• 106
  • 1 minute read

भामरागड- लाहेरी दौऱ्यात मलमपुदुर चा आरूष वड्डे भेटला – त्याला IAS अधिकारी व्हायचे आहे

भामरागड- लाहेरी दौऱ्यात मलमपुदुर चा आरूष वड्डे  भेटला – त्याला IAS अधिकारी व्हायचे आहे

भामरागड- लाहेरी दौऱ्यात मलमपुदुर चा आरूष वड्डे भेटला - त्याला IAS अधिकारी व्हायचे आहे

           अहेरी तहसील मधील, गाव पेरिमिली  , आलापल्ली -भामरागड रत्यावर आहे. तसा हा भाग आदिवासीबहुल , दुर्गम, नक्षलप्रभवित व मागासलेला समजला जातो. आता  नक्षल प्रभाव कमी झाला परंतू मागासलेपण ? आम्ही संविधान फाउंडेशन चे वतीने 29 मे 2025 ला पेरिमिली येथे संविधान परीषद आयोजीत केली होती. अहेरी टीम ने गौतम मेश्राम यांचे मार्गदर्शनात खूप मेहेनत घेवून परीषद यशस्वी केली. पहिल्यांदाच या भागात अशी  दिवसभऱ्याची संविधान परीषद झाली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या भागात,संविधान जागराचे काम करने तसे त्रासाचे व कठीणच. परंतू टीम ने करून दाखविले. अभिनंदन टीमचे. लोकांना हक्काची व कर्तव्याची जाणिव करुन देण्याचा,  एकत्र येवून संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आहे. 
 
2.     परिषदेचा समारोप  सायंकाळी झाला आणि आम्ही भामरागड ला रात्री मुक्काम केला. सोबत, गौतम मेश्राम, महेश मडावी, गणेश सूर्तेकर, प्रमोद मेश्राम होते. मी , रेखा खोब्रागडे, दीपक व अल्का निरंजन, असे 8 जण होतो.  30 मे 25 ला सकाळी तयार होवून सगळेजण त्रिवेणी संगम पॉइंट ला गेलो. पामलगौतम, पर्लकोटा व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम. सुन्दर, मोहक दृश्य, फोटो काढलेत. पुढचा प्रवास सूरू झाला ,  भामरागड वरून मडपल्ली , धोडराज, मलमपुदुर, लाहेरी, गुंडेनहुड पर्यंत गेलो. पुढे बिनगुंडा आहे.  अबुजमाड , नक्षल ग्रस्त क्षेत्र. इकडे ऑपरेशन सूरू होते.
 
3.     मलमपुडुर येथे एक मुलगा, 5 वी शिकलेला भेटायला आला. आरूष वड्डे त्यांचे नांव.  त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्याचा परिचय इंग्रजीत दिला.  काही प्रश्न विचारले, छान उत्तरे दिलीत. थोडे अडखळत परंतू संविधानाची  प्रास्तविका बोलून दाखविली. त्याला  विचारले,आयएएस अधिकाऱ्यांना भेटायची इच्छा  का असते, ? म्हणाला आयएएस व्हायचे आहे. आयएएस अधिकारी कसे दिसतात? काय करतात ? हे जाणून घ्यायचे आहे. 5 वी शिकलेला मुलगा आतापासून आयएएस शी भेटतो, बोलतो, नक्किच आयएएस होईल. आम्ही त्यास प्रोत्साहित केले. यापूर्वी गडचिरोली ला जावून सीइओ यांना भेटला आहे. Primitive tribe भागातील  या मुलाचे स्वप्न पूर्ण होणार. मुलगा हुशार आहे. वडील  झेड पी शिक्षक आहेत. अति दुर्गम भागातील आमच्या दौऱ्यातील हा सुखद अनुभव आहे. या भागातील मुलं मुली मोठ्या संख्येने प्रशासनात येतील असा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. Madia भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
 
4.    आलापल्ली ते भामरागड  आणि पुढे भामरागड ते गुंडेनहुड पर्यंतचा रस्ता खूप छान, टार रोड आहे. मुली स्कूटर चालवताना दिसल्या. अनेक तरुण मुलं मोटारसायकल वापरतात. अनेकांकडे मोटारसायकली आहेत. भामरागड ला शोरुम आहे.  मार्केट विकसित झाले. सगळंच उपलब्ध होत आहे. सायकली आता फार दिसत नाहीत. घरे सिमेंट ची झालीत. पेहराव बदलला. शिक्षणा मूळे हे  घडत आहे. मुलमुली  शिकतात. मुलं  डॉक्टर, वकील होताना दिसतात . मात्र, आदिवासी संस्कृती, जी चांगुलपणाची आहे, प्रामाणिकतेची आहे , साधे सरळवर्तनाची आहे, ती कुठेतरी बिघडताना  दिसते. औद्यागिकरण व शहरीकरणाचा , आधुनिकीकरणाचा परिणाम होणारच. गुळगुळीत रस्ते, गावं बदलत चालली, बाह्य विकास दिसतो आहे. शिक्षणाची  गुणवत्ता तपासावी लागेल.  फक्त धोडाराज च्या शाळेत संविधानाची प्रास्तविका भिंतीवर दिसली. एवढेच नाहीतर 9 ऑगस्ट 2023 चा प्रधानमंत्री यांच्या संदेशाची कोनशिला दिसली. आजादीचा अमृत महोत्सव आणि क्रांती दिवसा निमित्त हा फलक होता. प्रधानमंत्री यांचा संदेश त्यावर लिहला आहे. मी हे प्रथमच बघत होतो.  असा फलक, perimili  जवळील, मेडपल्ली शाळेच्या आवारात दिसला. हे तेच गाव आणि शाळा, 1991 ला अहेरी आमदारांचे अपहरण नक्षलवाद्यानी येथूनच केले होते. माझे पुस्तक, आणखी एक पाऊल मध्ये, यावर सविस्तर लिखाण केले आहे. या शाळेत मात्र, संविधान प्रास्ताविका दिसली नाही. याकडे जिल्हा प्रशासनाने  लक्ष द्यावे. संविधानाला 75 वर्ष झाले म्हणून राज्य सरकारने घर घर संविधान हा कार्यक्रम ,10 ऑक्टोबर 2024 च्या जी आर ने सूरू केला आहे. मात्र, फार काही दिसत नाही, जाणवत ही नाही. मान. मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. लक्ष देतील अशी अपेक्षा आहे . कारण, त्यांचेच पुढाकाराने हा जी आर निघाला. 
 
5.    काळाप्रमाणे बदल घडतो, घडला ही पाहिजे. अपरिहार्य आहे. माणुसकी हिरावून जायला नको, एवढीच अपेक्षा. या भागाचा मी एसडीओ होतो, जानेवारी 1985 ते जून 1989 , पुन्हा 2003-04 मध्ये झेड पी चा सी इ ओ होतो, 16-17 महिन्यासाठी. बदल जाणवतो. सरकारचे विकासासाठी काम आणि आदिवासींचा प्रतिसाद यामुळे हा बदल घडतो आहे.  2003-04 मध्ये बिनगुंडा येथे  आरोग्य उपकेंद्र बांधताना आलेल्या अडचणी व धोके , सीइओ म्हणून मला माहित आहेत. नक्षलवाद्यांनी मे 2004 मध्ये  आमचे दौऱ्यात  माइन ब्लास्ट घडवुन आणला होता, ह्यांची आठवण झाली. Perimili च्या संविधान परिषदेत आदिवासी व्यक्ती मला भेटले. त्यांनी माझे नावासह ओळख काढली. आम्ही गप्पा मारल्या, अजून काही लोक भेटलेत. अहेरीचा एसडीओ म्हणून त्यांनी ओळख दाखविली. 35 वर्षानंतर ची ओळख, समाधान वाटले.  बोलताना,म्हणाले  हा भाग 30 वर्ष  विकासापासून  वंचीत राहिला,मागे राहिला. कशामुळे? तर , नक्षलवादी कारवाया मूळे. नक्षली कारवाया मूळे विकास खोळंबला हे वास्तव आहे. नक्षलीच्या असंविधनिक वर्तनामुळे आदिवासींचे नुकसान झाले हे मान्य केले पाहिजे. खूप वर्षानंतर पामल गौतम नदीवर मोठा पूल झाला. गुंडेनहुड नाल्यावर मोठा उंच, रुंद पुलाचे बांधकाम सूरू आहे. भामरागड आलापल्ली रोडवर उंच व रुंद पूल झालेत.  या रोड वरून चा प्रवास सुखद वाटतो. आलापल्ली ते लगाम रस्ता मात्र खुप त्रासदायक आहे. खनिज वाहतूक चे शेकडो ट्रक्स मूळे काही रस्ते जीवघेणे ठरले आहेत असे सांगण्यात येते. लगाम ते आष्टी रस्ता छान आहे. ही संविधान परीषद अनेक अर्थानी चांगली व यशस्वी ठरली.  या भागात संविधान जागरूकता होणे साठी काम करण्याची गरज आहे.  सशस्त्र क्रांती ची भाषा करणाऱ्या माओवादी/नक्षलवाद्यांना  हा विचार सोडून देवून संविधानाची मूल्ये स्विकारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संविधानाने माणसं जोडले जातील.  हक्क व कर्तव्ये समजतील. समस्या निवारण होईल. सन्मानाचे जगणे प्राप्त होईल. आदिवासी संस्कृती  विकसित करत, विकास होइल. हा देश विकसित भारत @2047 संविधानानेच होणार आहे.  मानवी हक्क, प्रतिष्ठा , स्वतंत्रता, समानता हिरावुन घेणारे कृत्य व कारवाया संविधान  विरोधी ठरतात. अशा पासुन संविधानाला धोका पोहचते. संविधानाच्या मार्गानेच वाटचाल केली पाहिजे. संविधानाचा हाच संकल्प आहे. संविधान निर्माते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारले पाहिजे, त्यानुसार वर्तन व शासनाचा कारभार दिसला पाहिजे. 
 
6.    परततांना , भामरागड  हेमलकसा बिरादरी प्रकल्पास भेट दिली. मान डॉ प्रकाश आमटे व डॉ  मंदाताई आमटे यांची सदिच्छा भेट घेतली. चहापाणी,गप्पा झाल्यात .  पेरिमिली च्या संविधान परिषदेला  महीला, आदिवासी,  इतर ही आले होते. हा भाग माझा प्रिय भाग आहे. माझी प्रशासकीय सुरुवात येथूनच झाली. या भागातील माणसांबद्दल आस्था, आपुलकी बाळगल्यामुळे आमचे जगणे समाधानाचे झाले. माणुसकीचे , इमानदारीचे प्रशासन मी येथेच शिकलो.” प्रशासकीय सेवेत येण्याचा  आणि सर्वसामान्याच्या हिताचे प्रशासन करण्याचा मार्ग मला येथेच सापडला. ” माझे वडिलाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार  सामजिक दायित्व निभवता  आले, शोषित वंचितांच्या भल्यासाठी कार्य करता आले. येथून जे शिकलो ते शेवटपर्यंत  जोपासले. मार्गावरून भटकलो नाही आणि पत्नी रेखाने बिघडू  दिलें नाही. *आणखी एक पाऊल, प्रशासनातील समाजशास्त्र, प्रशासनात आंबेडकरवाद*”या पुस्तकांमध्ये मी माझे अनुभव लिहले आहेत. आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे, नेहमीच चांगलं घडाव यासाठी आमचा प्रयत्न असतो . संविधानाची योग्यप्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी आमचा आग्रह असतो. चुकीचे , अन्यायकारक घडले की वाईट वाटते. तेंव्हा आम्ही बोलतो, लिहितो. ही परीषद घेण्यामागे  हेतू हाच आहे. लोकांना हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी, आचरण व्हावे, सामाजिक न्याय व्हावा.  यासाठी, संविधान परीषदेचे  मुख्य आयोजक गौतम मेश्राम,  महेश मडावी, गणेश सूर्तेकर, प्रमोद मेश्राम, स्वाती रामटेके, वनिता कन्नाके,  लक्ष्मण  दुर्गे, प्रमोद आत्राम, गजनान लोणबळे , पेरीमिलीचे  सर्व,अहेरी टीमचे  सर्व  आणि सहभागी सगळ्यांचे  आभार. त्यांचेंमुळे हे घडले. संविधानाच्या मार्गावर निर्धाराने चालण्याचा आमचा , टीम चा संकल्प आहे. हे देशहिताचे, विकसित भारत @2047  स्वप्नपूर्तीचे कार्य आहे. 
 
इ झेड खोब्रागडे, आयएएस (नि)
संविधान फाउंडेशन नागपूर
M 9923756900.
 
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *