मुंबई, दि. २ : प्रतिनिधी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र श्रमिक सभे’चे संस्थापक सरचिटणीस केतन कदम यांनी नुकतेच ‘कामगार मेळावा २०२४’चे आयोजन केले होते. या निमित्ताने ‘प्रगतशील कोंकण सामाजिक संस्था’ या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. वेस्टर्न बँक्वेट, शेकाप भवन, माहिम येथे हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला जगातील कामगारांनी एकत्र यावे हे कार्ल मार्क्स यांच्या संदेश उच्चारून शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू कोरडे यांनी मार्दर्शन केले तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी कोकणातील प्रेरिकांच्या सोडवलेल्या प्रश्नांसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी घरेलू महिला कामगार मुंबई विभाग अध्यक्षा स्नेहा लोखंडे – अहिरे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)चे अविनाश कदम, मंगेश जाधव, नरेंद्र जाधव, ‘प्रगतशील कोंकण सामाजिक संस्थे’चे सरचिटणीस योगेश कांबळे, पांडुरंग तोरसकर यांच्यासह कंत्राटी कर्माचारी आणि घरेलू कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन कदम तर सूत्रसंचालन उमेश मोहिते यांनी केले.