• 95
  • 1 minute read

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!

         15व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळजवळ हाती आले असून महाराष्ट्राचा निकाल लावणारे हे निकाल आहेत.असे निकाल हाती येतील, हे कुणाला ही वाटले नव्हते. अनपेक्षित निकाल आहेत. हे निकाल म्हणजे राज्यातील जनतेचा कौल आहे, असे म्हणण्याची हिंम्मत संघ, भाजप वगळता कुणीच म्हणणार नाही. कारण राज्यातील जनतेने गेल्या 6 महिन्यांपूर्वीच भाजप व मित्र पक्षांना पूर्णपणे नाकारले होते. त्यामुळे आजचे निकाल म्हणजे राज्यातील जनतेचा कौल नाही. हे नक्की. पण निकाल समोर आहेत. अन ते मान्यच करावे लागणार आहेत. मात्र त्याबाबतची वस्तूनिष्ठ समिक्षा तर करावी लागणारच असून या सर्व वातावरणात ती होणे ही गरजेचे अन राज्याच्या पुढील भवितव्यासाठी आवश्यक आहे.

         निकालाची वस्तूनिष्ठ समिक्षा करीत असताना निवडणूकपूर्व वातावरणाचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. अन हा विचार करीत असताना भाजप व मित्र पक्षांना इतके भरभरून यश मिळेल, असे वातावरण राज्यात मुळीच नव्हते. शिवाय इतके मोठे यश पदरी पडेल, असे भाजपला ही वाटत नव्हते. मग यश मिळाले कसे ? हा प्रश्न उरतोच. तर त्याचे उत्तर EVM हेच आहे. राज्यात मतदान संपल्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने 58 % टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. पण ही टक्केवारी वाढत – वाढत 64 % टक्क्यावर म्हणजे 6 % टक्क्याने वाढली. ही वाढलेले 6 टक्के महाराष्ट्राची वाट लावतात की काय ?असे चिंतेचे सावट निकालावर तूर्त तरी होते. अन यामुळेच हे अनपेक्षित असे निकाल हाती आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून संघ व भाजप अद्याप ही सावरलेले नव्हते व नाहीत. महाराष्ट्रद्रोही भाजप, गद्दार शिंदे व पवार यांचा पुरता निकाल लावण्याचे काम या निकालांनी केले आहे. राज्यातील जनतेला महाराष्ट्र विरोधी महायुती नको होती, हे या निकालांनी दाखवून दिले होते. त्यामुळे आज हाती आलेले निकाल स्वीकारत असताना ते मानायला कुणाचीच तयारी होत नाही. हे ही खरे आहे.
          या अनपेक्षित निकालाचे मूळ EVM व वाढीव 6 % टक्के मतदानात आहे, हे मान्य करूनच यासंदर्भात पुढील चर्चा करीत असताना महाविकास आघाडी व आघाडीतील घटक पक्षांच्या बाबतीत ही विचार करणे आवश्यक आहे. अन यावर चर्चा करीत असताना खरेच भाजप व मित्र पक्षांच्या महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी निवडणूक मैदानात लढली का ? हा ही एक प्रश्न असून याचे उत्तर नाही, असेच आहे. लोकसभेप्रमाणेच निकाल लागले पाहिजेत, याची मोर्चे्बांधणी गेल्या 6 महिन्यात करण्याची संधी राज्यातील मविआ नेत्यांसमोर होती. पण ती संधी त्यांनी वाया घालविली, हे त्यांच्या गेल्या 6 महिन्यातील राजकीय व्यवहारवरून स्पष्ट दिसत आहे. या उलट लोकसभेतील पराभवाला विजयात रूपातरीत करण्याचे काम भाजपने केले. मग त्यासाठी त्यांनी अतिशय चाणक्षपणे 6 % मते वाढविण्याची व्युहरचना अतिशय कल्पकतेने केली. अन आपल्याला हवा तो निकाल लावून घेतला. आता आपण या निकालाला अनपेक्षत निकाल म्हणत आहोत.
        राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्र विरोधी आहे, हे या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय व धोरणांमुळे स्पष्ट झाले आहे. पण या सरकारचा महाराष्ट्रद्रोह चव्हाट्यावर आणण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष व त्यांच्या नेत्यांना अपयश आले. महाविकास आघाडीचे नेते राज्यातील गंभीर प्रश्नांना सोडून स्वतःच्या व आपापल्या पक्षांचे अस्तित्व टिकविण्यात अडकून पडले होते. हे निवडणुकीच्या काळात स्पष्ट दिसत होते. त्याशिवाय निकाल आपल्यासाठी फायदेशीर करण्यासाठी भाजप निवडणूक आयोगाशी संधान बांधून काय काय करू शकते, याकडे या नेत्यांचे कसलेही लक्ष नव्हते की त्याबाबतची कसली ही रणनीती नव्हती. विरोधकांच्या याच गाफिलपणा व राजकीय अपरिपक्वतेचा फायदा घेण्याची रणनीती भाजपने आखली व त्यात ते यशस्वी झाले. त्याचाच परिणाम आजचा निकाल आहे.
        लोकसभेचे मैदान सर केल्यानंतर विधानसभेचे मैदान मारण्याची रणनीती मविआने आखली असती, तर आजचा निकाल नेमका उलटा लागला असता. हे खरे आहे. मात्र मविआमधील घटक पक्ष व नेत्यांमध्ये निवडणुका जिंकण्याची राजकीय अक्कलच नसेल, तर असेच निकाल हाती लागतील. यास अनपेक्षित निकाल म्हणून त्यापासून कुणाला ही वेगळे होता येणार नाही. या पराभवास राज्यातील मविआ म्हणजे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची सेना या पराभवास जबाबदार आहे.
       निवडणूक आयोगाची भुमिका अन EVM चा रोल माहित असताना मतदान प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात मतदानाचा टक्का वाढू नये, यासाठी जी जागृरता विरोधकांमध्ये असायला हवी होती, ती दिसली नाही. अन त्याबाबतची संधी साधून 6 टक्के मतदान वाढविले. त्याचा परिणाम हा निकाल आहे. त्याशिवाय महाराष्ट्रद्रोही, गद्दार शक्ती व युतीला निवडणुकीच्या मैदानात संयुक्तपणे आव्हान देण्याचा प्रयत्न ही मविआने केला नाही. तर मोदीची झोप उडविणाऱ्या इंडिया आघाडीचे दफन राज्यात काँग्रेस व शरद पवारांनी केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षा धर्मांध शक्तीच्या विरोधातील लढाई थोडी कमजोर झाली. याचा ही परिणाम हा निकाल आहे.
         लढेंगे और जितेंगे, हा मोदीला पर्याय म्हणून उभा राहिलेल्या इंडिया आघाडीचा नारा होता. देशातील जनतेच्या मनातील तो निर्धार होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या एकच वर्षा अगोदर स्थापन झालेल्या इंडिया आघाडीने या निवडणुकीत भाजप व भाजपच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले. ऐनवेळी चंद्रबाबू नायडू मदतीला आले नसते तर मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकले नसते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश इंडिया आघाडीला मिळाले होते. खरे तर ही आघाडी विरोधी पक्षांची नव्हतीच, तर ती संघ, भाजप, मोदी या फॅसिस्ट शक्ती विरोधातील भारतीय जनतेची होती. ती आघाडी मोडीत काढण्यातच भाजप व भाजप आघाडीचे यश होते. तेच राज्यातील मविआ नेत्यांनी केले. अन याचे पूर्ण श्रेय शरद पवारांना जाते. त्यामुळेच या अनपेक्षित निकालाचे श्रेय भाजपपेक्षा शरद पवार यांनाच अधिक दिले पाहिजे. थोडक्यात भाजप व मित्र पक्षांच्या या भरघोस यशाचे खरे श्रेय शरद पवार व राज्यातील मविआ नेत्यांनाच दिले पाहिजे.
…………………………………………..

– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *