मणिपूरमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने येथे प्रचार करण्यास सुरूवात केलेली नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे. केंद्र सकरकारने वेळीच हस्तक्षेप करत मणिपूर सरकारच्या मदतीने येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
आसाम ट्रिब्यून या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी असं म्हटलं आहे. मुलाखतीत पुढे त्यांनी म्हटलं की, कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाताना आपण एकत्र असणे गरजेचे आहे. ही आपली सामुहीक जबाबदारी आहे. देशातील जातीवाद संपवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाययोजना करत आहोत, असंही मोदी म्हणाले.
राज्यात शांती आणि जातीय तेढ निर्माण न होण्यासाठी भाजप सरकार वेळोवेळी भूमिका घेत आहे, असंही मोदी म्हणाले. आम्ही वेळीच मणिपूर हिंसाचारात हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती आता आटोक्यात आहे.
मैतेई जातीला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी ३ मे २०२३ मध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (ATSUM) ने ‘ एकता मार्च’ काढला होता. यामध्ये मैतेई आणि कुकी या दोन जातीमधील नागरिकांमध्ये मोठा वाद झाला. पुढे या वादाला हिंसाचाराचे रुप प्राप्त झाले.