• 12
  • 1 minute read

मत मागायला आलात, तर उत्तर द्यायलाही तयार रहा

मत मागायला आलात, तर उत्तर द्यायलाही तयार रहा

कल्याण – होऊ घातलेल्या महापालिका निवडणूकीतील उमेदवारांनी सोसायटीत प्रवेश करण्यापूर्वीच प्रवेशद्वाराच्या गेटवर लावलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेवूनच मत मागण्यासाठी सोसायटीत यावे अशा आशयाचा फलक कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजिवन सोसायटीने लावला असून या फलकाच्या माध्यमातून उमेदवारांसमोर प्रश्नावली सादर केली आहे . हा फलक परिसरात चर्चेचा विषय झाला आहे .
 
या फलकावरील मचकुर पुढील प्रमाणे आहे 
 
निवडणूक आली, म्हणून आज आठवण झाली, पण सहजीवनवरील अन्यायाच्या वेळी तुम्ही कुठे असता..?
तुम्ही सहजीवनमधील मतदारांसाठी पैशाच्या पेट्या उघडाल, आश्वासनं-आमिष द्याल, मतं मागाल. आज तुम्ही मतं मागायला आला आहात, जो हक्क तुम्हाला संविधानाने दिला आहे. लक्षात ठेवा आम्ही आमचं मतं विकलं नाही विकणार नाही, आम्ही प्रश्न विचारणार आणि उत्तरं घेणार.
परंतु इथे सहजीवनचा प्रत्येक उमेदवाराला एक प्रश्न येतो. तुम्हाला मतं मागण्याचा नैतिक अधिकार आहे का..?
गेल्या दहा वर्षांत तुम्ही रहिवाशांच्या कधी आणि कोणत्या कामासाठी सहजीवनमध्ये आला होतात?
ज्या वेळी रहिवाशांच्या मूलभूत हक्गंची व अधिकारांची गळचेपी होत होती,
तेव्हा आपण कुठे होता?
आता निवडणूक आली, म्हणून तुम्हाला सहजीवनच्या ” ८५० एकगठ्ठा ” मतांची आठवण झाली,
पण आमच्यावरच्या अन्यायाच्या वेळी तुम्ही जाणीवपूर्वक विसरलातच नाही, तर साफ दुर्लक्ष केलंत. पण लक्षात ठेवा, आम्ही मतदार आहोत, तुमचे गुलाम नाही.
काही निवडक लोकप्रतिनिधी वगळता, बाकीव्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, आणि हे सहजीवनमधील सर्वच्या सर्व ८५० मतदारांना चांगलंच माहीत आहे. आम्ही आंधळे मतदार नाही, आम्ही जागरूक नागरिक आहोत आणि आमचा वार्डातील मतटक्कादेखील.
पक्ष कोणताही असो, मागील दोनही निवडणुकांच्या वेळी पोकळ आश्वासने देऊन मते घेण्यापुरतेच, तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये आला होतात, आणि आजही आला आहात.
होय, पोकळच. कारण दिलेल्या आश्वासनांपैकी एकही गोष्ट आपण पूर्ण करू शकला नाहीत. आम्हाला गृहीत धरलंत. आम्ही नागरिक आहोत, तुमच्च्या आश्वासनांवर जगणारे भिकारी नाही.
आम्हाला बंदूक दाखवण्यात आली, सोसायटीमध्ये अतिक्रमण करण्यात आलं, आमचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाला, आमची गॅसची लाईन आजही दादागिरीने बंद आहे. आमचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. आम्हाला आमच्याच सोसायटीमध्ये येताना अवैध पार्किंगमुळे चोरासारखा प्रवेश करावा लागतो. समस्या अनेक आहेत, आणि त्या तुमच्या प्रत्येकाला माहित आहेत. या सर्वांची सल तुम्हाला नाही, पण आम्हाला मात्र नक्की आहे.
पण.. आम्ही १००% मतदान करणार..!!
आम्ही सर्वच्या सर्व ८५० सहजीवनवे मतदार १००% एकदिलाने व एकगहा मतदान करणार..!!
पण त्याच उमेदवाराता, ज्याने आमच्या सुविधांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि करत राहील,
जो नेहमीच सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने सहजीवनसोबत उभा होता आणि राहील, या वेळी मत हे ओळखीवर नाही, तर प्रामाणिकपणा, प्रत्यक्ष कृती आणि जबाबदारीवर दिलं जाईल.
आणि म्हणूनच आम्ही सर्व सहजीवनवासी आज स्पष्टच सांगतो,
फक्त निवडणुकीच्या तोंडावर मत मागायला येऊ नका. आता आश्वासनं नको, काम दाखवा.!! आणि जर आलातव, तर सहजीवनच्या प्रश्नांना, तसेच तुमच्या निष्क्रियतेला तिखट प्रश्नांच्या रूपाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा. यावेळी भाषणं नको, कामाचा हिशोब मांडा.
 
0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *