर्शन डॉ.मंगेश बनसोड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीडीडी चाळीतले आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आदरणीय बंधू अजयकुमार भोसले, अमोल निकाळजे, शोभाताई यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास दलित पँथरचे अनेक जुने कार्यकर्ते आणि समकालीन आंबेडकरी+ डाव्या चळवळीतील स्नेही आवर्जून उपस्थित होते.
.. पुस्तक प्रकाशनाची नेहमीची वाट नाकारुन रस्त्यावर उतरून काम करणार्या एका कार्यकर्त्यावर लिहिलेल्या दीर्घकाव्याचे असे प्रकाशन करताना निश्चितच समाधान होते. अर्थात आजच्या गढूळ वर्तमानावर समकालीन मित्रांनी रस्त्यावर एकत्रितपणे येऊन आपल्या भूमिका घेऊन बोलणं.. हाही एक मोठा वैचारिक हस्तक्षेपच होता.
( कार्यक्रमाचे फोटो आपल्यासाठी)
– श्यामल गरुड
(या संग्रहाचे आणखीन एक प्रकाशन दिनांक २४/३/२०२४ रोजी नागपूर येथे जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील विचारवंत+पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, Ranjit Meshram ज्येष्ठ आंबेडकरी सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे, माझी मैत्रीण आणि आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ती छाया खोब्रागडे, Chhaya Khobragade , ज्येष्ठ रंगकर्मी संजय जीवने यांच्या हस्ते झाले. याच संग्रहाचे तिसरे प्रकाशन लवकरच औरंगाबाद येथेही होणार आहे.)

0Shares

Related post

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *