- 44
- 1 minute read
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा अहंकार…
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. विरोधी पक्षाची एक यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे महाराष्ट्रात संविधान वाचविण्यासाठी सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत या सेक्युलर पक्षांना 48 जागांचे आपापसात वाटप करून घ्यावयाचे आहे त्यांचे आपसात जागावाटप होत नाही आणि म्हणून आपलं अपयश लपविण्याच्यासाठी युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा खोडा आहे अशा पद्धतीचा चित्र काही तथाकथित पत्रकारांच्या मार्फत व न्यूज चॅनलच्या मार्फत निर्माण केलं जात आहे
महाविकास आघाडीतील पक्षांची सद्यस्थिती आपण बघूयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आता गेल्या काही काळामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी मुरली देवरा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दुसऱ्या पक्षात निघून गेलेत
राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेली आहे महाविकास आघाडीत समाविष्ट असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा पक्ष आणि पक्ष चिन्ह हे फुटीरगटाकडे गेलेले आहे तशीच परिस्थिती शिवसेनेची सुद्धा आहे शिवसेनेचा पक्ष आणि पक्षचिन्ह हे सुद्धा फुटीरगटाकडेच गेलेले आहे
आता पक्ष आणि पक्ष चिन्ह हे फुटीर गटाकडे गेलेले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडे आज मीतिला निवडणूक आयोगाच्या दप्तरी शून्य मतांची आकडेवारी नोंद आहे कारण हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीत हे वास्तव या दोन्ही पक्षांनी स्वीकारणे गरजेचे आहे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गेल्या वेळेला एकमेव खासदार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आला होता त्यांचा देखील आजारपणा मध्ये मृत्यू झालेला आहे
हे वास्तव महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी समजून घेणे गरजेचे आहे
वंचित बहुजन आघाडी गेल्या निवडणुकीच्या वेळेला स्थानिक पातळीवरती कुठलेही संघटन नसताना निवडणुकीच्या सामोरे गेली आणि जवळपास 44 लाख मते मिळवली निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीने जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवरती रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये कोविडमध्ये निर्माण झालेल्या उपासमारीच्या संदर्भामध्ये जनसामान्यांच्या बाजूने उभे राहून वेगवेगळी आंदोलने रस्त्यावरती केलीत त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांमध्ये पक्ष संघटन सुद्धा मजबूत करण्यावरती वंचित बहुजन आघाडीने भर दिलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा लाखोंनी सभा होत आहेत आणि हे सगळं उभा महाराष्ट्र बघतो आहे
परंतु महाविकास आघाडीतील प्रस्थापित घटक पक्ष हे वंचित बहुजन आघाडीची वाढलेली ताकद स्वीकारण्याची तयारी दाखवीत नाही आहेत वरवर हे घटक पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणवतात आणि संविधान वाचवण्यासाठीची असणारी वरवरची भूमिका घेतात परंतु त्यांचं प्रेम हे केवळ घराणेशाही वाचवणे या पुरताच मर्यादित आहे असं मला वाटते आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका जी वंचितांचा राजकारण करीत आहे या समाजातील वंचित दुर्लक्षित व बहुजन समाज घटकाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आनु इच्छित आहे तेच कदाचित या प्रस्थापित महाविकास आघाडीतील पक्षांना पटत नसावे
आणि म्हणूनच हे प्रस्थापित महाविकास आघाडीतील तथाकथित सेक्युलर पक्ष वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा घटक म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत महाविकास आघाडीचा भाग करून घेणे तर सोडाच परंतु वंचित बहुजन आघाडीची माध्यमांचा वापर करून तथाकथित पत्रकार व काही निवडक न्यूज चॅनलला हाताशी धरून बदनामी करण्याचा डाव या तथाकथित सेक्युलर पक्षांनी आखलेला आहे
परंतु आंबेडकरी व वंचित बहुजन जनता आता जागरूक झालेली आहे हे देखील या घटक पक्षांनी विचारात घ्यावे आणि त्यानुसार आपली पुढील भूमिका ठरवावी हे माफक अपेक्षा
वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या युतीच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक अशा पद्धतीने वागत आहेत युती व्हावी सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये ही नेते बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका राहिलेली आहे युतीमध्ये आम्हाला किती जागा मिळतात यापेक्षा मतांचे विभाजन होऊ नये आणि संविधानाचे रक्षण व्हावे ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे या बाळासाहेबांच्या भूमिकेला महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती गांभीर्याने घेतात हे बघणे गरजेचे आहे
-डॉ. मनोज निकाळजे
(राज्य समन्वयक फुले आंबेडकर विद्वत सभा)