• 24
  • 1 minute read

महिला न्याय गॅरंटी खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव व सावित्रीबाईंच्या विचाराला ताकद देणारी: नाना पटोले

महिला न्याय गॅरंटी खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव व सावित्रीबाईंच्या विचाराला ताकद देणारी: नाना पटोले

राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली; काँग्रेसची गॅरंटी व्यक्तीची नाही तर पक्षाचीः जयराम रमेश

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग व अग्निवीर योजनेची समिक्षा करणार.

महिला न्याय गॅरंटी खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव व सावित्रीबाईंच्या विचाराला ताकद देणारी: नाना पटोले

धुळे, दि. १३ मार्च
भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली व्यक्ती राहुल गांधी आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारावेळी त्यांनी पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्यानंतर तेलंगणातही अशाच गॅरंटी जाहीर केली होत्या आता या गॅरंटींची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यावेळी या गॅरंटी शब्दावर भाजपाने टीका केली होती परंतु आज दररोज मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी यावरच त्यांना भर द्यावा लागत आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे.

धुळे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, महिला न्याय गॅरंटी ची घोषणा ही ऐतिहासिक व क्रांतीकारी आहे. मोदींनी १० वर्षात दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही. देशातील काही मुठभर लोकांना मोदी सरकारने १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले नाही. युपीए सरकारने मात्र शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे काँग्रेस सत्तेवर आल्यास या योजनेचीही समिक्षा केली जाईल.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सावित्रिबाई फुलेंच्या जन्मभूमी व कर्मभूमीत महिला सक्षमिकरणाची महिला न्याय गॅरंटी दिली ही खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव आहे, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला ताकद देणारा आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांचा भागिदारी वाढलेली दिसत आहे. महिला सक्षमिकरणात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. भाजपा सारखा चुनावी जुमला अथवा मोदी गॅरंटी सारखी खोटी नाही, काँग्रेसची गॅरंटी ही पक्की व वॉरंटी सुद्धा आहे.
महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री के. सी. पाडवी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम समोर उपस्थित होते.

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *