• 107
  • 1 minute read

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३

इहवाद + समता + स्वतंत्र + बंधुता + सामाजिक न्याय = धम्म
धम्म ही वरील सर्वच परस्पर संवर्धक मूल्यांची बेरीज होय. या धम्माच्या अनुशासनानुसार अर्थात धम्माने नियंत्रित होणारे राजकारण, शिक्षण, अर्थकारण, साहित्य, तत्वज्ञान ही जीवणाची अंगे आणि आविष्कार होत. एक सुसंगत मूल्यव्यवस्था, एक परस्पर संवर्धक प्रमानमूल्याची घटना साकार होते. या घटनेच्या संस्कारातून एक विवक्षित मानस शास्त्र जन्म घेते. विचार-आचार या दोन्ही आविष्कारामधून हे मानसशास्त्र प्रकट होते. हे मानस शास्त्र साकार करणाऱ्या व्यक्तींच्या सहजीवणाचा सुंदर प्रयोग म्हणजे आदर्श समाज होय. अशा व्यक्तींच्या संबंधांची परस्पर कल्याणकारक जीवनशैली म्हणजे आदर्श समाज होय. परिग्रहनशील सहज प्रवृत्तीवर सामाजिक न्यायाद्वारे धम्म नियंत्रण ठेवतो. सर्जनशील सहज प्रवृत्ती ही निरपेक्ष वृत्तीने जीवनासाठी नवनव्या गोष्टी जन्माला घालते. ही परहितकारी व सर्वजण सुखाय वृत्ती आदर्श समाजात सर्वात मूलभूत आणि आदरणीय मनाली जाते. हीच आदर्श जीवणाची वाट असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले हे आदर्श समाजाचे प्रारूप (model), ही बुद्धीवादनिष्ठ मानवतावादी (Rational Humanitarianism) आहे. यालाच सर्वमानवहितवाद असे म्हणता येईल. त्याचा नियंत्रक पाया बुद्धीप्रामाण्यवाद आहे. मानवी जीवनातील दु:खे आणि त्रुटि नष्ट करून मानवहित, मानवत्वाची प्रतिष्ठा बुद्धीप्रामाण्याच्या प्रमाणमूल्यांच्या अनुसार वृद्धिंगत करणे हे या मानवतावादाचे स्वरूप आहे. म्हणुनच बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्यात बंधुत्वाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. हे संविधानाच्या खाली दिलेल्या प्रस्ताविके/ उद्देशिके वरुन दिसेल. संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निर्गुणनिष्ठ आणि निर्मिकनिष्ठ मानवतावादापेक्षा हा आंबेडकरी मानवतावाद प्रकृतीत निराळा आहे.
उद्देशिका
“आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:

सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता;‍
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.”

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *