महाबोधी महाविहार येथे इतसिंग दहा दिवसाचा पैदल प्रवास करून पोहोचणार होता. जाताना मार्गामध्ये एक मोठा पर्वत आणि दलदलीचा भाग होता, हा घाट भयानक आणि प्रवासासाठी अतिशय कठीण होता. म्हणून हा प्रवास लोक समूहाने करीत होते. एकट्याने प्रवास करण्यासाठी हा रस्ता सुरक्षित नव्हता.
अशा वातावरणात इतसिंग च्या शरीरावर रोगाचे आक्रमण झाले; त्याची शरीर अतिशय थकून शक्तीहीन झाले होते. अशा परिस्थितीत त्याने व्यापाऱ्यांच्या एका समूहाच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु थांबल्यामुळे आणि आजारी असल्या कारणामुळे इतसिंग त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायला a असमर्थ ठरला. तरीपण इतसिंग खूप जोर लावून चालण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु पाच चिनी मैल चालल्याने सुद्धा त्याला शंभर वेळा थांबावे लागत होते.
तेथे नालंदाचे जवळपास 20 भिक्खू होते आणि त्यांच्यासोबत आदरणीय तेंग सुद्धा होता. ते सर्व पुढे निघून गेले होते. त्यामुळे इतसिंग एकटाच मागे राहून गेला होता आणि कोणीही सोबत मित्र नसताना भयानक धोकादायक मार्गाने तो चालत होता.
सायंकाळची वेळ होती. तेव्हा सूर्य अस्ताला जात होता, काही पहाडी डाकूंनी त्याला घेरले. धनुष्य बाण ताणून आणि जोराने ओरडून आणि चिडून त्यांनी इतसिंकडे क्रूर नजरेने पाहिले. त्यानंतर त्यांनी एक एक करून सर्वांनी त्याचा अपमान केला. पहिले त्या डाकूंनी त्याच्या शरीरावरचे वरील वस्त्र हिसकावून घेतले त्यानंतर खालील वस्त्र सुद्धा काढून घेतले. इतसिंग जवळ जेवढे काही कमरेला बांधण्याच्या दोऱ्या आणि महत्त्वाचे साहित्य होते ते सर्व हिसकावून घेतले.
आता इतसिंगला आपल्या जीवनाचा अंतिम क्षण दिसत होता. त्याला वाटले आता हे जग सोडून जाण्याचा क्षण जवळ आलेला आहे. भारताची यात्रा करण्याची माझी इच्छा पूर्ण होणार नाही. जर त्यांनी माझ्या शरीराला टोकदार भाल्याने चिरून टाकले असते तर मी दीर्घ काळापासून निर्धार केलेले भारतामध्ये जाण्याचे कार्य कधीच पूर्ण करू शकलो नसतो.
याव्यतिरिक्त भारताच्या पश्चिमेकडील भागासंबंधी ईतसिंगने ऐकले होते की जेव्हा हे डाकू कोणत्याही गोऱ्या रंगाच्या मनुष्याला पकडतात, तेव्हा ते त्याला ठार करून बली देतात. हे जेव्हा इतसिंगला आठवले तेव्हा त्याच्या मनातील भीती दुप्पट झाली.
त्यानंतर इतसिंग एका मातीच्या गाऱ्याने भरलेल्या बिळात घुसून आपल्या संपूर्ण शरीराला गारा लावून घेतला. आणि झाडांच्या पानांनी स्वतःला झाकून घेतले आणि काठीच्या सहाऱ्याने हळूहळू चालू लागलो. असा जीवघेणा कठीण प्रवास करून हितसिंग बुद्धगया येतील महाबोधी महाविहारा पर्यंत पोहोचला होता.
इतसिंग हे धाडस केवळ बुद्धाच्या पावन भूमीचे दर्शन घेण्यासाठी केले होते. हीच तळमळ जिद्द आणि धाडस भारताच्या भिक्खूंमध्ये असायला हवी.
सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले
19/06/2025,7972722081