महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून माफीवीर सावरकराचा बचाव करण्याचा संघाचा अयशस्वी प्रयत्न…..!

महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून माफीवीर सावरकराचा बचाव करण्याचा संघाचा अयशस्वी प्रयत्न…..!

भारतरत्न डॉ. आंबेडकर समतेचा महासागर; तर, माफीवीर सावरकर विषमतेची वृक्षवेली......!

       दोन व्यक्ती, दोन ध्रुवावरील. एक समतेच्या वाटेने चालणारा, तर दुसरा कट्टर विषमतावादी. एक लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या राज्य व्यवस्थेचा पुरस्कर्ता आणि ती व्यवस्था आपल्या अथक प्रयत्नांनी या देशाला देणारा , तर दुसरा माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या अमानवीय हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणी धर्माचा पुरस्कर्ता. एक स्त्रियांचा सन्मान करणारा, त्यांना हिंदू कोड बिलाचा माध्यमातून न्याय,हक्क, अधिकारांची सनद देणारा, तर दुसरा बलात्कारी ( लंडनमध्ये तसा गुन्हा दाखल होता.), महिलांच्या हक्क, अधिकारांचा विरोध करणारा, त्यांना मनुवादी धर्माच्या कोंदणात डांबणारा. हिंदू कोड बिलाला विरोध करणारा, एक ब्रिटिश सरकारला खडे बोल सुनावत लुटारू म्हणणारा, तर दुसरा माफी वर माफी मागत ब्रिटिशांचे तळवे चाटणारा. एक,महात्मा गांधी राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील सरळ सरळ विरोधक असताना ही वेळ आल्यावर जीवदान देणारा, तर दुसरा रामराज्य आणण्याची ग्वाही देणाऱ्या महात्माची हत्या करणाऱ्याला साथ देणारा. इतका सारा टोकाचा विरोधाभास डॉ . आंबेडकर व सावरकर या दोघांमध्ये. मग पोक्ष्यासारखे खोटारडे लोक समानता दाखविणारा असा खोटा प्रचार का करतात ? तर त्याचे एकमेव कारण आहे की, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून माफीवीर सावरकरासारख्या ब्रिटिशांच्या दलालाला सन्मान मिळावा यासाठीच.
             खरे तर भारतरत्न डॉ. आंबेडकर व माफीवीर सावरकर यांच्यात तुलना आणि ते ही बरोबरीची करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. पण शरद पोक्ष्याने ती सोडली आहे. या जन्मात तरी त्याचा आणि लाज, शरमेचा काही संबंध नाही. तो येणार ही नाही. पूर्ण कोळून पिला आहे. निर्लज्जपणे अशा गोष्टी सोशल मिडियावर पसरवून सावरकरांना प्रसिद्धी देण्याचा हेतू या अशा पोस्ट मागचा असून यासाठी संघ व हिंदुत्ववाद्यांची एक पूर्ण टीम काम करीत आहे. सावरकरा संबंधी काही प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरे स्वतःच सकारात्मकपणे, संभ्रम निर्माण करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न ही टीम करताना दिसते आहे. 
       उदाहरणार्थ ….. सावरकराने लंडन येथे एका ब्रिटिश महिलेवर केलेल्या बलात्कार प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर सोशल मिडियावर अशी संदिग्ध उत्तरे देण्यात येतात की, असा गुन्हा लंडन येथे दाखल झालेला आहे. त्याची चर्चा ही आहे. विनायक सावरकर यांना शिक्षा ही झाल्याची चर्चा आहे. त्यांनी या प्रकरणी माफी मागितल्याची चर्चा ही आहे. मात्र कागदपत्री पुरावे उपलब्ध नसल्याने त्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. अशा पद्धतीने सावरकरांचा बचाव आणि त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम संघाचा आयटी सेल करताना दिसत आहे.
           डॉ . आंबेडकर आणि सावरकर यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही. डॉ. आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतोनात प्रेम करणारे, त्यांच्याकडून प्रेरणा घेणारे, छत्रपतींना प्रेरणा स्रोत म्हणणारे, तर सावरकर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांची जाहीरपणे बदनामी करणारे. आंबेडकर, धर्म आणि जातींच्या शोषणातून बहुजन वर्गाला मुक्त करणारे, तर सावरकर, ब्राह्मण पुरोहितांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या बहुजन वर्गासाठी मंदिरे बांधून धर्म, जातींच्या नावाने धंदा करणारे. ब्राह्मण पुरोहितांच्या पोटापाण्याची सोय करणारे. जातीय शोषण व्यवस्थेला मंदिरे बांधून बळकटी देणारे. 
       सावरकरांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच टीका अथवा घाणेरडे आरोप केलेले नाहीत, तर त्यांनी आंबेडकर यांच्यावर टीका ही केलेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभा विषयी बोलताना ” वायफळ प्रयत्न ” असे म्हटले आहे. तथागत गौतम बुद्धांवर ही आरोप करताना ” खोटारडा अहिंसक ” असे सावरकरांनी सलग सहा लेख लिहून बुद्धा विषयी म्हटले आहे. तर डॉ. आंबेडकर तथागत बुद्धाला त्रिवार वंदन करीत शरण गेलेले. कुठे आणि कसली समानता आहे या दोघांमध्ये. तरी ही पोक्ष्यासारखे लोक असा प्रोपगंडा करून सावरकरांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय त्यांच्याकडे अन्य मार्ग ही नाही.
          डॉ. आंबेडकर यांनी प्रथम पत्नी रमाई यांचे निधन झाल्यावर काही वर्षांनी डॉ. सविता कबीर यांच्याशी विवाह केला. तर सावरकरांनी पहिली पत्नी जिवंत असताना केवळ पैशासाठी दुसरा विवाह केला. रमाई आजारी असताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही डॉ. आंबेडकर यांनी पत्नी म्हणून रमाईची काळजी घेतली, तर सावरकरांनी निरुपद्रवी प्राणी म्हणून पत्नीची अहवेलना केल्याची चर्चा सर्वत्र आहे. कुठे समानता आहे. 
       
  सावरकरांची डॉ. आंबेडकर यांच्याशी बरोबरी करण्याचा संघाचा नीच डाव…..!
 
          या देशात राहणारे सर्व सर्वच भारतीय आहेत, अशी धारणा डॉ. आंबेडकर यांची होती. देशातील मुस्लिम, ईसाई समाज ही या देशाचे नागरिक असून त्यांना या देशात परकेपणाची वागणूक देणे गैर आहे, अशी डॉ. आंबेडकर यांची भूमिका होती व त्यासाठी त्यांचा संघर्ष ही सुरू होता. तर सावरकर या समाज घटकांना देशाचे नागरिक मानायलाच तयार नव्हते. असे असताना सावरकरांना डॉ.आंबेडकर यांच्या बरोबरीचे स्थान देणे, हा संघाचा कुटिल डाव आहे.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे नाव वापरून सावरकरांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न मोदी प्रधानमंत्री झाल्यावर जोरदारपणे सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली, असे धडधडीत खोटे विधान भाजपचे नेते व देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेले आहे. या मागे सावरकरावरील ब्रिटिशांचा दलाल हा बसलेला शिक्का खोडून काढण्याचा प्रयत्न आहे. पण पुरावे इतके उपलब्ध आहेत की, संघ, भाजप व मोदी सरकारला ते शक्य नाही. सावरकर ब्रिटिशांचे तळवे चाटून, माफी मागून सुटले व ६० रुपये प्रति महिना पेन्शन घेऊन त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी इमानदारीत काम करताना देशाशी गद्दारी केली. हे सत्य आहे. अत्यंत गरिबी आणि अंगावर कर्ज असताना ही डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटिशांशी हात मिळवणी करून स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. हा डॉ. आंबेडकर आणि सावरकर यांच्यातील मूलभूत फरक आहे.
         अनेक वेळा संधी असताना ही डॉ. आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारकडे वेगळा देश मागितला नाही. देशाच्या एकता व अखंडतेशी डॉ. आंबेडकर ईमानदार राहिले. तर द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडून व जीनाशी युती करून सावरकर यांनी या देशाचे विभाजन घडवून आणले. असे असताना शरद पोक्षे या दोघात बरोबरीची तुलना कशी काय करू शकतो ? या देशातील जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माफीवीर सावरकर यांच्या विषयी सर्वच माहित असल्याने संघ आंबेडकर यांच्या नावाचा आसरा घेऊन सावरकरांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात सफल होणार नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. यात शंका नाही.
……………………….
 
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *