• 194
  • 1 minute read

अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

नशेच्या प्रकरणावरून मानखुर्द - शिवाजीनगरमधील जनतेची बदनामी सहन केली जाणार नाही.... अबु आजमी यांचा अजित पवार भेटीत सरकारला इशारा !

मुंबई, दि. मानखुर्द – शिवाजीनगर – गोवंडीमधील जनतेला नशेच्या प्रकरणावरून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बदनामीयापुढे सहन केली जाणार नाही. जे करतील त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशारा देत असतानाच नवाब मलिक यांच्या परिवाराचे या नशेच्या धंद्यात असलेले संबंधच समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांनी प्रत्यक्ष अजित पवार यांना भेटून उघड केले. विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी व अबू आसिम आजमी हेच या परिसरात नशेचा कारोभार करीत असल्याचा खोटा प्रचार नवाब मलिक यांनी केला आहे, या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी अजित पवारांची भेट घेवून सरकारच्या विरोधातील आपली रणनीतीच अबू आजमी यांनी जाहीर केली.
           निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेच्या अगोदरच अबू आसिम आजमी यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेना उधाण आले होते. उलट सुलट चर्चा ही सुरु होत्या. मात्र नशेचा धंद्यात नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव असून त्या प्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक खोटा प्रचार करीत होते. या प्रकरणात आपण स्वतः सरकार म्हणून लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी करून आजमी यांनी नवाब मलिक व अजित पवार या दोघांच्या ही अडचणीत भर घातली आहे.
         समाजवादी पार्टी व अबू आसिम आजमी यांच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नसल्याने नवाब मलिक यांनी अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून काही तथाकथित एनजीओना हाताशी धरून येथील प्रचारात नशेचा मुद्दा प्रमुख मुद्दा बनविला. गोदी मिडियाने ही हा मुद्दा उचलून धरला. मुंबई शहरात सर्वत्र नशेचा कारोभार सुरु असून फक्त मानखुर्द – शिवाजीनगर – गोवंडीलाच का बदनाम करण्यात येत आहे? यामुळे अबू आजमी पूर्ण निवडणुकीत व्यथित होते. त्यामुळेच निवडणूक संपून निकाल जाहीर होताच त्यांनी नवाब मलिक यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संभाव्य सरकारमधील एक प्रमुख अजित पवार यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.
       नशेचा कारोभार फक्त गोवंडीमध्येच नाहीतर अनुशक्तीनगर अन एकूणच मुंबईभर सुरु आहे. या प्रकरणी विधिमंडळात अनेक वेळा आवाज उठविला आहे. रस्त्यावर येवून संघर्ष, आंदोलन केले आहे. पण पोलिस संरक्षण असल्याने हा धंद्या जोरात सुरु आहे, हे ही यावेळी झालेल्या चर्चेत अबू आसिम आजमी यांनी अजित पवार यांना सांगितले आहे. आता पाहू या सरकारचा एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून अजित पवार या प्रकरणी काय भुमिका घेतात ते.
0Shares

Related post

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…
स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृह देशाच्या आर्थिक राजधानीत का नको ?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *