- 40
- 1 minute read
महात्मा फुले वाडा : एक अनुभव
आम्ही दोघेच होतो. साहित्यिक डॉक्टर रवीनंदन होवाळ सोबत होते. समता भुमीला जायची तीव्र इच्छा होती. उन्हातच गेलो होतो. वॉचमन आणि काही सफाई कर्मचारी कामात व्यस्त होते. परंतु आमच्याशी दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास बोलू लागला.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या भूमीत वावरत होते ती भूमी आमच्याशी स्पष्टपणे व्यक्त होऊ लागली.
प्रथमच आम्ही त्यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश केला. तिथे काही त्यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. स्वयंपाक गृह असा फलक होता. दीडशे पावणे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आमच्या डोळ्यापुढे तरळू लागला.
ब्रिटिश राजवट होती प्रारंभी राजा राम मोहन रॉय यांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती करण्याची तुतारी फुंकले त्यांच्या कार्याचा जातिव्यवस्थेवर थोडाही परिणाम झाला नव्हता बंगालमध्ये अस्पृश्यतेला मूठमाती देण्यासाठी प्रत्यक्ष कार्य आरंभ केला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याच काळामध्ये अस्पृश्यांचे समोर उच्चाटन करून आधुनिक भारताला सामाजिक समानता निर्माण करण्याचा महान संदेश महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला पुराणमतवादी व्यवस्थेला त्यांच्या छळाला अलौकिक धैरणे तोंड दिले अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी अबूतपूर्व बंड महात्मा फुले यांनी पुकारले अस्पृश्य बांधवांसाठी पुण्यात 1848 स*** शाळा काढून भारताच्या अडीच हजार वर्षाच्या आयुष्य क्रमात अपूर्वा अशी महान क्रांतिकारक घटना घडवली इतकेच नव्हे तर शाळेतील शिक्षक मिळत नव्हते म्हणून आपल्या अशिक्षित पत्नीस सुशिक्षित करून सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केले पवित्र कार्य हाती घेतले यावेळी हिंदू सनातन धर्मांना विटंबना सहन झाली नाही स्त्रीला शिक्षण देऊन आत्मवृत्तिचा मार्ग मोकळा करून देणे व शुद्रांना आणि अतिसुद्रांना शिक्षण देऊन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक विषमता नष्ट करून त्याला उभे करणे हे ज्योतिरावांच्या आयुष्यातील एक मिशन होते.
महाराष्ट्रात अस्पृश्य समाज आपल्या घोर गुलामगिरीतून जागा होत होता तो थोडेफार हालचाल करू लागला समाजाचे पहिले पुढारी गोपाळबाबा वल्लंकर अस्पृश्यता ही देवनिर्मित नसून मनुष्यनिर्मित आहे असा टाहो फोडत होते महात्मा फुले यांच्या चळवळीत ते तयार झाले होते साधु वृत्तीने आपली गार आणि ते वर्तमान वर्तमानपत्रे कीर्तने सामाजिक परिषदांमधून मांडत होते हिंदू समाज आपल्या एका घटकावर करीत असलेल्या घोळ अन्यायाकडे ते सुशिक्षित हिंदूंचे लक्ष वेधित होते दयानंद आणि अस्पृश्यता निवडण्यासाठी फार मोठा लढा लढविला कर्नल अल्कोट आणि ख्रिस्ती धर्मपोदेशक यांच्या अस्पृश्यांसाठी शाळा अद्याप सुरू झाल्या नव्हत्या ब्रिटिशांची राजवट होती अस्पृश्यतेचे गडद अमावस्या होती अस्पृश्यांच्या वर्गाच्या स्थितीत शिक्षणाच्या दृष्टीने हळूहळू फरक पडू लागला पेशवाई क ब्राह्मणांच्या हाती राज्यकारभार होता शिक्षण घेणे ही ब्राह्मणांचीच मिराजदारी होती अब्रह्मणांनी शिक्षण घेणे ही कल्पना त्याकाळी अ धार्मिक होती ब्राह्मणांना तो असह्य होईल विद्या संपादन करणे आपले काम नव्हे असे पिढ्यानपिढ्या ब्राह्मणांनी त्यांच्या नावा मनावर बिंबवले होते 1820 स*** ब्रिटिशांनी पुण्यातील ब्राह्मणांकरिता संस्कृत पाठशाळा सुरू केली 30 वर्षानंतर त्या पाठशाळेत ब्राह्मणे तर हिंदू मुलांना प्रवेश द्यावा असे इंग्रजांनी ठरवताच त्या पाठशाळेतील बहुतेक सर्व ब्राह्मण अध्यापकाने ब्रिटिशांच्या नवीन धोरणाला कडाडून विरोध केला अनेकांनी राजीनामे दिले त्या धोरणाचा निषेध म्हणून जवळजवळ सर्वांनीच त्यावर बहिष्कार टाकला वरच्या वर्गातील ब्राह्मण इतरांच्या शाळा प्रवेशाची ब्राह्मणे तराना नि अस्पृश्यांना शिक्षण दिले तर ब्राह्मण विरोध करतील अशी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती तो विरोध उडवून घेण्यास धूर्त राजकारणी त्याकाळी फारसे राजी नव्हते खालच्या समाजाला शिक्षण देऊन जर क्रांती झाली तर वरिष्ठ वर्गातील वर्गाच्या अगोदर आपापली होळी होईल अशी ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष लॉर्ड एलईनबरो सारख्या मुत्सदयाला वाटत असे.
या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घरात आम्ही प्रवेश केला महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या प्रतिमा त्या पुढच्या हॉलमध्ये लावल्या होत्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यातील घडलेल्या ठळक घटनांची भिंती चित्रे लावली आहेत त्या आम्ही न्याहाळत होतो तसेच 868 ला ज्यावेळी दहा वर्षे दुष्काळ होता त्यावेळेस अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवली होती त्यावेळी महात्मा फुलेंनी आपला पाण्याचा हात खुला केला तो हाऊस आम्हाला त्या इतिहासाची आठवण करून देत होता.
फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहिला त्याचे त्याचे भिंतीचित्र आम्ही पाहत होतो. ब्राह्मणांच्या वरातीतून हाकलून देणे, महात्मा फुलेंवरचे मारेकरीचा प्रसंग, हे सर्व भिंतीफलकं आम्ही पाहत होतो.
महात्मा फुले यांचा जीवनपट मूर्तिमंत डोळ्यापुढे उभा राहिला होता.
– दत्तात्रय गायकवाड