पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपलं लक्ष वेधून घेतलं..
दरभंगा येथे नरेंद्र मोदी यांच्या आईंबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली गेल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी डोळ्यात पाणी आणून दिली.. “#आई” हा शब्दच असा आहे की, तो उच्चारला तरी डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या होतात… आईबद्दल कोणी वाईट बोललं तर डोळ्यात पाणी येणं, आणि संताप येणं देखील अगदीच स्वाभाविक असतं… त्यामुळं पंतप्रधानांच्या भावना आम्ही समजू शकतो.. पंतप्रधानांच्या आईबद्दल ज्यानं कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.. #मुद्दा पंतप्रधानांच्या दिवंगत आईंबद्दल को# आक्षेपार्ह बोललं हा आहे? राहूल गांधी बोललेत का? तर नाही तेजस्वी यादव बोललेत का? तेही नाही.. पण भासविलं असं जातंय की, पंतप्रधानांच्या आईबद्दल राहूल गांधीच आक्षेपार्ह बोलले.. ते खरं नाही..अगदी धादांत खोटं आहे.. वास्तव काय आहे बघा..
दरभंगा येथील जाहीर सभा संपवून राहूल गांधी, तेजस्वी यादव निघून गेले होते.. नंतर स्टेजवर अनेक जण चढलेले होते..त्यापैकी एकानं माईक हातात घेऊन त्यानं आक्षेपार्ह टिप्पणी केली.. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटकही केली आहे.. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं आता समोर येतंय.. म्हणजे हा देखील एका षडयंत्राचा भाग असू शकतो.. चौकशीतून ते समोर येईलच.. कायदा आपलं कामही करेल.. यात राहूल गांधी किंवा तेजस्वी यादव यांची काय चूक? त्यांच्या उपस्थितीत असं काही झालं असतं तर आपल्याला राहूल गांधी यांना दोषी धरता आलं असतं.. पण जे घडलं, ते राहूल गांधींच्या अपरोक्ष.. पण हा विषय घेऊन कॉंग्रेसच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत, कॉग्रेसच्या कार्यालयावर हल्लाही केला गेला.. बिहार निवडणुका पर्यत हा विषय धुमसत राहील याची काळजी घेतली जाणार आहे.. वोट चोरीच्या वास्तवाला भावनिक विषय पुढं करून उत्तर देण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न असणार आहे.. खरं तर कोणीच कोणाच्या आईबद्दल वाईट बोलू नये हे जसं अपेक्षित आहे तव्दतच कोणीही आपल्या आईची ढाल पुढं करून आपल्या राजकारणासाठी वापर करू नये अशीही अपेक्षा असते.. दुर्दैवानं राजकारणाचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवर आलाय की, कोणीच याचं भान बाळगत नाही.. कोणी म्हणजे अगदी कोणीच नाही..
#बघा, जर्शी गाय, कॉंग्रेस की विधवा, बारबाला, इटालियन डान्सर 50 करोड की गर्लफ्रेन्ड ही सारी अभद्र विशेषणं भाजप नेत्यांनी एका आईबद्दलच वापरली होती ना? भक्तांना हे सारं आठवणार नाही.. जनता कधीच काही विसरत नाही.. आईंबद्दल भेद कसा असू शकतो.. माझी आई ती आई आणि तुझी आई, आई नाही.. असं तर असू शकत नाही.. आई सगळ्यांची सारखीच असते.. पंतप्रधान असोत की, विरोधी पक्ष नेते.. सर्वच आईबद्दल, महिलांबद्दल सर्वांनीच आदर बाळगला पाहिजे ही अपेक्षा असते.. सभ्यतेचा, संस्काराचाही तो भाग असतो.. दुर्दैवानं तसं होत नाही.. आईमध्ये फरक केला जातो.. विरोधी पक्ष नेत्यांच्या आईंबद्दल असभ्य भाषा वापरली जाते तेव्हा त्याचा साधा निषेधही कोणी करीत नाही? का? तो देशातील कोट्यवधी आईंचा अपमान नसतो का.. याचा कोणी निषेध करायचा? कॉग्रेसनं तेव्हा भाजपच्या कार्यालयावर हल्ले केले नाहीत, आंदोलनं केली नाहीत.. किंवा नैतिकतेचे ढोल बडवले नाहीत.. तेव्हा भाजप आज ज्या नैतिकचे ढोल बडवत आहे ते पटत नाही..