ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांचा मुद्दा महाराष्ट्राच्या व्यापक पटावर यावा, यासाठी मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांवरील परिषद रविवार, १४ डिसेंबर राजर्षी शाहू सभागृह, दादर, मुंबई येथे सकाळी १०-२ या वेळेस पार पडली. या परिषदेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित हे उपस्थित होते.
या परिषदेत गोवंडी, मानखुर्द, विक्रोळी, भांडुप, खिंडीपाडा या शाळेची अवस्था काय आहे, आणि किती शाळा बंद पडल्या आहेत तसेच शाळे मध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची एकूण संख्या, प्रसाधनगृहाच्या समस्या (विशेषत मुलींन करीत), एकूण वर्गखोल्या याचा आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या घटत्या संखेचे कारण काय? इमारत का धोकादायक ठरविण्यात आली? शाळेच्या स्थलांतराची कारणे? इत्यादि मुद्या वर परिषदेत चर्चा करण्यात आली.
या परिषदेत चिन्मयी सुमित म्हणाल्या, इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या अकर्षणामुळे पारंपरिक मराठी बालवाड्या बंद पडतांना दिसते. आणि मुलांना खाजगी शाळेत मिळालेल्या सुविधे मुळे पालकांचा कल खाजगी शाळेकडे वाढतांना दिसतात.
डॉ. दीपक पवार म्हणतात, मराठी शाळा बंद पडत आहे आणि ज्या शाळा सुरू आहे त्या शाळेत विद्यार्थी येणे अपेक्षित आहे. परंतु काही करणा मुळे मूले शाळेत येत नाही.
आणि महानगरपालिके कडून अपेक्षित उत्तर येत नसल्या कारणाने त्यांनी १८ डिसेंबर ला आंदोलनाचा इशारा पत्कारला आहे.