मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी उपाहारगृहे, स्वच्छतागृह बंद ठेवण्याचा फडणवीस सरकारचा अघोषित आदेश म्हणजे अमानवीयतेचा कळस!

मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी उपाहारगृहे, स्वच्छतागृह बंद ठेवण्याचा फडणवीस सरकारचा अघोषित आदेश म्हणजे अमानवीयतेचा कळस!

मराठा आंदोलकांची कोंडी करण्यासाठी उपाहारगृहे, स्वच्छतागृह बंद ठेवण्याचा फडणवीस सरकारचा अघोषित आदेश म्हणजे अमानवीयतेचा कळस!

 

     आपल्या हक्काचे आरक्षण मागण्यासाठी मुंबईत आलेल्या लाखो मराठा आंदोलकांची आझाद मैदान परिसरातील सर्व उपहारगृह, स्वच्छता गृह बंद करण्याचा आदेश देऊन राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पेशवाई सरकारने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांची गैरसोय व उपासमार झाली. खिशात पैसे असताना ही आंदोलकांना पाणी आणि जेवण मिळू शकले नाही. मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ही अशीच स्थिती आंदोलकांची होऊ नये म्हणून समाजवादी पार्टी, मुंबई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार सकाळपासूनच आंदोलकांना पाणी आणि जेवण पार्टीच्या वतीने वाटप करण्यात आले. तर आझाद मैदान व परिसरातील सर्व उपहारगृहे व स्वच्छता गृहे एक आदेश काढून बंद ठेवण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय हा नीचपणाचे लक्षण असून त्याचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे.
उपहारगृहे बंद ठेवण्याचा शासनाच्या आदेश म्हणजे नीच कृती असून याचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांनी या प्रकरणी आदेश दिल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यातून आंदोलकांसाठी जेवणाचे ट्रकच्या ट्रक भरून मुंबईकडे निघाले आहेत. आझाद मैदान हे दक्षिण मुंबईत असल्याने या परिसरातील मुस्लिम व अन्य समाज बांधवांनी ही आज पाणी आणि जेवणाच्या पाकिटांचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले.
आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही, हा निर्धार करून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आझाद मैदान व परिसरात पडाव टाकला आहे. हजारो आंदोलकांनी या परिसरात ठिय्या मांडला असून आरक्षण मिळाल्याशिवाय ते आता हटणार नाहीत, केवळ आंदोलकच नाहीत तर ते ज्या वाहनांनी आपापल्या जिल्ह्यातून आले आहेत, ती वाहने ही या परिसरातील सर्वच रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे वाहतुकीची ही मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेले व आरक्षण विरोधी ब्राह्मणी पेशवाई सरकार व प्रशासन दोन दिवस उलटून ही आंदोलकांशी बोलायला तयार नाही. उलट पक्षी आंदोलकांवर पोलिसांकरवी वेगवेगळ्या अटी लादत आहे. मात्र आंदोलक संसदीय मार्गाने व अतिशय शांततेने आंदोलन करीत आहेत.
लाखोंच्या संख्येचा माज आंदोलकांमध्ये नाही. मात्र सरकार आपला माजोरीपणा सोडायला तयार नाही. आंदोलकांनी आझाद मैदान व परिसरात जेवण बनविण्याची परवानगी सरकारला मागितली आहे. पण ती या सरकारने फेटाळून लावली आहे. पावसाचे दिवस असल्याने आझाद मैदानात चिखल व पाणी साचले आहे. असे असताना ही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.

       आंदोलक हे मतदार असल्याने मंत्र्याच्या बंगल्यात आसरा घेतील…..!
राज्य सरकारमधील फडणवीस यांच्यासकट अनेक मंत्री हे याच मराठा आंदोलकांच्या मतांमुळे निवडून आले असल्याने मंत्री म्हणून व आमदार म्हणून त्यांना मुंबईत जी सरकारी निवासस्थाने मिळाली आहेत, त्या निवासस्थानात घुसण्याचा ही आंदोलकांचा प्लान असून सरकारने येत्या एक दोन दिवसात सकारात्मक वाटाघाटी करून हक्काचे आरक्षण दिले नाहीतर हे आंदोलक मुख्यमंत्री, मंत्री , आमदार यांच्या निवासस्थानांना घेराव घालतील. त्यावेळी मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आंदोलकांचा अंत पाहू नये, हेच योग्य ठरेल.
      मराठा आरक्षण आंदोलकांना मुंबईच्या वेशीबाहेरच अडविण्याच्या प्रयत्नात सरकार व प्रशासन होते. पण अतिशय नियोजनबध्द पद्धतीने आंदोलकांनी मुंबईत प्रवेश मिळविला. आंदोलकांच्या एक दिवस अगोदरच आंदोलक मुंबईत येऊन दाखल झाले होते. दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ही आंदोलक शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. हजारो आंदोलक रस्त्यावर असून मुंबई पोलिस अथवा अन्य सुरक्षा व्यवस्थेबाबत एक ही तक्रारीची घटना घडलेली नाही. पोलिसांना राज्य सरकार व गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काहीही आदेश दिले असले तरी पोलिस आपल्या आपल्या विवेकबुद्धीचा वापर करूनच आदेशाचे पालन करीत असल्याचे दिसत आहे.
सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून मराठा व ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून एकमेकांच्या विरोधात लढविण्याचा प्रयत्न भाजप व मुख्य करून फडणवीस करीत आलेले आहेत. मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना रस्त्यावर उतरविण्याचे काम ही त्यांनी केलेले आहे. मात्र यावेळी त्यांची ही खेळी दोन्ही समाजाच्या लक्षात आल्याने एकमेकांच्या विरोधात न लढता आपल्या हक्काच्या आरक्षणाबाबत लढण्याचा निर्णय या समाजाने घेतला असून आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आंदोलकांनी हे आपल्या कृतीतून ही दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजप व फडणवीस यांचा हा डाव आता उलटा पडला आहे.
………………

राहुल गायकवाड,
महासचिव व प्रवक्ता समाजवादी पार्टी
महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *