देशात किंवा राज्यात कोणतेही आंदोलन उभे राहिल्यास त्याची वैचारिक दिशा तपासली जाते; त्यादृष्टीने मराठा आरक्षण आंदोलनाची वैचारिक दिशा आहे का? असेल तर कोणत्या विचारांची, यावर विश्लेषण करणारा हा व्हिडिओ.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली. तर, फुले यांचा वैचारिक वारसा छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे चालवला, शाहू महाराजांनी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक आंदोलन उभारण्यास मदत केली; हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा सत्यशोधक, ब्राह्मणेतर, अब्राह्मणी, बहुजन अशा वैचारिक चळवळीचा वारसा आहे! यात मराठा आरक्षण आंदोलन कोणत्या विचारांनी पुढे जातेय, याची ढोबळ चिकित्सा करणारा हा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा!