• 162
  • 1 minute read

भाजपने पुरोगामी महाराष्ट्राला गुन्हेगारीच्या उंबठ्यावर नेवून ठेवले ! – राहुल गायकवाड

भाजपने पुरोगामी महाराष्ट्राला गुन्हेगारीच्या उंबठ्यावर नेवून ठेवले ! – राहुल गायकवाड

भाजपने पुरोगामी महाराष्ट्राला गुन्हेगारीच्या उंबठ्यावर नेवून ठेवले - राहुल गायकवाड

संतोष देशमुखची क्रूर, निर्घृण हत्या महाराष्ट्रात झाली. 20 दिवस उलटून गेले. हत्याकांडातील आरोपीला अन सूत्रधारांना सर्व महाराष्ट्र जाणतो आहे, तरी ते मोकाट आहेत. भाजप सत्तेत असते व फडणवीसाकडे गृह विभाग असतो, तेव्हा आरोपी असेच मोकाट असतात. पोलिस संरक्षणात दंगली होतात, जातीय हिंसाचाराच्या घटना ही पोलिस संरक्षणात, पोलिसांच्या मदतीने होतात. तसेच आरोपीना खुलेआम संरक्षण ही दिले जाते, अन बदनाम मात्र बिहारला केले जात आहे.  संतोष देशमुखचा पोस्टमार्टम अहवाल आला असून तो असंवेदनशील माणसांना ही वेदना देणारा आहे. अंगावर विविध हत्याराचे वार आहेत, डोळे जाळले आहेत, जीभ तोडली आहे. तोंडात लघवी केली आहे. विशेष म्हणजे संतोषच्या भावाशी यावेळी हत्याऱ्यांचा मोबाईलवरून संवाद सुरु होता. अशी क्रूर व निर्घृण हत्या राजे छत्रपती संभाजी महाराजांची अनाजी पंताने घडवून आणली होती. हा निर्दयीपणा केवळ अनाजी पंताच्या औलादीच्या ठायीच असू शकतो. अन राज्याचा मुख्यमंत्री व गृहमंत्री त्याच अनाजीचा वारसदार आहे. कायद्याच्या राज्याच्या अपेक्षा का ठेवायच्या, हा प्रश्न नक्कीच आपल्या सर्वांना पडला पाहिजे.
       या हत्याकांडाने व पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थाचा  बोजवारा उडाला आहे. पोलिस समाजकंटकांना साथ देत त्याच्यासोबत खुलेआम मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये व परभणीत हे स्पष्ट दिसलें. परभणीत आंबेडकरी समाजाचा,  विचाराचा तरुण शहीद झाला, तर बीडमध्ये मराठा समाजाचा…! दोघे ही भाजप अन प्रस्थापित राजकारणाचा बळी आहेत. तर संघ व भाजप परभणीला धर्मांध राजकारणाची प्रयोगशाळा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नात ते आंबेडकरी समाजाच्या विरोधात मराठा अन ओबीसी समाजाला लढविण्याचा प्रयत्न करीत आहेत व यापुढे ही करतील. ओबीसी समाजातील वाल्मिक कराडसारखे गुंड त्यांच्या हाताशी आहेत. हाताशी सत्ता असल्याने प्रशासन व पोलिसांची ही साथ आहे. अजेंडा ही तयार आहे. त्यामुळे बीड, परभणीतील परस्थिती सर्व राज्यभर निर्माण होऊ शकते. तेच संघ व भाजपला करायचे ही आहे. मंडल आयोग व आरक्षणाच्या धोरणामुळे आंबेडकरी समाज व ओबीसी समाज एकत्र येत आहे. त्यास ब्रेक लागून हे दोन्ही समाज ऐकमेकांच्या विरोधात लढले पाहिजेत, अशी योजना संघ, भाजपची आहे. ओबीसी नेत्यांने हे ओळखून समाजात जनजागृती केली पाहिजे. पण सध्या तरी तसे होताना दिसत नाही.
         देशात अघोषित आणीबाणीच्या विरोधात व संविधान वाचविण्याचा लढा सुरु आहे. तो लढताना भाजप सरकारने, प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी घेतला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत मोर्चे, आंदोलने झाली. प्रकरण आता शांत होऊ लागले आहे. भाजपच्या वळचणीला सत्तेच्या तुकड्यासाठी असलेले दलित नेते या प्रकरणात ही गप्प आहेत. महिन्यांभरात लोक ही विसरून जातील. तर संघ, भाजप दुसऱ्या सूर्यवंशीचा शोध घेईल. त्याला टार्गेट करेल. तेव्हा ही समाज पुन्हा मोर्चे, आंदोलने करेल. प्रतिक्रिया दिली जाईल. कृति कार्यक्रम दिला नाहीतर हे असेच घडेल.हे ही समजून घेणे आवश्यक आहे. 
वाल्मिक कराड याचे शेवटचे लोकेशन उज्जैन येथील ज्योतिर्लिंग येथील असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, या अनुषंगाने एक नवी चर्चा सुरु झाली आहे; ती चर्चा म्हणजे दोन दिवसापूर्वी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषदेत असे विधान केले होते कि, माझ्या संदर्भात वाद केला नसता तर मी माझ्या ज्योतिर्लिंग यात्रेवर असते.
         संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर बीडमधील गुन्हेगारीचे चित्र संघटितपणे पुढे आले आहे. ते खुपच भयानक आहे. अन आम्ही निर्लज्जपणे बिहारचे नाव घेत आहोत. केजमधील वाळू माफिया दलित अन ओबीसी समाजाच्या किशोर वयीन मुलींना कला केंद्राच्या नावाखाली उपभोगत आहेत.  तर नेते सिनेमा नटी. पैशाचा माज हा असा आहे.  संतोष देशमुखची हत्या करण्यासाठी ज्याना वापरले ते आज पोलिस रेकार्डनुसार फरार आहेत. पण त्यांची हत्या झाले असल्याचे वृत्त आहे. ते फरार नाहीत तर ते सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणात आहेत. त्यांची अटक अन तपास अनेकांना नागडा, उघडा करणारा असेल. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे अन संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचे संबंध विधानसभेत जाहीर केले आहेत. गोपीनाथ मुंडे यांची कन्या अन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी ही हे अगोदर अनेक वेळा जाहीर केले आहे. आज धनंजय मुंडे सोबत सरकारमध्ये असल्याने त्या केवळ गप्प नाहीत, तर समर्थनात उतरल्या आहेत. प्राजक्ता माळीचे नाव या निमित्ताने धस यांनी पुढे आणले आहे. धनंजय मुंडेच्या पत्नी करुणा मुंडे यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. या ही प्रकरणी प्राजक्ता माळीची बाजू घेत पंकजा मुंडे आता बोलू लागल्या आहेत. आपल्या भावाला वाचविण्यासाठी त्यांनी स्त्रीवादी भुमिका घेतली आहे. पण याच बीड जिल्ह्यातील कला केंद्रात दलित, ओबीसी मुलींना भोग वस्तू म्हणून वापरले जात आहे. ती प्रकरणे पण उघड झाली आहेत. त्यासंदर्भात मात्र त्या कधी बोलल्याचे ऐकीवात नाही.
        महाराष्ट्राला हादरवणाऱ्या,कलंकित करणाऱ्या अनेक घटना बीडमध्ये घडल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीच त्या पुढे आणल्या आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्या या साऱ्या घटना आहेत. त्यात संतोष देशमुखचा हत्यारा वाल्मिक कराड 20 दिवस झाले पोलिसांना सापडत नाही. मग पोलिस काय करीत आहेत. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या नोटीसा का काढल्या जात नाहीत. वाळू माफिया अन पवनचक्की प्रकरणात करोडची उलाढाल रोज होत आहे. वाल्मिक कराडची गँगच हे करीत आहे. शासन, प्रशासन यात भागीदार आहेत. वाल्मिक कराड सापडला व चौकशीत त्याने या भागीदारांची नावे उघड केली तर ? हा खरा प्रश्न आहे व त्यासाठीच वाल्मिक कराडला फरार केले आहे. त्याचे ब्रेन वॉश करून पोलिसांसमोर आणले जाईल.
          संतोष देशमुखची हत्या तर गंभीर प्रकरण आहेच. पण त्या निमित्ताने स्थानिक राजकारणी व गुन्हेगारी जगतातील अट्टल गुन्हेगार यांचे संबंध ज्या पद्धतीने उघड होत आहेत, ते तर त्यापेक्षा गंभीर आहे. शासन व प्रशासन हे लोकांसाठी काम करीत नसून ते राजकारणी व गुन्हेगारांसाठी काम करते, हे ही उघड झाले आहे. वाल्मिक अन त्याचे साथीदारांना अटक करून त्यांची चौकशी केली जाईल, तेव्हा महाराष्ट्राला हादवणाऱ्या अनेक गोष्टी समोर येतील. यात काही शंका नाही.
बाकी या प्रकरणातील तीन फरार आरोपीची हत्या झाल्याचा व त्यांचे मृतदेह कर्नाटकच्या बॉर्डरवर सापडल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या आरोपात तथ्य असेल तर वाल्मिक कराडच्या बाबतीत ही हे होऊ शकते. हे नाकारता येऊ शकत नाही. या सर्व प्रकरणावरून नजर टाकली तर भाजपने पुरोगामी महाराष्ट्राला गुन्हेगारीच्या उंबठ्यावर नेवून ठेवले आहे. हे सहज दिसते. 
……….
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म.फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा महिना…!!

सम्राट अशोक, म. फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीमुळे एप्रिल म्हणजे विचार व परिवर्तनाच्या उत्सवाचा…
महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न पुणे : भारतरत्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *