• 8
  • 1 minute read

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

40 वर्ष समाजाने कुठलीच काचाकुच न करता adv.Prakash Ambedkar त्यांचेवर विश्वास ठेवला..आता त्यांनी प्रथम या 40 वर्षाचे रिपोर्ट कॉर्ड समाजापुढे ठेवावे..बाबासाहेबांनी आपल्या 35-36 वर्षाच्या कार्याचे 27 ऑक्टोबर 1952 रोजी पंजाबमधील जालंदर येथील सभेत स्वतःचे रिपोर्ट कार्ड जाहीर सभेत मांडले होते. तस यांनी करावे आणि नंतर समाजाला हा उपदेश करावा..एड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण कायम धरसोडीचे, कोणतीही भरीव गोष्ट किंवा मजबूत चळवळ उभी राहू न देण्याचे आहे. एक प्रकारे त्यांचा कल काहीतरी सोल्युशन देणारे निर्माणात्मक राजकारण करण्याऐवजी आहे ते विस्कटून टाकणारे राजकारण करण्यावर आहे असे दिसते. जेथे काही होताना दिसते त्या ठिकाणी खोड़ा घालायचा, कोणालाही टिकू द्यायचे नाही आशा वृत्तीने ते राजकारण करतात. एड. प्रकाश आंबेडकरांसोबत सुरुवातीच्या काळात व त्यानंतरच्या विविध टप्प्यात नीलम गोऱ्हे, निळू फुले, राम नगरकर, शांताराम पंदेरे, माधवराव नाईक (हिंगोली), हरिभाऊ शेळके (नांदेड), माधवराव पिसाळ (पूर्णा), अनंत पाटील (मंगरूळ पीर), लिंबाजी गाभणे (शिरपूर), डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे (गणेशपूर), मखराम पवार, रामदास बोडके, सुखदेवराव जाधव, प्रसेनजीत पाटील, हनुमंतराव उपरे, डॉ. सुभाष राठोड, डॉ. सुभाष पटनाईक (प्राचार्य अकोला) ही वेगवेगळ्या जातीतीत नेतेमंडळी सोबत होती. यापैकी एकालाही प्रकाश आंबेडकरांनी मोठे होऊ दिले नाही.यापैकी अनेकांनी निवडणुकीत लक्षणीय मते मिळवूनही त्यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले नाही. मखराम पवार यांना अपमानित करून राजीनामा देण्यास भाग पाडले.
 
भाजपचे प्रमोद महाजन यांना विजयी करण्यासाठी नीलम गोऱ्हे हिला उभे करण्यात आले ही बाब जेंव्हा तिच्या लक्षात आली तेव्हा नीलम गोऱ्हेनी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष सोडला. महादेव राठोड मंगरुळपीरहून १९९९ मध्ये भारिपकडून उभे होते आणि केवळ १३०० मतांनी पडले. डॉ. गाभणे २००० मतांच्या फरकाने पडले. यांना प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्यांदा तिकीट दिली नाही. प्रा. हनुमंतराव उपरे १० वर्षे भारिपचे अध्यक्ष होते. त्यानाही प्रकाश आंबेडकरांनी हाकलून लावले. बौद्धांपैकी राजा ढाले, अविनाश महतेकर,अर्जुन डांगळे, प्रा.रणजीत मेश्राम ( नागपूर ) सुरेश गायकवाड ( नांदेड), बाबुराव पोटभरे (बीड) चंद्रकांत हंडोरे (मुंबई) प्रा.अविनाश डोळस,एड.वैशाली चांदणे (पुणे),उज्वला जाधव, भीमराव केराम,एल.के.मडावी अशा कितीतरी नेत्या/कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरची प्रकाश आंबेडकरांनी अक्षरशः माती केली आहे. वंजारा, बारी, आदिवासी, हटकर, धनगर, कुणबी, मराठा, मातंग अशा कितीतरी जातीतील दमदार नेते/कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत दिलेल्या वेगवेगळ्या घोषणांकडे आकर्षित झाले. त्यांना एकदा निवडणुकीत उभे केले गेले. या उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली.त्यांचा आपण ‘निवडणूक जिंकू शकतो’ असा जेव्हा आत्मविश्वास वाढला त्यावेळी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले किंवा तिकीट नाकारण्यात आले. प्रत्येक निवडणुकीत पक्ष-आघाडीचे नवीन नाव घ्यायचे,नवी घोषणा द्यायची, नवीन लोकांना आकर्षित करायचे. यानुसार आपला उमेदवार किती मतं घेऊ शकतो, हे जोखायचं आणि दुसऱ्यांदा त्याच्या मतांवरून सौदा करायचा असा पॅटर्न प्रकाश आंबेडकर प्रत्येक निवडणुकीत अवलंबितात. २०१९ मध्ये त्यानी भारिपच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना अडगळीत टाकुन रा.स्व. संघाचा कट्टर कार्यकर्ता, मनोहर भिडेचा विश्वासू सेवक गोपीचंद पडळकर यांस प्रकाश आंबेडकरानंतरचा वंचित आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे केला.त्याला लोकसभेत लक्षणीय मते मिळाली त्यानंतर तो भाजप मध्ये प्रवेश करून आमदार झाला. २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभा तसेच विधानसभा निवडणुक लढविणारे बहुतेक सर्व लोक आता अन्य पक्षात निघून गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी ‘सर्वांना सोबत घेऊ, सत्ताधारी बनू ‘भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ ‘माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष’ मी लाचारी पत्करणार नाही, स्वाभिमान अशा काहीतरी नावाने जुनेच प्रयोग नव्या नावानिशी करायचे व निवडणूक संपली की जुने सहकारी, नेते,कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे.आंबेडकरी राजकारण वाऱ्यावर सोडून द्यायचे ही एड. प्रकाश आंबेडकरांची कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती दलित/बौद्ध/वंचित यांच्या हितांपेक्षा ब्राह्मणी राजकारणाचे हित जपणारी आहे असे खेदाने म्हणावे लागते. त्यांच्या या धरसोड वृत्तिमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकित त्याना जेवढी मते मिऴाली ती केवळ तीन महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निम्म्यावर आली होती. मागील ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यानी कधीही कोणताही मुद्दा सातत्याने लावून धरलेला नाही.मा. प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरवादी चळवळीच्या सक्षमीकरणासाठी काय केले? मा. प्रकाश आंबेडकरांमध्ये एक आडनाव सोडले तर त्यांचे राजकिय धोरण बाबासाहेबांच्या चळवळीशी, तत्त्वज्ञानाशी खरेच सुसंगत आहे काय? मा. प्रकाश आंबेडकरांकडे सामाजिक आणि राजकीय उन्नतीचा कोणता कार्यक्रम आहे? मा. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दलितांच्या, बौद्धांच्या, वंचितांच्या भल्यासाठी काय केले याचा लेखाजोखा मांडला तर एक मोठे शून्य याशिवाय काहीही दिसणार नाही
एड. प्रकाश आंबेडकरानी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी किंवा समाजासाठी काही कन्स्ट्रक्टिव्ह काम केले काय ? 
वंचितभक्त आठवले, गवई,कवाडे कुंभारे यांच्यावर सतत टीका करीत असतात. या मंडळीच्या राजकारणाचे मी कधीही समर्थन केले नाही. मात्र यांच्यापैकी कवाडे वगळता आठवले, गवई, कुंभारे यांनी किमान समाजातील काही लोकांचे नक्कीच भले केले आहे.दिवंगत गवई यानी शाळा, महाविद्यालये काढली त्यात बरेच बौद्ध प्राध्यापक इत्यादी नोकरीस लागले. त्यांनी त्यांच्या बर्‍याच कार्यकर्त्यांना पेट्रोल पंप, दारु दुकानाचे लायसेन्स वगैरे मिळवून दिले व कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम केले. त्यांनी नागपूरची दीक्षाभूमी विकसित केली. आठवलेनी बौद्धांमधील काही जणांना आमदार, राज्यमंत्री केले. काहीना महामंडळाचे सदस्य इत्यादी केले. काहीना उद्योग होटल इत्यादी स्थापना करण्यास मदत केली. अनेक अधिकार्‍यांना बदली, पोस्टिंग विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत सहाय्य केले. सुलेखा कुंभारे यानी कामठी येथे ड्रॅगन पॅलेस सारखे धार्मिक पर्यटन स्थळ, स्मारक विकसित केले. त्यांच्या NGO मार्फत अनेकांना सहाय्य केले.बिडी कामगारांना पगार, बोनस वाढविण्यासाठी चळवळ चालवून रिजल्ट मिळवून दिला. एड. प्रकाश आंबेडकरानी त्यांच्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी किंवा समाजासाठी महाराष्ट्रात सोडा पण त्यांच्याy राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या अकोल्यात तरी काही कन्स्ट्रक्टिव्ह काम अथवा कोणा कार्यकर्त्यांस काही सहाय्य केले आहे काय? हा निश्चितच विचारणीय प्रश्न आहे.
     मा. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या चळवळीला …..?
 बाबासाहेब म्हणात मी माझ्या समाजाने मोठा झालो,हे महाराज आपल्याच लोकांना शिव्या देतात, प्रकाश आंबेडकर यांनी अंधभक्त निर्माण केलेत.
    
   
 -प्रा.उत्तम कांबळे.
 
 
 
 
0Shares

Related post

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी मुंबई/अमरावती, राज्यात कोयता…

घर हक्क परिषद

घर हक्क परिषद मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक…

समाज दिशाहीन झाला – विसरा पदवी – पदाला

समाज दिशाहीन झाला – विसरा पदवी – पदाला  मी नुकताच चारकोप कांदवली मध्ये राहण्यास आलो होतो.…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *