• 21
  • 1 minute read

भारतासारख्या गरीब देशाला नव‌ उदारमतवाद हिताचा नाही!

भारतासारख्या गरीब देशाला नव‌ उदारमतवाद हिताचा नाही!

भारतासारख्या गरीब देशाला नव‌ उदारमतवाद हिताचा नाही!

खाजगी कॉर्पोरेट भांडवलशाही प्रणाली चरमसीमेवर पोचलेल्या अमेरिकेत तेथील केंद्र सरकार अमेरिकेन खाजगी कॉर्पोरेटमध्ये नव्याने भांगभांडवल गुंतवू लागले आहे ……. काय कारण असेल ? विचार तर कराल ?

आणि इथे भारतात

स्वातंत्र्यनंतर ज्या सार्वजनिक उपक्रमांनी आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया घातला त्यांना, ज्यांची आजच्या प्रत्येक राष्ट्र स्वसंरक्षणात्मक पावित्रे घेऊ लागलेले असताना, नितांत गरज आहे,

भारतात सार्वजनिक उपक्रमांना एकतर खाजगी कंपन्यांना विकण्याचा घाट घातला जात आहे किंवा सार्वजनिक उपक्रमांची रसद कापली जात आहे ……आजच्या काळात या संदर्भात भारताने नक्की काय केले पाहिजे ? विचार तर कराल ?
_________

जानेवारी २०२५ पासून अमेरिकन केंद्र सरकारने खालील कॉर्पोरेट मध्ये इक्विटी स्टेक घेतले आहेत

US Steel (Golden share)
MP Materials – 15 percent
Intel – 10 percent
Westinghouse – 8 percent
Trilogy Metals – 10 percent
Vulcan Elements
Bunch of Rare Earth material companies

(संदर्भ New York Times – quoted in Economic Times नोव्हेंबर २६, २०२५)

खाजगी कॉर्पोरेट मध्ये इक्विटी घेण्याचा निर्णय ट्रम्प यांच्या विक्षिप्त पणाचा भाग नाहीये. तो अमेरिकेच्या राज्यकर्त्या वर्गाचा निर्णय आहे हे मुद्दामहून लक्षात ठेवूया. ….का करत असेल अमेरिका असे ? विचार तर कराल ?
__________

कम्युनिस्ट आर्थिक विचार आणि भांडवलशाही आर्थिक विचारातील सर्वात मूलभूत फरक म्हणजे उत्पादन साधनांची कोणती मालकी प्रभूत्वस्थानी असणार ? सार्वजनिक की खाजगी ?

गेली ४० वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेत खोलवर सहभागी होऊन देखील कम्युनिस्ट चीनने, जागतिक भांडवलाला दारे उघडून देखील सार्वजनिक मालकीला प्रभुत्वस्थानावरून खाली खेचण्यास नकार दिला. चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक जायंट ह्युवाई पासून महाकाय चिनी बँकामध्ये सार्वजनिक मालकी प्रभुत्वस्थांनी आहे.

इथले नव उदारमतवादी अर्थतज्ज्ञ भारताला “बघा, चीनने आपली अर्थव्यवस्था कशी ओपन केली” असे सांगत खाजगी क्षेत्राची भलावण करतात. पण चीनच्या आर्थिक प्रगतीचा आणि सार्वजनिक मालकी प्रभुत्वस्थानी असण्याचा जैव संबंध आहे हे सत्य लपवून ठेवतात. त्यांना चालू म्हटले की राग येतो.
________

सार्वजनिक मालकीची उपस्थिती असली तर दोन गोष्टी साध्य होतात

एक) उत्पादन क्षेत्राची जोखीम क्षमता वाढते, आजच्या निरजागतिकीकरणाच्या काळात ती महत्वाची आहे

दोन) स्थूल अर्थव्यवस्थेची जी उद्दिष्टे असतात ती साध्य करण्यासाठी इन्स्टिट्युशनल इन्स्ट्रुमेंट शासनाच्या हातात येतात उदा कोणतीही आर्थिक आणिबाणीसदृश्य परिस्थिती तयार झाली , विशिष्ट क्षेत्रात संशोधनाला चालना द्यायची आहे किंवा सार्वजनिक मालकीच्या बँकांच्या मदतीने मंदी सदृश्य अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आणायची आहे इत्यादी

नवउदारमतवादाने प्रत्येक आर्थिक बाबीकडे डाव्या उजव्या बायनरी मध्ये बघण्यासाठी आपला ब्रेनवॉश केला आहे. त्याचा अजेंडा राबवण्यासाठी त्याच्या ते हिताचे होते / आहे. ही बायनरी भारतासारख्या गरीब / विकसनशील देशाच्या हिताची नाही. ऍप्लिकेशन ऑफ माईंड , प्रश्न असेल त्याप्रमाणे धोरणाचे आयुध असा ऍप्रोच हवा.

संजीव चांदोरकर (२८ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *