समाजवादी पक्षाच्या प्रवक्तेपदी राहुल गायकवाड यांची निवड
मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांची निवड केली असून चार प्रवक्त्यांमध्ये पक्षाचे प्रदेश महासचिव राहुल गायकवाड यांचीही निवड केली आहे. अन्य प्रवक्त्यांमध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पी.टी. जोशी पाटोदेकर, अन्य महासचिव परवेझ सिद्दिकी, अनिस अहमद यांचीही प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. हे चार प्रवक्ते प्रसार माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडतील, अशा आशयाचे पत्रक समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यावेळी, राहुल गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, पक्षाध्यक्ष अबू आझमी यांनी माझ्याकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या असताना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यांनी माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यांचा विश्वास यापुढेही सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.