सर्व जगात पोहचलेल्या बुद्धालाही त्यांनी केले होते अदृश्य या भूमीत
त्या तुलनेने संविधान त्यांच्यासाठी आहे हातचा मळ! म्हणून आम्ही उगीच भ्रमात राहू नये
आमच्या कवितेतील सूर्य, चंद्र नि तारे उपाशी मरू लागले की तेही जातील शरण त्यांना बिनशर्त! (किंवा जमा होतील कबरीत) आठवले, कवाडे नि जाधव जसे गेले
शब्दातील मुजोरीने कुणीच जिंकले नाही युद्ध आजवर युद्धाचे रथचक्र रक्ताच्या इंधनावर चालत असते याचे भान असावे अन् उद्या होणा-या तुंबळ युद्धासाठी जोडत जावे माणसं आपल्या मनातील भिंती पलीकडचे.