• 42
  • 1 minute read

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.

 मित्रहो,
महाराष्ट्रात नुकत्याच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपन्न झालेल्या आहेत तर जानेवारी २०२६ महिन्यात उर्वरित सर्व, महानगरपालिकासह निवडणुका संपन्न होणार आहेत. राज्यात या निवडणुकांत कॉंग्रेसप्रणित चार ते पाच प्रमुख राजकीय पक्षांची महाविकास आघाडी ही अस्तित्वाची लढाई लढणार असून भाजपाप्रणित चार-पाच प्रमुख राजकीय पक्षांची महायुती ही वर्चस्वाची लढाई लढणार आहेत. म्हणजेच एका अर्थाने महायुती व महाविकासआघाडी यांनी राज्यात राजकीय ध्रुवीकरणच केलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुती व आघाडी यांच्या व्यतिरिक्त स्वतःची स्वतंत्र धोरणे व कार्यक्रम असणार्‍या दलित-आदिवासी-गरीब-ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक समुदायाच्या न्याय हक्काचे व सशक्तिकरणाचे राजकारण करणार्‍या तमाम छत्रपती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी या राजकीय पक्षांनी व नेत्यांनी स्वअहंकार तसेच परस्परांतील मतभेद दूर ठेवून या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पर्यायी राजकारण व जनताभिमुख धोरणांना राज्याच्या राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी एकत्रित निवडणुका लढविणे ही आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे; हे ध्यानात घेवून निवडणुका लढणारे शिव-फुले-शाहू-आंबेडकरी राजकीय पक्ष, आदिवासी-अल्पसंख्यांकांचे राजकीय पक्ष व स्वतंत्र भूमिकेचे राजकारण करणारे ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या पक्ष-संघटना यांनी एकत्रितपणे ठाम भूमिका घेऊन एकत्रित निवडणुका लढवाव्यात असे आवाहन ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’, संस्थापक-अध्यक्ष, ॲड. डाॅ. सुरेश माने यांनी मुंबई प्रदेश बी. आर. एस. पी. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना केले. 
 
सध्या संपूर्ण राज्यात महायुती व आघाडी यांच्यातच चार-पाच प्रमुख पक्ष असल्याने त्यांच्याकडून इतर राजकीय पक्षांना जागा सोडण्याचा प्रश्न येतच नाही. शिवाय राज्यात महायुती व आघाडी हे प्रस्थापितांचेच राजकीय पक्ष असून त्यांना स्वतंत्र आंबेडकरी किंवा दलित-आदिवासी-ओबीसींचे राजकारण नकोच असल्याने ते राज्यभर दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांक पक्षांना डावलण्याचे हेतुपुरस्कर राजकारण करीत आहेत. आणि हीच बाब शोषित वर्गांच्या बहुतेक सर्व राजकीय पक्ष-संघटनांना एकत्रित करणारा दुवा असून असे एकत्रीकरण करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरे गेल्यास हे दलित-आदिवासी-ओबीसी-मुस्लिम राजकारणाचे शक्तिस्थळ बनू शकते. त्यामुळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी अशा व्यापक व रचनात्मक धोरणांचा पुरस्कार करते व इतर समविचारी राजकीय पक्ष-संघटना यांनी सुद्धा याच धोरणाचा पुरस्कार करून समदुःखी, समविचारी, राजकीय पक्षांनी एकजुटीने या निवडणुकीत उतरावे असे आवाहन देखील डॉ. माने यांनी करतांना नुकतेच विदर्भात गडचिरोली व नागपूर ग्रामीण नगर परिषद निवडणुकांत असे घडल्याचे देखील स्पष्ट केले. 
 
 
0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *