प्रवाश्यांच्या खिश्याला भुर्दंड ठरणारी बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ त्वरित मागे घ्या !!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अंधेरी पूर्व येथे भाववाढी विरोधात तीव्र निदर्शने
बुधवार दिनांक 14 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अंदेरी पूर्व आगरकर चौक येथे बेस्ट भाववाढ विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. बेस्ट डेपो समोर करण्यात आलेल्या या आंदोलनात 35-40 लोक सहभागी ओते. तसेच भाव वाढ त्वरित मागे घ्या या अर्थाची 1 हजारहून अधिक पत्रके वाटण्यात आली. प्रवाश्यांचा जबरदस्त पाठिंबा या कार्यक्रमाला लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ के नारायण यांच्या जबरदस्त घोषणांनी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अध्यक्षस्थान पक्षाचे तालुका सचिव कॉ चंद्रकांत बोजगर यांनी केले. जिल्हा कमिटी सदस्य कॉ कमल रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बेस्ट च्या क्षेत्रात काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या कॉ लता साळवी यांनी ही भावाढ म्हणजे कंत्राटदारांना मजबूत करण्याचे धोरण असल्याहके सांगितले. निवृत्त बेस्ट कामगार कॉ. बशीर अहमद यांनी बेस्ट भाववाढ काशी अन्यायकारक आहे हे आपल्या अभ्यास पूर्ण भाषणात सांगितले. पक्षाच्या तालुका समिति सदस्या कॉ अंजु दवे, कॉ. रुहुल अमिन, कॉ अँथोनी ग्रॅब्रियल यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणांनी सरकारचे सामान्य जनविरोधी धोरण उघडकीस आणले, कॉ माधुरी बोजगर कॉ राजेंद्र जाधव यांनी देखील जबरदस्त घोषणा दिल्या.
वाहतूक क्षेत्रात काम करीत पक्षाचे तालुका समिति सदस्य कॉ जगनारायण गुप्ता यांनी बेस्ट बस मध्ये सुधारणा आणि त्यांनाची संख्या वाढविण्याची गरज असताना देखील हे सरकार ते काम करीत नसून कंत्राटदारांना वाहतूक व्यवस्था आंदण दिली जात असल्याचे सांगितले. 30 लाख प्रवासी वाहतूक असलेली बेस्ट ला अनुदान देण्याएवजी श्रीमंतांच्या गाड्यांसाठी आपला कराचा पैसा खर्च करीत असून बेस्ट साठी पैसे नसल्याचे साफ खोटे पणा मुंबई महानगरपालिका करीत असल्याचे सांगितले, पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व सीआयटीयू चे जिल्हा अध्यक्ष यांनी एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विरोधात हे सरकार असल्याचे असल्याचे सांगितले मग ते लोकल असो अथवा बेस्ट बस. सरकारच्या या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात सर्वसामान्यांनी एक व्हाया विरोधात मोठा लढा उभारण्याचे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात तालुका सचिव कॉ चंद्रकांत बोजगर यांनी स्वस्त व परवडणारी वाहतूक व्यवस्था हा आपला अधिकार आहे आणि ते उपलब्ध करून देण्यास सरकार बाध्य असल्याचे सांगीतले. प्रयक्षात मात्र हे सरकार वाहतूक या सेवा क्षेत्राचा व्यापार केला आहे. बेस्ट बसेस ची संख्या कमी करून, प्रवाश्यांना जनावरासारखे प्रवास करण्यास मजबूर करीत आहे. या मागे सरकारचे खाजगीकरणाचे धोरण असून बेस्ट वाहतूक बंद पाडण्याचा घाट हे भांडवली करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बेस्ट च्या मालकीच्या जमिनी भांडवलदारांना विकायच्या आणि त्या सामान्यांना जसे सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतून बाहेर फेकले तसेच स्वस्त परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून बाहेर फेकण्याचे कारस्थान असल्याचे सांगितले. सरकारचा हा कट आपल्याला संघटित संघर्षातून उधळून लावण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
बुधवार दिनांक 14 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अंदेरी पूर्व आगरकर चौक येथे बेस्ट भाववाढ विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. बेस्ट डेपो समोर करण्यात आलेल्या या आंदोलनात 35-40 लोक सहभागी ओते. तसेच भाव वाढ त्वरित मागे घ्या या अर्थाची 1 हजारहून अधिक पत्रके वाटण्यात आली. प्रवाश्यांचा जबरदस्त पाठिंबा या कार्यक्रमाला लाभला.