• 14
  • 1 minute read

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

शासकीय दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ.दातारकर यांना बडतर्फ करा – डॉ. नितीन राऊत

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

प्रात्यक्षिक परीक्षेत मार्क न देण्याची धमकी; विद्यार्थ्यांचा मानसिक छळ

मुंबई/नागपूर, दिनांक-१७/०३/२०२५

नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे बीडीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत पाहून घेण्याची धमकी देऊन सुळबुध्दीने इंटरनल गुण कमी केले व एक्ट्ररनल मिळालेले गुणांमध्येही हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना नापास केले. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक छळ प्रकरणी आज विधानसभेत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी अधिष्ठाता यांना तात्काळ बडतर्फ करून चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये बीडीएसच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांच्या संपुर्ण बॅचला अधिष्ठाता डॉ. दातारकर यांच्या व्दारे मानसिक छळ सहन करावा लागला. डॉ. दातारकर यांनी जाणीवपुर्वक संपुर्ण ६० विद्यार्थ्यांचे इंटर्न बॅचला चुकीचे इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले. यामुळे संपूर्ण बॅच राज्य परिषदेत नोंदणीसाठी अपात्र ठरली. तसेच यांनी विद्यार्थिनींच्या बॅचवर विविध चौकशी लावून छळ केला असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.

अधिष्ठाता इतक्यावरच थांबले नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर कमी उपस्थितीचा आरोप त्यांनी केला. सुळबुध्दीने डॉ. दातारकर यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावर ‘नॉट एलिजिबल टू अपियर फॉर एक्झाम’ (NOT ELIGIBLE TO APPEAR FOR EXAMS) असे लाल पेनानी लिहलेले प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना जारी केले होते. यावेळी विद्यार्थी आणि पालक अधिष्ठाताच्या आडमुठे धोरणाविरोधात रोष व्यक्त करित त्यांच्या कार्यालयापुळे उभे राहून त्यांच्या या वृत्तीचा निषेध नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे तास वाया गेले. प्रसंगी डॉ. राऊत यांनी जनप्रतिनिधी म्हणून हस्तक्षेप केला त्यावेळी अधिष्ठाता यांनी युटर्न घेत ‘एलिजिबल टू अपियर फॉर एक्झाम’ लिहिलेले प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना जारी केले. यावेळी डॉ. दातारकर यांनी विद्यार्थ्यांना प्रॉक्टीकल मध्ये तुम्ही किती मार्क घेता हे बघतो असे म्हणत विद्यार्थ्यांना धमकी दिली. कायदा पायदळी तुडविण्याची प्रवृत्ती अधिष्ठाताची दिसून येत असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी विधानसभेत केला.

११ मार्च ला लागलेल्या निकाला मध्ये राज्यातील ३४ दंत महाविद्यालयांमध्ये नागपूर येथील महाविद्यालयाचा परिणाम सर्वात वाईट होता. अधिष्ठाता च्या सततच्या छळामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आणि उर्वरित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली नव्हती. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण देवून व एक्टरनल परीक्षेत हस्तक्षेप करून त्यांचे गुण कमी करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे सहा महिनेच नाही तर नीट-एमडीएस परीक्षेच्या प्रतीक्षेत आणखी एक वर्ष वाया जाण्याची भीती यावेळी डॉ. राऊत यांनी दर्शविली आहे.

अधिष्ठाता प्रगत शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप करित डॉ. राऊत यांनी बीडीएस अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे पुन्हा प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन अधिष्ठाता यांना तात्काळ बर्डतफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच चालू वर्षाच्या इर्टनशीप नियमीत बॅच मध्ये समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना केली आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी बनविले नियमबाहय प्रमाणपत्र
अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी मुलगा श्रीनेश दातारकर याच्या वैद्यकीय शिक्षणाकरिता नियमबाहय नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. पीडित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी चौकशीची मागणी देखील यावेळी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.


थेट भरती झालेल्या वर्ग १ केंद्र/राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलाला/मुलीला नॉन क्रिमी लेयर ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ मिळण्याची तरतूद नाही.
जर वर्ग II म्हणून काम करणाऱ्या केंद्र/राज्य सरकारी कर्मचाऱ्याला वयाच्या ४० वर्षापूर्वी वर्ग I कॅडरमध्ये पदोन्नती मिळाली तरच त्याच्या/तिच्या मुलाला/मुलीला नॉन-क्रीमी लेयर ओबीसी फायदे मिळतात.
नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट लाभांसाठी वर्ग १/२ कर्मचाऱ्यांचे उत्पन्न हा निकष नाही.
डॉ. दातारकर राज्य सरकारच्या नोकरीत थेट वर्ग १ प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यामुळे वय किंवा उत्पन्नाचे निकष लागू होत नाहीत.
डॉ. नितीनजी राऊत यांचे आरोप योग्य वाटतात पण चौकशी समिती तार्किक निष्कर्ष देईल अशी आशा आहे.


– Praveen M. Bagde

0Shares

Related post

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही ! – डॉ. प्रकाश मोगले भाषणातील महत्त्वाचे मु‌द्दे : *…
गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

यह सच है की….गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…..!        ये सच…
कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

मुघल बादशहाच्या दरबारातील लाभार्थीच आज कबरी खोदण्याची भाषा करतात !           मरणकळा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *