- 7
- 2 minutes read
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन…!!

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन…!!!
बौद्ध राष्ट्रांनी बुद्धगया आणि इतर बौद्ध स्थळांची व्यवस्था आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे या एडविन अर्नोल्ड यांनी ” लाईट ऑफ एशिया” या आपल्या ग्रंथात केलेल्या आवाहनाला सर्वच बौद्ध राष्ट्रांनी सहमती व आस्था दाखवली. श्रीलंकेतील(डेव्हिड हेववितरणे)अनागरीक धम्मपाल यांनी त्यासाठी जोरदार चळवळ सुरू केली ही चळवळ चालवताना संघटनात्मक अधिष्ठान असावे म्हणून 1891 मध्ये त्यांनी महाबोधि सोसायटीची स्थापना केली. सोसायटीचे आश्रयदाते (पॅट्रन) म्हणून तिबेटचे ग्रॅन्ड लामा आणी अध्यक्ष म्हणून सिलोन चे प्रधान नायक महाथेरो आदरणीय एच.सुमंगला यांची निवड झाली होती. महासचिव म्हणून अनागरीक धम्मपाल यांचे नाव निश्चित होऊन सियाम, जपान, सिलोन, बर्मा, आराकान, चितगाॅंन्ग ,दार्जिलिंग, कलकत्ता, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क येथील प्रतिनिधी सोसायटीवर घेण्यात आले होते.
महाबोधी सोसायटीच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बौद्ध राष्ट्रांना बुद्धगया येथे आपापली विहारे बांधता आली पाहिजेत. त्याप्रमाणे आज आपल्याला बुद्धगयामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांची बौद्ध विहारे शेजारी शेजारी बांधलेली दिसतात.
महाबोधी सोसायटीचे दुसरी दोन प्रमुख उद्दिष्टे म्हणजे नालंदा विश्वविद्यालयाच्या धर्तीवर एक विद्यापीठ तयार करून भिक्खू संघाची निर्मिती करणे आणि या देशात बुद्ध धम्माचे पुनरुत्थान करणे. ही उद्दिष्टे गेल्या 135 वर्षांमध्ये साध्य झाल्याचे दिसत नाही.
हिनयानी, महायानी देशांच्या उपस्थिती मुळे महाबोधी सोसायटीची अडचण निर्माण झाली असावी की भारतात नेमके कोणत्या प्रकारच्या बुद्ध धम्माचे पुनरुत्थान करायचे.
यासाठी महाबोधी सोसायटीला धम्म प्रसाराच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “Buddha and the future of this religion”
या शीर्षकाने आपले विचार या लेखाद्वारे कलकत्ता स्थित महाबोधी सोसायटीला पाठवले होते. तो लेख “महाबोधी”च्या एप्रिल- मे 1950 या द्वैमासिकात प्रकाशित झाला होता. त्या लेखामध्ये बाबासाहेबांनी केलेल्या सूचनांमध्ये:
१)इतर धर्मात जसा एक मान्यता प्राप्त सर्वसमावेशक धर्मग्रंथ आहे जसा ख्रिश्चनांचा बायबल, मुस्लिमांचा कुराण, इराणींचा अवेस्ता आणि हिंदूंचा भगवद्गीता, त्या नुसार बुद्ध धम्म जाणून घेण्याकरता एखाद्याला त्रिपिटकातील ग्रंथांच्या जंगलात शिरायला न लागता एका ग्रंथातूनच त्याला त्याची माहिती मिळाली पाहिजे.
२) भिक्खू संघाच्या ध्येय धोरणाबाबत व संघटनेत फेरफार करणे- आताचे भिक्खू ते नुसते बुद्धिमान असून भागणार नाही तर ते दुःखी लोकांची सेवा करायला तत्पर असायला हवेत.
३)एका जागतिक बौद्ध मिशनची निर्मिती करणे.
इत्यादींचा समावेश आहे.
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा सर्वसमावेशक एकच ग्रंथ महाबोधी सोसायटी निर्माण करू शकली नाही. “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ बाबासाहेबांनी स्वतःच आपल्या आयुष्याचे शेवटी लिहून काढला. परंतु त्यांच्या हयातीत त्या ग्रंथाचे प्रकाशन होऊ शकले नाही. जेव्हा तो 1957 साली “पीपल्स एज्युकेशन सोसायटी” या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित संस्थेकडून कडून प्रकाशित झाला, त्यावर महाबोधी सोसायटीने टीका केली होती. ज्यांनी ज्यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा बाबासाहेबांचे ग्रंथ वाचला असेल त्यांच्या हे निदर्शनास आले असेल की बुद्ध धम्मात मूलभूत म्हणून मांडले गेलेल्या आणि सर्वसंमत असणाऱ्या अंधश्रद्धेच्या जवळ नेणाऱ्या काही बाबींना बाबासाहेबांनी छेद दिला आहे.व बुद्धांची मुळ शिकवण किंवा धम्माचे खरे सारं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे व काही आर्य सत्या बाबत महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत.
बौद्ध धर्मातील वैशिष्ट्य सांगताना बाबासाहेबांनी महाबोधी अंकातील लेखात सांगितले होते की,
“The Buddha claimed no such infallibility for what he taught in the mahaparinirbbana sutta. He told Ananda that, his religion was the based on reason and experience and that is followers should not accept his teaching as correct and binding nearly because they emanated from him. Being based on reason and experience they were free to modify or even to abandon any of his teachings if it was found that at a given time and given circumstances they did not apply.He wished his religion not to encumbered with the dead wood of the past. He wanted that it should remain evergreen and serviceable at all times. that is why he gave liberty to his followers to chip and chop as the necessities of the case required.”
बाबासाहेबांची ही विचारसरणी महाबोधी सोसायटीच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे महाबोधी सोसायटीला जे करणे शक्य झाले नाही ते बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी करून दाखवले आहे. या देशात त्या दिवशी बुद्ध धम्माची पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती प्रक्रिया अशी सुरू झाली आहे त्याचे वर्णन महापंडित राहुल सांस्कृत्यायन यांनी असे केले आहे की “डॉ.आंबेडकर ने इस देश मे बुद्ध धम्म का झंडा इस तरह गाड़ दिया है कि अब उसे उखाड फेंकना संभव नही।”
विहार सरकारच्या 1949 च्या कायद्यान्वये शैव महंतांची मालकी काढून “महाबोधी महाविहार व्यवस्थापन समिती” कडे आली आहे. पण कायद्यान्वये स्थापन केलेल्या व्यवस्थापन समितीतही बौद्ध अल्पसंख्यांक ठेवून हिंदू बहुसंख्य ठेवले आहेत. एवढ्यासाठी ही अनागरिक धम्मपालांना आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागला. वास्तविक पाहता बिहार सरकारचा 1949 चा कायदा व्हायच्या अगोदरच 1933 मध्ये अनागरिक धम्मपालांचे निधन झाले. परंतु तो कायदा म्हणजे 1891 सालापासून सतत केलेल्या प्रयत्नचे फलित होय.पण हे सुद्धा आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे चे झाले.धम्मपालांच्या नंतर भंते नागार्जुन सूरई ससाई यांनी आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली. अल्पावधीतच त्यांनी आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळवला. आंदोलनाला यश येण्यासारखी परिस्थिती निर्माण होताच भारत सरकारने त्यांना अल्पसंख्यांक आयोगावर सदस्य म्हणून नेमले. परिणामी आंदोलनाला खिळ बसल्यासारखे झाले. भंते आनंद देव आणि भंते प्रज्ञाशिल यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती. अनेक ठिकाणी शिबिरे संमेलन घेऊन या प्रश्नावर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला.
आजच्या घडीला डाॅ.भीमराव यशवंतराव आंबेडकर व ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे जनआंदोलन उभे रहात आहे.
बिहार सरकार व भारत सरकार यांच्या शी संपर्क साधून कायदेशीर रित्या विहार ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. यामध्ये त्यांना गरज आहे सर्वसामान्य जनतेच्या सहभागाची तो सहभाग देण्याची सर्वच बौद्ध बांधवांनी(जरी ते कोणत्याही पक्षात किंवा गटात किंवा कोणत्याही संस्थेत असले तरी) तसेच समविचारी इतर धर्मियांनी,सर्वांनी तयारी दर्शवणे सर्वांचे कर्तव्य आहे.
(टिप:वरिल पोस्ट मध्ये जे जे माझ्या वाचनात आले त्यावरून लेखन केले आहे,जर कांहीं करेक्शन असतील तर ते जरूर कळवा.आपला उद्देश,महाबोधी महाविहार मुक्त करणे हा आहे.”माझे ज्ञान दाखवणे किंवा कोणाचे बघणे” हा उद्देश अजिबात नाही.)
– कांबळेसर, बदलापूर ठाणे