भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो लोक चैत्यभूमी येथे अभिवादनाला येत असतात या अभिवादनास येणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी जेवणाचे, पाण्याचे, विविध उपक्रमांचे, पुस्तकांचे स्टॉल , मंडप लागतात, शिवाजी पार्क येथे असलेले सामान्य स्टॉल हे पुस्तक विक्रीचेच असतात असे नाही तर अनेक स्टॉल हे विविध सेवाभावी उपक्रमांचे, संविधान, कायदेविषयक जन जागृती, शिक्षण विषयक जागृती, आर्थिक विषयी जागृती, आरोग्य विषयी जागृतीचे स्टॉल असतात जे कोणताही मोबदला न घेता सेवा देत असतात.
चैत्यभूमी परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे लागणाऱ्या स्टॉल च्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा भाव सोडून यावर्षी व्यवसाय करू इच्छिते आहे. येथील प्रत्येक छोट्या स्टॉल साठी किमान रुपये 5118₹ आकारले आहेत. ज्या स्टॉल साठी दर वर्षी महानगरपालिका व डेकोरेटर यांचे मिळून एकूण २००० रुपये द्यावे लागत होते तिथे महानगरपालिका यांनी 5118 रुपये आकारले आहेत. ५०० च्या वरती स्टॉल लागतात ५०० जरी स्टॉल पकडले तरी 25,59000रुपये होतात. म्हणजेच महानगरपालिका महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनातून आंबेडकरी अनुयायींन कडून लाखो करोडो रुपये कमवू इच्छिते…
एवढे पैसे जर आकारले जात असतील तर महापरिनिर्वाण दिनासाठी असलेला फंड गेला कुठे? हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही…