• 25
  • 1 minute read

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्य…

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्य…

महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्य…

आज हवे होते ज्योतिबा , आज हवे आहेत नवीन ज्योतिबा ; विशेषतः तरुण वर्गाला सांगायला

अभ्यासाचे महत्व सांगणारे , अभ्यासातून बुद्धी कमवण्याचे महत्व सांगणारे

इंग्रजी भाषा नक्की कशासाठी शिकायची ? आणि मराठी / प्रांतीय भाषा आणि इंग्रजी भाषा शिकणे कसे परस्परपूरक असू शकते ; त्यात बुद्धिभेद करून घेऊ नका हे समजावून सांगणारे

एकाच वेळी ललित साहित्य / नाटक / पोवाडा / आणि वैचारिक मांडणी केली पाहिजे ; ललित , वैचारिक हे साहित्याचे वर्गीकरण गरजेचे नाही ; साहित्यासाठी साहित्य नाही , तर समाजबदलासाठी साहित्य हवे हे सांगणारे

एकच एक क्षेत्र नाही , तर एकाच वेळी अनेक क्षेत्रात तुम्ही कार्य करू शकता ; एकच एक क्षेत्र निवडून आयुष्याचा लांबच लांब बोगदा करून घेऊ नका सांगणारे

“वित्ताचे” महत्व सांगणारे , पैसे मिळवण्याचे महत्व सांगणारे

पैसे मिळवलेत म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचे मिंधे व्हायलाच पाहिजे असे नाही ; पैसे मिळवून देखील तुम्ही त्या त्या काळातील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करू शकता ; पैसे मिळवणे आणि बंड करणे यात काही द्वंद्व नाही हे सांगणारे

इतक्या दशकानंतर देखील औद्योगिक / कॉर्पोरेट / वित्त भांडवलाने शेती , शेतकऱ्यांची आर्थिक निर्भत्सना सुरूच ठेवली आहे म्ह्णून आसूड उगारणारे,

हे सगळे करतांना , शारीरिक तंदुरीस्ती , शरीर सौष्ठव कडे दुर्लक्ष नाही करायचे हे सांगणारे

समाजासाठी काम करतांना देखीलटेचात राहणारे ; त्या त्या काळाला सुसंगत स्टाईल स्टेटमेंट देणारे

उत्पादक शेअर मार्केट आणि आजचे सट्टेबाज शेअर मार्केट यातील फरक समजावून सांगणारे

भ्रष्ट / अपारदर्शी बांधकाम व्यवसाय / रियल इस्टेट व्यवसाय देखील कसा सचोटीने / प्रोफेशनली करायचा हे सांगणारे

नवीन विचार मांडताना , कोणीही पाठीशी नसताना , एकटेपणाचा बाऊ न करता , सावित्रीला बरोबर घेऊन , नदीच्या प्रवाहाच्या विरोधी पोहणारे

आजच्या स्वतःला लिबरेटेड म्हणवणाऱ्या मुलींना / तरुणींना , शेकडो वर्षाचा स्त्री गुलामगिरीचा इतिहास सांगणारे ; स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे समजावून सांगणारे

संजीव चांदोरकर (२८ नोव्हेंबर २०२५) महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *