• 91
  • 1 minute read

भाजपाला डॉ.बाबासाहेब बद्दल काय प्रेम उतु चालल ?

भाजपाला डॉ.बाबासाहेब बद्दल काय प्रेम उतु चालल ?

भाजपा आर एस एस ने देश चालवितांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना तिलांजली दिली,दिल्लीत भाजपाचे समर्थक कार्यकर्त्यांनी संविधान जाळले,भाजपाचे पदाधिकारी जाहीर भाषण करता की,,,हमे ४००पार संविधान बदलनेके लिये मंग रहे,,, ह्या बाबतीत देशाचे केअर टेकर प्रधानमंत्री चकार शब्द काढत मोदीजींचे चुप रहाणे म्हणजेच मुक संमती आहे
काल,मुळ राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड आंबेडकरी विचारांचे प्रेरक आहेत त्यांनी मनुस्मृतीची प्रतिमा फाडतांना चुकुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोष्टर फाडले गेले व त्या बाबत त्यांनी जाहीर माफी मागितली ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर करणार नाहीत जे राज्यातील जाणकार नागरिकांना माहित आहे
परंतु भाजपाची आई मुख्य जननी मनुवादी,मनस्मृती,आर एस एस विचार धारेचा विरोध आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला ते मुळ पोटदुखी भाजपाची आहे मग चुकुन भावनेच्या भरात पाडलेल्या पोष्टरचा एवढा बाऊ करण्याची भाजपाला राजकारण करून आंबेडकरी समाजाच्या भावना कशा दुखावतील व सामाजिक उद्रेक कसा होईल हा एकमेव उद्देशाने आज भाजपा व त्यांचे सहकारी यांनी जे कृती केली त्यास आंबेडकरी समाजातील सज्ञान लोक नागरीक अनुयायी कधीच प्रतिसाद देणार नाही
व आंबेडकरी समाजाने ह्या बाबीवर कधीच भाजपाचे राजकीय खेळीत अडकु नये
दिल्लीत जंतरमंतर वर संविधान जाळले तेव्हा भाजपाने का निषेद केला नाही ?? मोदीजी,अमीत शहाजी एकही शब्द का बोलले नाही??? त्या लोकांना वर देशद्रोहा अंतर्गत गुन्हा दाखल करून का अटक केली नाही???ह्या प्रश्नाचे उत्तर भाजपा कडे आहे का,तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रती एवढेसेही प्रेम नाही जितेंद्र आव्हाड ची झालेली नजरचुकीला का राजकीय रंग दिला जातो ?

– हरिचंद्र अण्णा लोंढे
( धुळे,आंबेडकरी कार्यकर्ता )

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *